फोटो गॅलरी : महाशिवरात्रीच्या जत्रेत बम बम भोले!

गुजरातमधील जुनागढहून 8 किमीवर असलेल्या दामोदर कुंडाजवळच्या भवनाथ मंदिरात महाशिवरात्रीला जत्रा भरते.

भवनाथ मंदिराचा पुराणांमध्ये उल्लेख आहे. इथलं शिवलिंग एका दैवीशक्तीमुळे आल्याची वदंता आहे.

शंकर आणि पार्वती गिरनार पर्वतावरून जात असताना त्यांचं एक दैवी वस्त्र मृग कुंडात पडलं आणि शिवभक्तांनी तिथे पूजा करण्यास सुरुवात केली, अशी आख्यायिका सांगितली जाते.

ही जत्रा इतकी जुनी आहे की तिचा माग लागणं फार कठीण आहे.

महाशिवरात्रीला संध्याकाळपासून रात्रीपर्यंत यात्रेत नागा साधू मार्शल आर्टस् आणि नृत्य करतात.

हिंदू पंचांगाप्रमाणे प्रत्येक महिन्याच्या 13 किंवा 14 तारखेला शिवरात्र असते. मात्र थंडी संपून उन्हाळा सुरू होतानाची ही महाशिवरात्र शिवभक्तांना विशेष प्रिय असते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)