मुंबई मॅरेथॉन : काही रंगतदार आणि अर्थपूर्ण क्षणचित्रं

    • Author, राहुल रणसुभे
    • Role, बीबीसी मराठी

मुंबई आंतररष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये यंदा इथिओपियन धावपटूंचं वर्चस्व पाहायला मिळालं. भारतीय महिलांच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या धावपटूंनी खणखणीत यश मिळवलं.

मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन म्हणजे आपल्या शारीरिक क्षमतेची चाचणी असतेच, शिवाय या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून एखादा चांगला संदेश देणारे उत्साही धावपटूही दिसतात. यंदाच्या मॅरेथॉनमध्ये प्लॅस्टिकचा धोका, लोकसंख्यावाढीचा धोका, मातृभाषा हरपण्याचा धोका सांगायचा प्रयत्न झाला तर बेटी बचाओसारखे संदेशही देण्यात आले. पुरुष हक्क, पुरुषांचं आरोग्य याविषयी सांगणारं एक चित्रही लक्ष वेधून घेत होतं.

मुंबईमध्ये झालेल्या 'टाटा मुंबई मॅरेथॉन'मध्ये जगभरातील धावपटूंनी सहभाग नोंदवला. या मॅरेथॉनची काही कलरफुल क्षणचित्रं.

मुंबई मॅरेथॉनमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आफ्रिकन धावपटूंनी वर्चस्व राखलं. भारतीय महिलांच्या स्पर्धेत मात्र मराठी मुलींनी यश मिळवलं.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)