भीमा कोरेगाव : राहुल फटांगडे हत्याप्रकरणी तिघांना अटक

भीमा कोरेगाव पेटलेल्या हिंसाचारात ठार झालेल्या युवकाच्या हत्याप्रकरणी अहमदनगरात पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

अटकेत असलेल्या तिघांची नावं पुणे ग्रामीण पोलीस विभागानं जाहीर केली नसली तरी, त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचं सांगितलं आहे.

त्याचबरोबर सणसवाडीत घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव परिसरात उसळलेल्या दंगलीमध्ये राहुल फटांगडे यांना जीव गमवावा लागला होता.

हा तपास करताना दंगली दरम्यानच्या व्हीडिओ क्लिप, मोबाईल कॉल रेकॉर्ड, मोबाईल डम डाटा, CCTV फुटेज अशा इलेक्ट्रॉनिक माहितीचा उपयोग केला, असं पोलिसांनी सांगितलं.

1 जानेवारी रोजीची भीमा कोरेगाव परिसरातली बरीचशी दृष्यं सोशल मीडियावर झळकली होती. सध्या या परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा दिवसरात्र कडक बंदोबस्त आहे.

आणखी वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)