महाराष्ट्राला हुडहुडी : थंडीनं गारठली शहरं

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आणि उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शहरं गारठली आहेत.

मुंबईसुद्धा गेल्या तीन दिवसांपासून चांगलीच गारठली आहे. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये मॉर्निंग वॉकला निघताना गरम कपड्यांचा तामझाम करूनच बाहेर पडावं लागतं. नाशिकमध्ये गुरुवारची सकाळ सलग 12 दिवसांनंतर धुक्याविना उजाडली.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)