महाराष्ट्राला हुडहुडी : थंडीनं गारठली शहरं

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आणि उत्तरेकडून वाहत येणाऱ्या वाऱ्यामुळे गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील शहरं गारठली आहेत.

मुंबईसुद्धा गेल्या तीन दिवसांपासून चांगलीच गारठली आहे. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये मॉर्निंग वॉकला निघताना गरम कपड्यांचा तामझाम करूनच बाहेर पडावं लागतं. नाशिकमध्ये गुरुवारची सकाळ सलग 12 दिवसांनंतर धुक्याविना उजाडली.

पुणेः आला थंडीचा महिना, शेकोटी जरा पेटवा...

फोटो स्रोत, Sagar Kasar

फोटो कॅप्शन, पुणे : आला थंडीचा महिना, शेकोटी जरा पेटवा... पारा घटल्यामुळे आता जागोजागी अशा शेकोट्या पेटलेल्या दिसताहेत.
मुंबईः संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रम्य सकाळ

फोटो स्रोत, Prashant Nanaware

फोटो कॅप्शन, मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रम्य सकाळ
पुणेः उद्यानं गर्दीनं फुलली आहेत.

फोटो स्रोत, Sagar Kasar

फोटो कॅप्शन, पुणे : उद्यानं गर्दीनं फुलली आहेत.
नाशिकः इतक्या थंडीत! निफाड परिसरातील गोदावरीचं हे दृष्य.

फोटो स्रोत, Pravin Thakare

फोटो कॅप्शन, नाशिक : इतक्या थंडीत! निफाड परिसरातील गोदावरीचं हे दृश्य
नाशिकः रामकुंड परिसरात रोवींगचा सराव करणारा खेळाडू

फोटो स्रोत, Pravin Thakare

फोटो कॅप्शन, नाशिक : गोदावरीच्या पात्रात भर थंडीत रोइंगचा सराव करणारा खेळाडू
नाशिक

फोटो स्रोत, Pravin Thakre/BBC

फोटो कॅप्शन, सलग 12 दिवसांनंतर गुरुवारी नाशकातली सकाळ धुक्याशिवाय उजाडली.

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)