प्रेस रिव्ह्यू : व्हॉट्सअॅपचं तरुणाईला अनोखं दिवाळी गिफ्ट

व्हॉट्सअॅपनं आज दिवाळीच्या मुहूर्तावर अपल्या युझर्संना एका नवीन फिचरची भेट दिली आहे. हे फिचर आहे 'लाईव्ह लोकेशन शेअरिंग'चं.

त्यामुळे आता तुम्ही कुठे कुठे फिरत आहात हे कुणालाही लोकेशन शेअर करून कळवता येणार आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं याबाबातची बातमी दिली आहे.

सध्या असलेल्या 'शेअर लोकेशन'मध्ये फक्त एकच स्थळ शेअर करता येतं. पण रिअल टाइम लोकेशनमुळे ज्या व्यक्तीला तुमचं लोकेशन शेअर केलं आहे, ती व्यक्ती तुम्ही जाल तिथं तुम्हाला फॉलो करू शकते.

हॉटेलचं जेवण स्वस्त?

हॉटेलमधील खाण्यावरील जीएसटी 18 वरुन 12 टक्क्यांपर्यंत खाली येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता हॉटेलमधेय खाणं स्वस्त होण्याची चिन्ह आहेत. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं याबाबतची बातमी दिली आहे.

मोदी सरकारनं 'जीएसटी' लागू केल्यानंतर हॉटेल व्यवसायही त्यातून सुटलेला नाही. मात्र हा निर्णय मोठ्या आणि तारांकीत हॉटेल्सबाबत असेल की नसेल हे अजूनही अस्पष्ट आहे.

गर्भलिंग तपासणी करणाऱ्याला भाजप आमदाराचं संरक्षण

उत्तर प्रदेशातील अलीगढमध्ये बेकायदेशीर गभर्लिंग निदान करून स्त्री भ्रूणहत्या करणार्‍या डॉक्टर दाम्पत्याला रंगेहाथ पकडण्यात आलं आहे.

पण, भाजपच्या आमदारांनी हस्तक्षेप केल्यामुळे या डॉक्टर दाम्पत्याला अटक होऊ शकली नाही, असं वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस' या वृत्तपत्रानं दिलं आहे.

राजस्थानच्या पीसीपीएनडीटी सेलचे अधिकारी डॉ. जयंत शर्मा आणि त्यांच्या पत्नीला अटक करण्यासाठी गेले होते.

पण, भाजप आमदार संजीव राजा आणि अनिल पाराशर हे पोलीस स्टेशनमध्ये रात्री 2 वाजेपर्यंत ठाण मांडून बसले आणि त्यांनी डॉक्टर दाम्पत्याला अटक होऊ दिली नाही.

अमेरिकन लेखक सांडर्स यांचा 'द मॅन बुकर' या पुरस्काराने गौरव

जॉर्ज सांडर्स यांनी लहिलेल्या 'लिंकन इन द बोर्डो' या पुस्तकाला यंदाचा द मॅन बुकर पुरस्कार जाहीर झाला आहे. 'बीबीसी न्यूज'ने याबाबतची बातमी दिली आहे.

50 हजार डॉलर्स आणि सन्मान चिन्हं असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. हा पुरस्कार जिंकणारे सांडर्स हे दूसरे अमेरिकन लेखक आहेत.

छोट्या गोष्टी लिहण्यासाठी प्रसिद्ध असलेले सांडर्स यांची ही पहिलीच कांदबरी आहे. कब्रस्तानमध्ये घालवलेल्या एका रात्रीची गोष्टं या पुस्तकात सांगितली आहे.

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)