वाऱ्याने उडवली क्रिकेट मॅचची दाणादाण; कॅमेरे सोडून माणसं पळाली

न्यूझीलंड, श्रीलंका, वारे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टेलिव्हिजन क्रू मंडळींना कॅमेरे सोडून पळावं लागलं.

निसर्गापुढे माणूस किती हतबल होऊ शकतो याचं एक जिवंत उदाहरण क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळालं.

न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यात वेलिंग्टन इथे टेस्ट मॅच सुरू होती. सोमवारी टेस्टचा चौथा दिवस होता. जोरदार वाऱ्यांमुळे मॅचच्या थेट प्रक्षेपणात अडथळा निर्माण झाला.

टेस्ट मॅचसाठी मैदानात वीसहून अधिक कॅमेरे कार्यरत असतात. एलबीडब्ल्यूच्या निर्णयांसाठी डीआरएस तंत्रज्ञान उपलब्ध करुन देण्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे तैनात असतात. वेलिंग्टनमधल्या बेसिन रिझर्व्ह मैदानावर प्रचंड वाऱ्यांमुळे कॅमेरे सुरू ठेवणं कठीण झालं. हे कॅमेरे ऑपरेट करणाऱ्या टेलिव्हिजन क्रूला तिथे उभं राहणंही अवघड झालं. वाऱ्याचा वेग कायम राहिल्याने अखेर हे कॅमेरे सोडून टेलिव्हिजन क्रूची माणसं बंदिस्त ठिकाणी परतली.

थोड्या वेळासाठी डीआरएस तंत्रज्ञान अनुपलब्ध झालं. कॅमेरे ऑपरेट करायला मनुष्यबळच नसल्याने थेट प्रक्षेपणातही अडथळा आला. थोड्या वेळासाठी फक्त एका एन्डकडूनच प्रक्षेपण दाखवण्यात आलं.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

भयंकर अशा वाऱ्यामुळे बॉल गोलंदाजाच्या हातातून सुटल्यावर कसाही वळत होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू कोणत्या दिशेला जाईल याचा अंदाजच फलंदाजांना येईना. मायकेल ब्रेसवेलने टाकलेला एक चेंडू वाऱ्यामुळे भरकटला आणि पहिल्या स्लिपच्या दिशेने गेला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे खेळाडूंचे कपडेही शिडाच्या होडीप्रमाणे हलत होते.

न्यूझीलंड क्रिकेटने वाऱ्यांमुळे झालेल्या परिणामासंदर्भात ट्वीट केलं. वादळी स्वरुपाच्या वाऱ्यांमुळे टेलिव्हिजन क्रूला सुरक्षेच्या कारणास्तव कॅमेरे सोडून यावं लागलं आहे असं न्यूझीलंड क्रिकेटने सांगितलं.

वाऱ्याचा वेग जोरदार होता मात्र धोकादायक स्वरुपाचा नसल्याने पंचांनी खेळ सुरू ठेवला.

मॅचमध्ये काय झालं?

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 580 धावांचा डोंगर उभारला होता. माजी कर्णधार केन विल्यमसनने 23 चौकार आणि 2 षटकारांसह 215 धावांची शानदार खेळी साकारली. बराच काळ धावांसाठी संघर्ष करणाऱ्या हेन्री निकोल्सने नाबाद 200 धावांची खेळी केली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 363 धावांची मॅरेथॉन भागीदारी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना श्रीलंकेचा पहिला डाव 164 धावांतच आटोपला. कर्णधार दिमुथ करुणारत्नेने 89 धावांची झुंजार खेळी केली. न्यूझीलंडतर्फे मॉट हेन्री, मायकेल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंड, श्रीलंका, वारे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, केन विल्यमसन आणि हेन्री निकोल्स

न्यूझीलंडने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. तिसऱ्या दिवसअखेर श्रीलंकेने दुसऱ्या डावात 113/2 अशी मजल मारली होती. चौथ्या दिवशी बोचरे वारे आणि थंडी यांचा सामना करत श्रीलंकेने प्रतिकार केला. दिवसाच्या शेवटच्या सत्रात श्रीलंकेचा दुसरा डाव 358 धावांवर आटोपला. धनंजय डिसिल्व्हाने 98 धावांची खेळी केली. 12 चौकार आणि एका षटकारासह त्याने ही खेळी साकारली. शतकापासून अवघ्या दोन धावा दूर असताना विचित्र फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न निकोल्सच्या हातात जाऊन विसावला. दिमुथ करुणारत्ने (51), कुशल मेंडिस (50), दिनेश चंडिमल (62) यांची अर्धशतकंही श्रीलंकेचा डावाचा पराभव टाळू शकलं नाही.

या टेस्टमध्ये विजयासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेत 2-0 असं निर्भेळ यश मिळवलं. हेन्री निकोल्सला सामनावीर तर केन विल्यसमनला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)