6 चेंडूत 4 धावा आणि 5 विकेट्स गमावून सामना गमावला

साऊथ ऑस्ट्रेलिया, टास्मानिया, क्रिकेट, ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, टास्मानियाची खेळाडू

क्रिकेट लढतीत शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 4 धावा म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघासाठी अनुकूल असे समीकरण.

पण काही तासांपूर्वी झालेल्या एका लढतीत बॅटिंग करणाऱ्या संघाने या लक्ष्याचा पाठलाग करताना शेवटच्या ओव्हरमध्ये 2 धावात 5 विकेट्स गमावल्या आणि पर्यायाने सामनाही.

होबार्ट इथल्या बंडस्टोन एरिना इथे झालेल्या लढतीत हा अचंबित करणारा प्रकार पाहायला मिळाला.

साऊथ ऑस्ट्रेलिया, टास्मानिया, क्रिकेट, ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, साऊथ ऑस्ट्रेलिया

ऑस्ट्रेलियात वूमन्स नॅशनल क्रिकेट लीग स्पर्धेची फायनल टास्मानिया आणि साऊथ ऑस्ट्रेलिया स्कॉर्पिअन्स यांच्यात सुरू होती.

टास्मानिया संघाने 50 ओव्हरमध्ये 264 धावांची मजल मारली. टास्मानियाची कर्णधार एलियास व्हिलानीने 10 चौकारांसह 110 धावांची मॅरेथॉन खेळी केली.

नओमी स्टॅलनबर्गने 75 धावांची खेळी करत कर्णधाराला चांगली साथ दिली. साऊथ ऑस्ट्रेलिया संघातर्फे अनेसू मुश्गावे आणि अमांडा जेड वेलिंग्टन यांनी प्रत्येकी 4 विकेट्स घेतल्या.

पावसाने व्यत्यय आणल्यामुळे साऊथ ऑस्ट्रेलियाला 243 धावांचं लक्ष्य देण्यात आलं. इमा डी ब्रोग (68) आणि कोर्टनी वेब (83) यांनी संघाच्या विजयासाठी पायाभरणी केली.

या दोघींना बाकीच्या फलंदाजांची साथ न मिळाल्याने शेवटच्या ओव्हरमध्ये 6 चेंडूत 4 धावा असं समीकरण झालं.

साऊथ ऑस्ट्रेलियाचं पारडं जड होतं कारण एक चौकार लगावून लक्ष्य गाठण्यासारखं होतं पण झालं भलतंच. साऊथ ऑस्ट्रेलिया संघाने 6 चेंडूत 5 विकेट्स गमावला आणि त्यांच्या पदरी अनपेक्षित पराभव पडला.

साऊथ ऑस्ट्रेलिया, टास्मानिया, क्रिकेट, ऑस्ट्रेलिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सारा कोएट

शेवटची ओव्हर : 6 चेंडूत 4 धावांची आवश्यकता

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पहिला चेंडू- सारा कोयटेच्या गोलंदाजीवर अनी ओ नील पायचीत झाली.

दुसरा चेंडू- अमांडा जेड वेलिंग्टनने थर्डमॅनच्या दिशेने चेंडू खेळून काढला आणि एक धाव मिळवली. दक्षिण आफ्रिकेला आता 3 धावा हव्या होत्या.

तिसरा चेंडू- साऊथ ऑस्ट्रेलियाची कर्णधार जेमा बास्र्बी बाद झाली. 5 चौकारांसह जेमाने 28 धावांची खेळी केली. जेमाकडून साऊथ ऑस्ट्रेलिया संघाला अपेक्षा होत्या पण ती बाद झाल्याने अडचणी वाढल्या.

चौथा चेंडू- नवी फलंदाज एला विल्सनने चेंडू गोलंदाज साराच्या दिशेने खेळून काढला. साराच्या हाताला लागून चेंडू नॉन स्ट्राईक एन्डच्या स्टंप्सवर आदळला. चेंडू आदळला तेव्हा नॉन स्ट्राईकवरील फलंदाज अमांडा जेड विल्सन क्रीझबाहेर होती. त्यामुळे तिला पॅव्हेलियनच्या दिशेने परतावं लागलं. तिने एका धावेचं योगदान दिलं.

पाचवा चेंडू- साराने या चेंडूवर एला विल्सनला पायचीत पकडलं.

सहावा चेंडू- अखेरच्या चेंडूवर दक्षिण आफ्रिकेला तीन धावांची आवश्यकता होती. अनेसू मुश्गावे धावचीत झाली. तिने चेंडू मिडऑफच्या दिशेने खेळून काढला. तिने धावायला सुरुवात केली. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी तिने प्रयत्न सुरु केला पण व्हिलानीने चेंडू स्टंप्सवर नेम साधत बाद केलं.

साऊथ ऑस्ट्रेलियाच्या संघाला अवघी एक धाव कमी पडली आणि टास्मानियाने सनसनाटी विजय मिळवला. अनपेक्षित अशा घडामोडींसह विजयानंतर टास्मानियाच्या खेळाडूंनी मैदानात विजय जल्लोषात साजरा केला. दुसरीकडे साऊथ ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्तंभित झाल्याचे भाव होते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)