‘आमच्या विमानात एक घोडा सैरावैरा धावतोय, आम्हाला त्याला पकडता येत नाहीये’

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ब्रँडन ड्रेनन
- Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन
आकाशात जवळपास 30 हजार फुट उंचीवर उडणाऱ्या बोईंग 747 मालवाहू विमानात अशक्य गोंधळ माजला जेव्हा एक घोडा त्याच्या पिंजऱ्यातून निसटला आणि इकडे तिकडे धावू लागला.
हे मालवाहू विमान न्यूयॉर्कहून बेल्जियमला चाललं होतं. उड्डाण केल्यानंतर 90 मिनिटातच या विमानाला परतीचा रस्ता धरावा लागला.
एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या ऑडियो रेकॉर्डिंगमध्ये पायलटचं बोलताना ऐकू येतात. ते म्हणतात, “आमच्या विमानात एक घोडा सैरावैरा धावतोय. तो त्याच्या पिंजऱ्यातून निसटला आहे.”
“आम्हाला त्याला पकडता येत नाहीये.”
एअर अटलांटा आईसलँडिक फ्लाईट 4592 च्या पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला सांगितलं की विमानाला काहीही झालेलं नाही, पण इकडे तिकडे पळणाऱ्या घोड्यामुळे आम्हाला काळजी वाटतेय.
पायलटने मग विनंती केली की विमान जॉन एफ केनेडी विमानतळावर लँड झालं की एखादा जनावराचा डॉक्टर तिथे उपलब्ध असावा.
पण परत येता येता या विमानाला 20 टन इंधन विमानातून खाली टाकून द्यावं लागलं.
अर्थात हा घोडा त्याच्या पिंजऱ्यातून कसा निसटला हे कोड आहे. पण विमान जेव्हा एअरपोर्टवर लँड झालं तेव्हा तो बांधलेला नव्हता, ना त्याच्या पिंजऱ्यात होता.
एअर ट्रॅफिक कंट्रोलने विमान लँड झाल्यावर या विमानाच्या पायलटला विचारलं की, ‘तुम्हाला मदत हवीये का?’
पायलटने उत्तर दिलं, “जमिनीवर नको, पण विमानातून हा घोडा उतरवायला मदत करा.”
नंतर या विमानाने पुन्हा उड्डाण केलं आणि दुसऱ्या दिवशी ते लिज विमानतळावर उतरलं.
बीबीसीने विचारणा केली असला एअर अटलांटा आईसलँडिक कंपनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाहीये.
हा घोडा विमानातून का आणि कुठे नेला जात होता याबद्दलही कोणती माहिती उपलब्ध नाही.
घोड्यांची ने-आण सहसा शर्यतींसाठी होते.
“प्राणी किंवा इतर गोष्टी नेण्यासाठीही वेगवेगळे वर्ग ठरलेले असतात. त्यात फर्स्ट क्लास असतं, बिझनेस क्लास आणि इकोनॉमीही. हे वर्ग तुम्हाला प्राणी नेण्यासाठी कोणत्या आकाराचे कंटेनर किंवा पिंजरे हवेत यावर ठरतात,” एका तज्ज्ञांनी सीएनएनला सांगितलं.
मालवाहू विमानात हवेत उडत असताना एखादा प्राणी त्याच्या पिंजऱ्यातून निसटण्याची ही पहिलीच वेळ नाहीये.
याचवर्षी ऑगस्ट महिन्यात दुबईहून बगदादला जाणाऱ्या इराकी एअरवेजच्या एका विमानात एक अस्वल त्याच्या पिंजऱ्यातून निसटलं होतं. याबाबत असोसिएट प्रेसने वृत्त दिलं होतं.
हेही वाचलंत का?
हा व्हीडिओ पाहिलात का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.








