'या' 3 कारणांमुळे पाकिस्तानला करावा लागला पराभवाचा सामना

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानला 5 विकेट्सनी नमवत इंग्लंडने दुसऱ्यांदा ट्वेन्टी20 वर्ल्डकपच्या जेतेपदावर नाव कोरलं. 49 बॉलमध्ये नाबाद 52 रन्सची खेळी करणारा स्टोक्स या विजयाचा शिल्पकार ठरला.
पाकिस्तानने पहिल्यांदा 137 रन्सची मजल मारली. संथ खेळपट्टीवर हे आव्हान कठीण होतं. इंग्लंडची सुरुवातही डळमळीत झाली.
पण बेन स्टोक्सने एका बाजूने विकेट्स पडत असतानाही चिवटपणे खेळ करत बाजी मारली.
मुख्य अस्त्र असलेला शाहीन शहा आफ्रिदी दुखापतग्रस्त झाल्याने पाकिस्तानच्या विजयाच्या आशा मावळल्या.
मधल्या ओव्हर्समध्ये हॅरिस रौफ आणि नसीम शहा यांनी टिच्चून मारा करत इंग्लंडवरचं दडपण वाढवलं. शदाब खानच्या बॉलिंगवर शाहीन शहा आफ्रिदीने हॅरी ब्रूकचा कॅच पकडला.
पाकिस्तानच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना या विकेटचा आनंद होणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही. कारण कॅच घेताना शाहीन शहा आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला.
उपचारांसाठी तो पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडच्या संघावर दडपण असताना तो मैदानात उतरला. त्याने वॉर्मअप करून रनअप आखला. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल टाकतानाच त्याला त्रास होत असल्याचं दिसलं.
बॉल टाकल्यावर त्याने कर्णधार बाबर आझमशी चर्चा केली आणि अंपायरकडून कॅप घेऊन तो डगआऊटमध्ये परतला.

फोटो स्रोत, Getty Images
इंग्लंडला फोर आणि सिक्सची वानवा झालेली असताना, त्यांच्या बॅट्समनचे फटके हुकत असताना पाकिस्तानचा प्रमुख बॉलर दुखापतग्रस्त होऊन परतणं इंग्लंडसाठी आशादायी चित्र होतं.
शाहीनची उर्वरित ओव्हर टाकण्यासाठी इफ्तिकार अहमद आला. इफ्तिकारने तोपर्यंत एकही ओव्हर टाकली नव्हती. शाहीनऐवजी इफ्तिकार बॉलिंगला असल्याने बेन स्टोक्स आणि मोईन अली यांनी सुस्कारा टाकला आणि पुढच्या 5 बॉलमध्ये 13 रन्स वसूल केल्या.
या ओव्हरने सामन्याचं पारडं इंग्लंडच्या बाजूने गेलं. स्टोक्सने सगळा अनुभव पणाला लावत इंग्लंडला दुसरा वर्ल्डकप जिंकून दिला.
या सामन्यात पाकिस्तानच्या पराभवसाठी नेमक्या कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या?
1. शाहीन शहा आफ्रिदी माघारी परतला आणि...

फोटो स्रोत, Getty Images
गुडघ्याच्या दुखापतीतून पुनरागमन करणारा शाहीन शहा आफ्रिदी पाकिस्तानचं मुख्य अस्त्र होतं. याच दुखापतीमुळे त्याने आशिया कपमधूनही माघार घेतली होती.
वर्ल्डकप फायनलच्या लढतीत शाहीन शहा आफ्रिदीने अलेक्स हेल्सला माघारी धाडत जबरदस्त सुरुवात केली.
मधल्या ओव्हर्समध्ये हॅरिस रौफ आणि नसीम शहा यांनी टिच्चून मारा करत इंग्लंडवरचं दडपण वाढवलं. शदाब खानच्या बॉलिंगवर शाहीन शहा आफ्रिदीने हॅरी ब्रूकचा कॅच पकडला.
पाकिस्तानच्या खेळाडूंना आणि चाहत्यांना या विकेटचा आनंद होणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही. कारण कॅच घेताना शाहीन शहा आफ्रिदी दुखापतग्रस्त झाला.
उपचारांसाठी तो पॅव्हेलियनमध्ये परतला. इंग्लंडच्या संघावर दडपण असताना तो मैदानात उतरला. त्याने वॉर्मअप करून रनअप आखला.
तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल टाकतानाच त्याला त्रास होत असल्याचं दिसलं. बॉल टाकल्यावर त्याने कर्णधार बाबर आझमशी चर्चा केली आणि अंपायरकडून कॅप घेऊन तो डगआऊटमध्ये परतला.
इंग्लंडला फोर आणि सिक्सची वानवा झालेली असताना, त्यांच्या बॅट्समनचे फटके हुकत असताना पाकिस्तानचा प्रमुख बॉलर दुखापतग्रस्त होऊन परतणं इंग्लंडसाठी आशादायी चित्र होतं.
शाहीनची उर्वरित ओव्हर टाकण्यासाठी इफ्तिकार अहमद आला. इफ्तिकारने तोपर्यंत एकही ओव्हर टाकली नव्हती.
शाहीनऐवजी इफ्तिकार बॉलिंगला असल्याने बेन स्टोक्स आणि मोईन अली यांनी सुस्कारा टाकला आणि पुढच्या 5 बॉलमध्ये 13 रन्स वसूल केल्या.
या ओव्हरने सामन्याचं पारडं इंग्लंडच्या बाजूने गेलं. स्टोक्सने सगळा अनुभव पणाला लावत इंग्लंडला दुसरा वर्ल्डकप जिंकून दिला.
2. मेलबर्नच्या मैदानाचा मोठा आकार

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानच्या संघाने न्यूझीलंडविरुद्धची सेमी फायनल सिडनी इथे खेळली. त्यानंतर ते मेलबर्न इथे दाखल झाले. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडचा आकार प्रचंड आहे.
बाऊंड्री अतिशय दूरवर आहे. त्यामुळे अन्य मैदानांवर सहजी सिक्स जाणारे फटके इथे फिल्डरच्या हातात जाऊन विसावतात. फायनलमध्ये याचा प्रत्यय आला.
मोहम्मद हॅरिसकडून पाकिस्तानला खूप अपेक्षा होत्या पण आदिल रशीदच्या बॉलिंगवर त्याने मारलेला फटका बेन स्टोक्सच्या हातात गेला.
सॅम करनच्या बॉलिंगवर शान मसूदने फ्लिक केलं पण लायम लिव्हिंगस्टोनने बाऊंड्रीपासून पुढे येऊन कॅच घेतला.
मोहम्मद नवाझने खेळलेला फटका लायम लिव्हिंगस्टोनने बाऊंड्रीपासून खूप पुढे येऊन पकडला. मोहम्मद वासिमचीही तीच गत झाली.
याही वेळी लायम लिव्हिंगस्टोनने पुढे येऊन कॅच टिपला. पाकिस्तानच्या बॅट्समननला मैदानाच्या मोठ्या आकाराचा अंदाजच आला नाही आणि त्यांनी नियमित अंतरात विकेट्स गमावल्या.
3. बाबर रिझवानवरच मदार

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानला चांगल्या मिडल ऑर्डरची आवश्यकता आहे असं पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू वासिम अक्रम एशिया कपपासून बोलत होते.
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनी पाकिस्तानला दमदार सलामी देत अनेक मॅचेस जिंकून दिल्या आहेत.
पण हे दोघे झटपट आऊट झाले तर पुढे काय असा प्रश्न नेहमीच विचारला जात होता.
फायनलमध्ये बाबर-रिझवान जोडीने 29 रन्सची सलामी दिली. रिझवान आऊट झाल्यानंतर बाबरने सूत्रं हाती घेतली. पण रशीदने बाबरची खेळी संपुष्टात आणली आणि पाकिस्तानच्या डावाची लयच हरपली.
फायनलसारख्या मोठ्या लढतीत पाकिस्तानला 137 रन्सचीच मजल मारता आली. सलामीच्या दोघांवर विसंबून राहणं पाकिस्तानला चांगलंच महागात पडलं आहे.
'तो' दौरा इंग्लंडच्या पथ्यावर...
सप्टेंबर 2021- इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुरुष आणि महिला संघाचा पाकिस्तान दौरा सुरक्षेच्या कारणास्तव रद्द केला. त्याआधी तीन दिवस न्यूझीलंड संघानेही पाकिस्तान संघाचा रद्द करत असल्याची घोषणा केली होती.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानमध्ये उमटले होते. खेळाडू, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि चाहते यांनी नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे खेळाडूंची सुरक्षा हेच सर्वोच्च प्राधान्य असल्याचं ईसीबीने म्हटलं.
कोरोना काळात खेळाडूंना प्रदीर्घ काळ बबलमध्ये राहून खेळावं लागलं. त्याचा ताण त्यांच्यावर होता. सुदैवाने आता तो धोका कमी झाला आहे. या दौऱ्यासाठी त्यांच्यावर सुरक्षेचा ताण टाकायचा नाहीये असं इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलं.
आमच्या या निर्णयाचा फटका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला बसणार आहे. चाहते नाराज होणार आहेत. पाकिस्तानच्या खेळाडूंना घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार नाही.
आम्ही या सगळ्यासाठी दिलगीर आहोत. भविष्यात आम्ही नक्कीच पाकिस्तानचा दौरा करू असं इसीबीने आपल्या पत्रकात म्हटलं.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख रमीज राजा यांनीही इसीबीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी रोष व्यक्त केला होता

फोटो स्रोत, Getty Images
सप्टेंबर 2022- इंग्लंड क्रिकेट संघ सात सामन्यांच्या ट्वेन्टी20 मालिकेसाठी पाकिस्तानात दाखल झाला. अभूतपूर्व सुरक्षा यंत्रणेत त्यांचं स्वागत झालं. विदेशी राष्ट्राध्यक्षाला जी सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात येते तशी सुरक्षा इंग्लंडच्या संघाला देण्यात आली.
सर्वसाधारणपणे दोन संघांदरम्यान दोन किंवा तीन सामन्यांची ट्वेन्टी-20 मालिका खेळवण्यात येते पण आगामी वर्ल्डकप लक्षात घेऊन 7 सामन्यांची मालिका खेळवण्यात आली. कराची आणि लाहोर या दोन्ही ठिकाणी चाहत्यांच्या भरघोस प्रतिसादात सामने झाले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या मालिकेत पाहुण्या इंग्लंड संघाने 4-3 अशी बाजी मारली.
आयोन मॉर्गन निवृत्त झाल्यामुळे संघात स्थान मिळालेल्या हॅरी ब्रूकला मालिकावीर पुरस्कराने गौरवण्यात आलं. दुखापतीमुळे जोस बटलर मालिकेत एकही सामना खेळू शकला नाही, त्याच्या अनुपस्थितीत मोईन अलीने संघाचं नेतृत्व केलं.
वर्ल्डकपच्या तयारीच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी उत्तम रंगीत तालीम झाली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








