You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
2025 चंद्रग्रहण : भारतासह जगभरात कसा दिसला 'ब्लड मून'? चंद्रग्रहणाचे 10 फोटो
रविवार, 7 सप्टेंबर हा दिवस खगोलशास्त्राचे अभ्यासक आणि अंतराळप्रेमींसाठी खूप खास होता. कारण रविवारी भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये पूर्ण चंद्रग्रहण दिसले.
या पूर्ण चंद्रग्रहणाला 'ब्लड मून' म्हटलं जातं. यात चंद्र लाल आणि नेहमीपेक्षा मोठ्या आकाराचा दिसला.
ही खगोलीय घटना भारतासह पूर्व आफ्रिका, युरोप, पश्चिम ऑस्ट्रेलिया आणि आशियातील अनेक देशांमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत स्पष्टपणे दिसली.
महत्त्वाचं म्हणजे, हे या वर्षातलं शेवटचं चंद्रग्रहण होतं. जगभरातील काही भागांत दिसलेल्या या ग्रहणाची झलक पाहू काही खास फोटोंमधून...
लडाखपासून गुजरातपर्यंत, लाखो लोकांनी रविवारी रात्री दुर्मिळ पूर्ण चंद्रग्रहण 'ब्लड मून' पाहिले.
रविवारी रात्री 9.57 वाजता पृथ्वीची सावली चंद्राच्या पृष्ठभागावर पडू लागली. ढगाळ आकाश आणि पावसामुळे देशाच्या काही भागात चंद्र दिसत नव्हता.
पृथ्वीच्या सावलीने चंद्र पूर्णपणे झाकला तेव्हा 'ब्लड मून' दिसला.
चंद्रग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. या दरम्यान चंद्र आणि पृथ्वीतील अंतर सर्वांत कमी होऊन चंद्र नेहमीच्या तुलनेत 14 टक्क्यांनी मोठा आणि अधिक चमकदार दिसतो.
चंद्राला ग्रहण कसं लागतं?
परिभ्रमणादरम्यान जेव्हा पृथ्वी चंद्र आणि सूर्याच्या मध्ये येते तेव्हा पृथ्वीमुळे चंद्राकडे जाणारा सूर्यप्रकाश रोखला जातो, पृथ्वीची सावली चंद्रावर पडते आणि आपल्याला ग्रहण दिसतं.
चंद्रग्रहण सूर्यग्रहणाच्या तुलनेत व्यापक स्तरावर दिसून येतं.
चंद्रग्रहणांचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हे ग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू शकतो, मात्र सूर्यग्रहणात असं करता येत नाही. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)