शहाजीबापू पाटील यांच्या गावात सगळं काही 'ओक्के' नाही? मतदार म्हणतात-

शहाजी बापू पाटील

फोटो स्रोत, facebook

आज विविध वर्तमानपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांचा थोडक्यात घेतलेला आढावा.

1.शहाजीबापू पाटील यांच्या गावात सगळं काही ओक्के नाही?

'काय झाडी, काय डोंगर, काय हाटील' या संवादामुळे चर्चेत आलेल्या शहाजीबापू पाटलांच्या मतदारसंघात सगळं काही 'ओक्के' नाही.

काल (22 फेब्रुवारी) शहाजीबापू त्यांच्या मतदारसंघात दौरा करायला गेले तेव्हा त्यांनी मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मतदारांनी तक्रारीचा पाढा वाचला. मतदान करूनही काहीही विकासाच्या गोष्टी झाल्या नाहीत, चांगले रस्ते, सभामंडप किंवा इतर कोणत्याही गोष्टीचा विकास झाला नाही अशा शब्दात मतदारांनी त्यांना सुनावलं.

याबरोबरच गावात प्रचंड असुविधा असल्याचंही नागरिकांनी त्यांना सांगितलं.

टीव्ही 9 ने ही बातमी दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यापासून शहाजीबापू पाटील चांगलेच चर्चेत आले आहेत.

2. भाजपाचे लोक वर्गातल्या चिथावणीखोर मुलासारखे आहेत- राहुल गांधी

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

भाजपचे नेते वर्गातल्या चिथावणीखोर मुलांसारखे आहेत. त्यांना सगळं माहिती असल्याच आव आणतात आणि कोणाचाही आदर करत नाही, अशा शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

यामुळे भाजपच्या विरोधात आपल्याला एकत्रितपणे लढायचं आहे असं आवाहन त्यांनी केलं.

मेघालयात झालेल्या निवडणूक प्रचारावेळी ते बोलत होते. भाजपबरोबरच त्यांनी तृणमूल काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. भाजप सत्तेत यावी म्हणनूच तृणमूल काँग्रेस तिथे निवडणूक लढवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

भाजप मेघालयातील भाषा, संस्कृती आणि इतिहासाला धक्का लावण्याचा प्रयत्न करत आहे मात्र काँग्रेस असं कदापिही होऊ देणार नाही असंही ते म्हणाले.

एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

3. दिल्लीत शाळकरी मुलीशी मैत्री करून तिचा खून, कुटुंबियांना सापडलं कुजलेलं शव

राजधानी दिल्लीतील नागलोई भागात एका 11 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिची हत्या करण्यात आली. या मुलीचा मृतदेह लपवून ठेवण्यात आला होता.

अनेक राज्यांमध्ये छापेमारी केल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्सने ही बातमी दिली आहे.

दिल्लीचे पोलीस उपायुक्त हरेंद्र सिंह यांनी याबाबत माहिती दिली. राजधानी पार्कमध्ये राहणाऱ्या एका महिलेने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. आपल्या 11 वर्षांच्या मुलीचे अपहरण झाल्याचे या महिलेने पोलिसांना सांगितले. ही मुलगी शाळेत गेली होती, मात्र, ती घरी परत आली नाही.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तसंच अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. दिल्लीशिवाय पंजाब आणि मध्य प्रदेशातही छापे टाकण्यात आले.

या प्रकरणी रोहित उर्फ विनोद याला अटक करण्यात आली. तो पश्चिम विहार झोपडपट्टीतील रहिवासी आहे.

4. पोलीस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, आठवड्यातील दुसरी घटना

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

पोलीस भरतीतील मैदानी चाचणीनंतर अस्वस्थ वाटू लागलेल्या तरुणाचा मंगळवारी (21 फेब्रुवारी) हॉटेलमध्ये मृत्यू झाला.

प्राथमिक अहवालानुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भरतीतील उमेदवाराचा मृत्यू होण्याची आठवडय़ातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी शुक्रवारी वाशिम जिल्ह्यातील 26 वर्षीय तरुणाचा मैदानी चाचणीनंतर मृत्यू झाला होता.

लोकसत्ताने ही बातमी दिली आहे.

अमर अशोक सोळंकी (24) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो अमरावती येथील नवसारीतील रहिवासी आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीसाठी तो मुंबईत आला होता.

फोर्ट परिसरातली रेसिडन्सी हॉटेलमध्ये सध्या तो वास्तव्यास होता. सोळंकी याने मंगळवारी मैदानी चाचणी दिल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत असल्याचे त्याने परिचित व्यक्तीला सांगितले.

त्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अंघोळ करत असताना त्याला उलटी झाली आणि तो बेशुद्ध होऊन खाली कोसळला. त्याला सेंट जॉर्ज रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

5. लग्न कधी करणार या प्रश्नावर आदित्य ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, @Aadityauthackeray

धनुष्यबाण चिन्ह गमावल्यामुळे सध्या शिवसेनेवर मोठं संकट ओढावलं आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत राजकीय प्रश्नांवर भाष्य केलं आणि इतरही प्रश्नांची उत्तरं दिली.

लग्न कधी करताय या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले, “ हा प्रयत्न तुम्ही चार वर्षांपूर्वी केला होता आणि आताही करताय. सध्या फक्त राजकारणावर लक्ष केंद्रित करू”

या मुलाखतीत त्यांनी आई रश्मी ठाकरे यांच्याविषयीसुद्धा सांगितलं. काही गोष्टी आईशी बोलतात आणि काही वडिलांशी तरीही पाय जमिनीवर राहण्यासाठी आईने खूप मदत केली आहे असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)