ब्रेकअप किंवा प्रेमभंगचा आपल्याला फायदाही होऊ शकतो?

महिला

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधीक फोटो

तुम्‍हाला प्रश्‍न पडत असेल की हा काय प्रश्‍न आहे? नातं तुटल्यावर कोणाला बरं वाटू शकतं का?

आपण कदाचित या गोष्टीच्या चांगल्या बाजूचा विचार

'द ब्रेक-अप मोनोलॉग्स' या पुस्तकाच्या लेखिका रोझी विल्बी यांचं मत आहे की, 'ब्रेक-अप' चे अनेक फायदे आहेत.

रोझी विल्बी या 'द ब्रेक-अप मोनोलॉग्स' पूर्वी नावानं आपलं पॉडकास्ट सादर करत होत्या. पुढे त्यांनी याच नावानं एक पुस्तक लिहिलं.

या पुस्तकात त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती दिली आहे.

याशिवाय पॉडकास्टवर येणाऱ्या पाहुण्यांशी बोलताना मानवी नातेसंबंधांबद्दल जे काही समजलं,

त्याला त्यांनी पुस्तकात स्थान दिलं आहे.

हे पुस्तक लिहिण्यासाठी त्यांनी अनेक थेरपिस्ट, समाजशास्त्रज्ञ आणि वैज्ञानिकांशी चर्चा केली आहे. त्यांनी बीबीसी रील्सशी त्यांच्या पुस्तकाबद्दल चर्चा केली.

रोझी विल्बी बीबीसी रील्स मध्ये सांगतात की, प्रेमभंग तुम्हाला खूप काही शिकवू शकतो.

बीबीसीशी आपला अनुभव शेअर करताना त्या सांगतात की ब्रेकअप कधीच चांगला मानला जात नाही. परंतु हे देखील शक्य आहे की त्यातून तुमचं भलं होऊ शकतं.

स्वतःला समजून घेण्याची संधी

रोझी विल्बीच्या म्हणण्यानुसार ब्रेक-अपमुळे आपल्या नात्यात कोणत्या प्रकारची व्यक्ती असावं किंवा आपण कोणत्या प्रकारच्या माणसासोबत रिलेशनशिप ठेवायला हवं याचा विचार करण्याची संधी आपण स्वतःला देतो.

कधीकधी प्रेमभंगाच्या वेदनादायक अनुभवातूनच आपल्याला स्वतःबद्दल खरी माहिती मिळते आणि चांगले निर्णय घेण्यास आपण सक्षम होतो.

ब्रेक अप

फोटो स्रोत, Getty Images

मानसिक आरोग्य आणि वर्तणूक शास्त्रातील तज्ज्ञ डॉ. समीर मल्होत्रा यांचा असा विश्वास आहे की, काहीवेळा नातं तुटल्यानं तुमचे डोळे उघडतात.

बीबीसीच्या सहकारी फातिमा फरहीनशी बोलताना डॉ. मल्होत्रा म्हणतात, "कधीकधी ब्रेकअपमुळे तुम्हाला तुमच्या उणिवांची जाणीव होते.

मग तुम्ही स्वतःमध्ये बदल करता. तुम्ही ब्रेकअपकडे कसं बघता हे तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही इतरांमध्‍ये चुका शोधत राहिलात, तर तुम्‍ही कधीही सुधारण्‍याचा प्रयत्‍न करणार नाही."

प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो

दिल्लीस्थित मानसशास्त्रज्ञ आणि विवाह समुपदेशक शिवानी मिश्री साधू सांगतात की, ब्रेकअप प्रत्येकासाठी कठीण असतो आणि त्यावर मात करण्याचा प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो.

फातिमा फरहीनशी बोलताना शिवानी मिश्री साधू सांगतात की, कधी कधी नातं तुटणं हा देखील आपल्यासाठी एक धडा असतो.

प्रेम

फोटो स्रोत, Getty Images

त्या म्हणतात की, "जेव्हा तुमचा ब्रेक-अप होतो, तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल जाणून घेण्याची आणि स्वतःला सुधारण्याची संधी मिळते.

या रिलेशनशिपमध्ये आपण काय चूक केली, हे देखील आपण स्वीकारलं पाहिजे."

प्रेमभंग आणि व्यसन

रोझी विल्बी या प्रेमभंगाची तुलना ड्रग व्यसनाशी करतात.

त्यांच्या मते नातं तुटल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं वर्तन ड्रग्जच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला ड्रग्ज घेण्यापासून थांबवल्यावर जसं होईल, तसं असतं.

डॉ. समीर मल्होत्रा हेही सांगतात की, जेव्हा मेंदूमध्ये लव्ह केमिकल म्हणजेच ऑक्सिटोसिन हार्मोन वाढतो तेव्हा समोरच्या व्यक्तीचं आकर्षण वाढतं. हे कोणत्याही प्रकारच्या प्रेमात दिसून येतं.

ते म्हणतात, "अनेक वेळा डोपामाइन रिवॉर्ड पाथवे मेंदूच्या आत सक्रिय होतो. त्यामुळे त्या व्यक्तीला पुन्हा पुन्हा भेटण्याची तुमची इच्छा वाढते.

पण ती मिळाली नाही आणि नातं तुटलं, तर तुमची अवस्था ड्रग्ज न मिळालेल्या व्यसनी माणसासारखी होतं."

डॉ. समीर मल्होत्रा यांच्या मते नशेच्या व्यसनात डोपामाइन रिवॉर्डचा पाथवे सक्रिय होतो.

ताबडतोब नवीन रिलेशनशिपमध्ये जावं का ?

रोझी विल्बी म्हणतात की, नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.

हे एक कठीण काम आहे, कारण नातेसंबंधांमुळे तुमच्या आयुष्यात खूप गोंधळ होतो.

तुम्हाला एका दुसऱ्या व्यक्तीशी आणि त्याच्या चांगल्या-वाईटाचा सामना करावा लागतो.

प्रेम

रोझी विल्बी बीबीसी रील्समध्ये म्हणतात की , "ब्रेकअपनंतर, दुसरं नातं जोडण्यापूर्वी थोडा वेळ काढावा आणि स्वतःबद्दल विचार करावा, हे खुप महत्त्वाचं आहे.

पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही संन्यासी किंवा नन व्हा आणि सेक्सपासून पूर्णपणे दूर राहा.

स्वतःशी असलेलं नातं महत्वाचं आहे

डॉ. समीर मल्होत्राही रोझी विल्बी यांचा मुद्दा पुढे करतात.

ते म्हणतात की, "अनेकदा लोकांना वाटतं की एक नातं तुटलं तर दुसरं नातं लवकर तयार व्हावं. हे चुकीचे आहे.

आपलं सर्वात महत्वाचं नातं हे स्वतःशी असतं. त्यात काही नियम, काही संतुलन, काही शिस्त असावी."

डॉ.मल्होत्रा यांच्या मते तुमची ऊर्जा ही काही छंद किंवा आवडींमध्ये वापरली पाहिजे.

स्वतःशी असलेले नातं सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि स्वतःच्या उणिवा समजून घेऊन त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे,असं ते म्हणतात.

ब्रेकअप

फोटो स्रोत, Getty Images

डॉ. मल्होत्रा म्हणतात की आपण कोणालाही स्टॉक करू नये (त्याच्या किंवा तिच्या मागे जावू नये) किंवा नातं दाखवण्यासाठी आपल्याला कोणाची तरी गरज आहे

या निराशेतून आपण नवीन व्यक्तीला पकडू नये.

ते म्हणतात की, "जेव्हाही आपण नातेसंबंधांबद्दल बोलतो तेव्हा त्यात दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे हेल्दी कनेक्टेडनेस आणि हेल्दी डिस्टन्स

हे जर सोप्या भाषेत सांगायचे झालं तर, नातेसंबंध टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. एकमेकांशी जोडलेले राहा, पण त्याच वेळी त्यांच्यात काही अंतर असावं

कारण प्रत्येक व्यक्तीला काही 'पर्सनल स्पेस' हवी असते."

लोकांचं बदलतं मत

शिवानी मिश्री साधू यांचं म्हणणं आहे की, भारतातही ब्रेक-अपबाबत लोकांची मतं बदलू लागली आहेत.

तज्ज्ञ म्हणतात की, टॉक्सिक नातेसंबंधात राहिल्यानं त्यांचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य बिघडतं, हे आता लोकांना हे समजू लागलं आहे.

मात्र, भारतातील परिस्थिती अजूनही अशी आहे की त्यातून बाहेर पडणं थोडं कठीण आहे.

ब्रेक-अप नंतरच्या परिस्थितीबद्दल बोलताना पूजा शिवम जेटली म्हणतात की, तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटू शकता,

निरोगी सवयी लावू शकता, तुमचे आयुष्य नव्यानं जगायला शिकू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला

तुमचं स्वतःचं महत्त्व समजण्यास सुरुवात होते.

शिवानी मिश्री साधू शेवटी म्हणतात की, "तुम्ही ब्रेकअपनंतर आनंदी राहू शकता."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)