कॅन्सरमुळे वंध्यत्व आलेला तरुण स्पर्म गोठवल्यामुळे बनला पिता

कॅन्सरमुळे वंध्यत्व आलेला तरुण स्पर्म गोठवल्यामुळे बनला पिता

फोटो स्रोत, FAMILY PHOTO

फोटो कॅप्शन, निक फॉस्टर आणि त्यांचा मुलगा
    • Author, अॅलेक्स पोप
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

कॅन्सरवरील उपचारांमुळे वंध्यत्व आलेला तरुण एका बाळाचा पिता बनू शकला कारण त्याने नऊ वर्षांपूर्वी घेतलेला एक निर्णय.

निक फॉस्टर असं या तरुणाचं नाव आहे. त्याने किमोथेरेपी सुरू करण्याआधी आपले स्पर्म गोठवण्याचं ठरवलं. निकला हॉजकिन्स लिंफोमा नावाच्या कॅन्सरने ग्रासलं होतं.

निकची पत्नी जेर्गाना यांनी आयव्हीएफ उपचार घेतले. त्यानंतर त्यांचा मुलगा ब्रॅनिमीरचा जन्म झाला.

“मी 24 वर्षांचा असताना स्पर्म गोठवायला हो म्हणालो नसतो तर मी आज एका सुंदरशा गोडूल्याचा बाबा नसतो झालो.”

निकला जेव्हा त्यांच्या मानेवर गाठ दिसली तेव्हा ते अविवाहित होते आणि एकटेच राहात होते.

हळूहळू हा कॅन्सर त्यांच्या फुप्फुसात आणि बोनमॅरोपर्यंत पोचला. त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की किमोथेरेपीमुळे त्यांना वंधत्व येईल आणि कधी मुलं होऊ शकणार नाहीत. कारण किमोथेरेपी स्पर्म काऊंट कमी करते.

निक यांना ब्राऊन हॉल या वंध्यत्व उपचार संस्थेत पाठवण्यात आलं. तिथे त्यांचे स्पर्म गोठवण्यात आले ज्याचा खर्च सरकार आरोग्य योजनेतून झाला.

“मला कायम वाटायचं की मला स्वतःची मुलं असावीत. पण माझ्या आयुष्यातल्या त्या टप्प्यात मी जगतो की मरतो अशी परिस्थिती उद्भवली होती,” ते म्हणतात.

“एकतर कॅन्सरचं निदान झाल्यामुळे मला धक्का बसला होता त्यात जेव्हा मला हे कळलं की मला वंधत्व येईल तेव्हा मी कोसळून गेलो होतो. पण स्पर्म गोठवण्याचा पर्याय उत्तम होता. माझ्या भविष्याची ती तरतूद होती.”

निक, त्यांची पत्नी जेर्जिना आणि मुलगा ब्रॅनिमीर

फोटो स्रोत, FAMILY PHOTO

फोटो कॅप्शन, निक, त्यांची पत्नी जेर्जिना आणि मुलगा ब्रॅन

कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर निक पूर्णपणे बरे झाले आणि त्यांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आलं पण त्यांचा स्पर्म काऊंट ‘शून्य’ झाला होता.

2016 साली त्यांची भेट जेर्गानाशी झाली. त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी लग्न केलं आणि जानेवारी 2022 मध्ये त्यांनी आयव्हीएफ ट्रीटमेंटला सुरुवात केली.

“रोज सकाळी ब्रॅन त्याच्या बाबांना पाहातो तेव्हा प्रचंड खूश होतो. इतर कोणालाही पाहून तो इतका आनंदित होत नाही. त्यांच्यातलं नातं खूप खास आहे.”

बॉर्न हॉल क्लिनिकमधल्या मुख्य डॉक्टर डॉ अर्पिता रे म्हणतात, “ जेव्हा शक्य असेल तेव्हा किमोथेरेपीच्या आधी स्पर्म किंवा स्त्रीबीज गोठवल्यामुळे रुग्णांना भविष्यात आयव्हीएफ या तंत्रज्ञानाचा वापर करून मुलांना जन्म देणं शक्य होतं. अनेकदा किमोथेरेपीमुळे रुग्णांना वंधत्व येतं.”

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)