सेक्स आरोग्यः वीर्य-शुक्राणूंच्या बाबतीत या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

वीर्याबाबतीत या 9 गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

फोटो स्रोत, Getty Images

वीर्याबाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला फारशा माहिती नसतील. स्पर्म बँकेवर बीबीसीच्या माहितीपटावर आधारित 9 गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

1. सर्वच शुक्राणू जिंकत नाहीत

पुरुषाचे फक्त अर्धेच शुक्राणू सरळ रेषेत पोहतात. इथं शुक्राणू पोहणे याचा अर्थ ते सक्रीय असणे असा आहे. काही शुक्राणू चारही दिशांनी पोहतात किंवा वीर्यप्रवाहातून वेगळे होतात. म्हणजेच हे शुक्राणू कधी थांबत नाहीत आणि त्यांना दिशेचं भान नसतं.

2. सौंदर्यप्रसाधनांपासून सावधान

काही संशोधनांनुसार शुक्राणूंवर सनक्रीम आणि सौंदर्य प्रसाधनांचा वाईट परिणाम होतो. अर्थात अनेक शास्त्रज्ञांची अजूनही याला सहमती नाही.

3. युरेका

एका डच मायक्रोस्कोप निर्मात्याने 1677 साली स्पर्मच्या अस्तित्वाचा पहिला शोध लावला होता. त्यांनी कशासाठी याचा शोध लावला हे माहिती नाही. पण हे चकीत करणारं होतं.

4. स्पर्म सँपल

साधारणतः स्पर्म सँपल 30 लाखांचा असतो. जे साधारणतः एका टी स्पूनच्या दोन तृतियांश इतके असते.

5. उत्पादन

साधारणतः पुरुष एका सेकंदात 1500 वीर्यपेशी तयार करतात.

वीर्य

फोटो स्रोत, Getty Images

6. 6 मैल लांब रांग

जर एकाचवेळेस आयुष्यातले सर्व स्पर्म बाहेर आले तर त्यांची एकत्र लांबी 6 मैल होऊ शकते.

7. गरम होत असेल तर

उष्णतेमुळे स्पर्मची सक्रियता कमी होते. शरीराच्या तुलमेत शुक्राणू 7 अंश फॅरेनाइट थंड तापमानात राहातात. हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे. तंग चड्डीऐवजी बॉक्सर्स वापरल्या पाहिजेत. लॅपटॉप मांडीवर ठेवू नये.

8. सर्वच उपयोगी नाहीत

स्खलनातील 90 टक्के स्पर्म कामाचे नसतात.

9. लाखात एक

प्रत्यक्षात लाखांमध्ये एक स्पर्म महिलेच्या शरीरातून अंडाणूशी मीलन करुन प्रजनन करतो.

शुक्राणू आणि चड्डीचा प्रकार

एका अभ्यासानुसार सैल चड्ड्या घालून वावरणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांपेक्षा 25 टक्के जास्त आढळली आहे.

अमेरिकेच्या Harvard TH Chan School of Public Health मध्ये झालेल्या एका अभ्यासातून ही बाब पुढे आली आहे. एकूण 656 पुरुषांनी सहभाग नोंदवलेला हा आजवरचा या विषयासंदर्भातला सर्वांत मोठा अभ्यास आहे.

सैल कपडे घातले की टेस्टिकल्स किंवा अंडकोशाभोवती हवा खेळती आणि थंड राहते. त्यामुळे फक्त आपण काय घालतो, यावरून बरंच काही बदलू शकतो, असं जाणकार सांगतात.

शुक्राणूंच्या निर्मितीसाठी 34 डिग्री सेल्सियसच्या आसपासचं तापमान संवेदनशील मानलं जातं. पुरुष जीन्स किंवा ट्राउझर पँटच्या आत टाईट अंडरवेअर घालतात.

यामुळे टेस्टिकल्स शरीराच्या अगदी जवळ धरले जातात आणि त्यांचं तापमान वाढतं. पण जर बर्मुडा किंवा बॉक्सर घातली की सगळं मोकळंचाकळं राहतं आणि तापमान थोडंफार कमी राहातं. जे शुक्राणू निर्मितीसाठी अनुकूल असतं.

कसा झाला अभ्यास?

Human Reproduction नावाच्या एका जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात काही पुरुषांची एका फर्टिलिटी क्लिनिकमध्ये नियमितपणे तपासणी करण्यात आली.

त्यादरम्यान त्यांच्या शुक्राणूंच्या संख्याबळावर परिणाम करणाऱ्या गोष्टी ध्यानात ठेवण्यात आल्या; उदाहरणार्थ, शरीरयष्टी, बॉडी मास इंडेक्स (BMI), धुम्रपा आणि आंघोळीच्या सवयीसुद्धा.

या अभ्यासाअंती असं लक्षात आलं की बर्मुडा किंवा बॉक्सर घालून येणाऱ्या पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या 17 टक्के जास्त आहे. तसंच त्यांचे शुक्राणू 33 टक्के अधिक सक्रिय आहेत. पण त्यांच्या शुक्राणूंचा आकार किंवा DNAच्या गुणवत्तेत यामुळे काही परिणाम झालेला नव्हता.

या अभ्यासातून निष्कर्ष हाच निघाला की शुक्राणूंच्या निर्मितीत पँटमधली उष्णता महत्त्वाची भूमिका बजावते. जीन्स घालणाऱ्या पुरुषांच्या जांघेत उष्णता जास्त असते तर बॉक्सरमध्ये वावरणाऱ्यांच्या जांघेत कमी.

पण हा अभ्यास फक्त शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्तेबाबत होता. पुरुषांच्या प्रजनन क्षमतेबद्दल नाही. म्हणून या अभ्यासात भाग घेतलेल्या सर्व पुरुषांची एकूण शुक्राणू संख्या सर्वंसामान्य होती.

पण मेंदू त्याचं काम करतोच

पुरुषांच्या टेस्टिकलमध्ये शुक्राणूंचं उत्पादन व्हावं, ही जबाबदारी आपला मेंदू Follicle Stimulating Hormone (FSH) कडे सोपवतो. जेव्हा टाईट अंडरवेअर घालणाऱ्या पुरुषांच्या जांघेत अंडकोशाभोवतीचं तापमान वाढतं, तेव्हा हेच हॉर्मोन कामाला लागतात आणि शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी टेस्टिकल्सना उत्तेजित करतात. म्हणून सैल अंडरवेअर घालणाऱ्यांमध्ये या हॉर्मोन्सची संख्या 14 टक्क्यांनी कमी आढळली, कारण मुळातच त्यांना याची कमी गरज असते.

शेफ्फील्ड विद्यापीठातले पुरुषरोगतज्ज्ञ प्रा. अॅलन पेसी (जे या अभ्यासात सहभागी नव्हते) म्हणाले की, "वेगवेगळ्या लोकांचा अभ्यास केल्यावर असं नक्कीच सांगू शकतो की जास्त घट्ट चड्ड्या घालणाऱ्या पुरुषांच्या टेस्टिकल्सना दुखापत झाली आहे."

पण प्रा. पेसी यांनी बीबीसीला सांगितलं, "जर काही पुरुषांचा स्पर्मकाउंट खूप अटीतटीचा असेल तर नक्कीच अशा पद्धतीने त्यांची संख्या सुधारू शकते. हा एक सहज शक्य असलेलं स्वस्त उपाय आहे."

पण वेळ किती लागतो?

"किमान तीन महिने लागतात तुमचे सगळे शुक्राणू पूर्णतः नव्याने तयार व्हायला," या अभ्यासाचे लेखक डॉ. जॉर्ज शवेरो सांगतात. "त्यामुळे तुम्ही थोडं आधीच या बदलासाठी तसं प्लॅनिंग करायला हवं."

सोबतच त्यांच्याकडे एक महत्त्वाचा संदेश आहे - "वंध्यत्व ही समस्या काही महिलांपुरती सिमित नाही, पुरुषांमध्येही ती तितक्याच प्रमाणात आढळते. मूल जन्माला घालण्यात पुरुषांच्या योगदानाबद्दल आपल्याला आणखी बरंच काही माहिती नाहीये. पण हे लक्षात घ्यायला हवं की या प्रक्रियेत दोघांचीही भूमिका तितकीच महत्त्वाची असते."

ISWOTY

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)