ICC क्रिकेट वर्ल्ड कप 2023 : वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक इथे वाचा, भारत पाकिस्तान मॅच होणार 'या' दिवशी

क्रिकेट वर्ल्डकप, भारत, पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा आणि बाबर आझम

बहुप्रतीक्षित अशा आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचं वेळापत्रक मुंबईत जाहीर करण्यात आलं. बहुचर्चित भारत-पाकिस्तान लढत 15 ऑक्टोबरला अहमदाबाद इथे होणार आहे. राज्यात मुंबई आणि पुणे या स्टेडियमवर विश्वचषकाचे सामने रंगणार आहेत.

आशिया चषकासाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नाही हे स्पष्ट झाल्यानंतर स्पर्धेसाठी हायब्रिड प्रारुप अवलंबण्यात आलं.

विश्वचषकासाठी पाकिस्तानचा संघ भारतात येऊन खेळणार का? यावरही प्रश्नचिन्ह होतं. भारत-पाकिस्तान ही बहुचर्चित लढत कुठे होणार यासाठी चाहते आतूर झाले आहेत.

5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विश्वचषक भारतातल्या विविध शहरांमध्ये सामने होतील. मुंबईत विश्वचषकाचं वेळापत्रक जाहीर होणार आहे.

भारतीय संघाची सलामीची लढत 8 ऑक्टोबरला चेन्नईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. यानंतर भारतीय संघ राजधानी दिल्लीत 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तानविरुद्ध खेळणार आहे. 14 ऑक्टोबरला भारतासमोर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचं आव्हान असणार आहे. 19 तारखेला पुण्यात भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध खेळेल. यानंतर 22 तारखेला भारत-न्यूझीलंड सामना निसर्गरम्य धरमशाला इथे होईल. 29 ऑक्टोबरला भारत आणि इंग्लंडचे संघ लखनौत आमनेसामने येतील. 2 आणि 12 नोव्हेंबरला भारताची लढत पात्रता फेरीतून पात्र ठरणाऱ्या संघाशी होणार आहे.

विश्वचषकाची सलामीची लढत 5 ऑक्टोबरला गतविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीने अहमदाबाद इथे होणार आहे.

विश्वचषकाचा फॉरमॅट यंदा सोपा करण्यात आला आहे. प्राथमिक फेरीत सगळे संघ एकमेकांविरुद्ध खेळतील. 4 अव्वल संघ सेमी फायनलसाठी पात्र ठरतील.

सेमी फायनलमधले 2 विजयी संघ फायनलमध्ये खेळतील. फायनल 19 नोव्हेंबरला अहमदाबाद इथे नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. प्राथमिक फेरीचे 45, सेमी फायनलचे 2 आणि फायनल असे एकूम 48 सामने होणार आहेत.

विश्वचषक

विश्वचषक 2023 संपूर्ण वेळापत्रक

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

5 ऑक्टोबर- इंग्लंड वि. न्यूझीलंड- अहमदाबाद

6 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. नेदरलँड्स - हैदराबाद

7 ऑक्टोबर- बांगलादेश वि. अफगाणिस्तान- धरमशाला

7 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका वि. श्रीलंका - दिल्ली

8 ऑक्टोबर- भारत वि. ऑस्ट्रेलिया- चेन्नई

9 ऑक्टोबर- न्यूझीलंड वि. नेदरलँड्स- हैदराबाद

10 ऑक्टोबर- इंग्लंड वि. बांगलादेश- धरमशाला

10 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. श्रीलंका - हैदराबाद

11 ऑक्टोबर- भारत वि. अफगाणिस्तान- दिल्ली

12 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. दक्षिण आफ्रिका- लखनौ

13 ऑक्टोबर- बांगलादेश वि. न्यूझीलंड - चेन्नई

14 ऑक्टोबर- भारत वि. पाकिस्तान - अहमदाबाद

15 ऑक्टोबर - अफगाणिस्तान वि. इंग्लंड - दिल्ली

16 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका - लखनौ

17 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका वि. नेदरलँड्स- धरमशाला

18 ऑक्टोबर- न्यूझीलंड वि. अफगाणिस्तान- चेन्नई

19 ऑक्टोबर- भारत वि. बांगलादेश-पुणे

20 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान- बंगळुरू

21 ऑक्टोबर- श्रीलंका वि. नेदरलँड्स - लखनौ

21 ऑक्टोबर- इंग्लंड वि. दक्षिण आफ्रिका- मुंबई

22 ऑक्टोबर- भारत वि. न्यूझीलंड-धरमशाला

23 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. अफगाणिस्तान- चेन्नई

24 ऑक्टोबर- दक्षिण आफ्रिका वि. बांगलादेश- मुंबई

25 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. नेदरलँड्स - दिल्ली

26 ऑक्टोबर- इंग्लंड वि. श्रीलंका - बंगळुरू

27 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. दक्षिण आफ्रिका- चेन्नई

28 ऑक्टोबर- नेदरलँड्स वि. बांगलादेश- कोलकाता

28 ऑक्टोबर- ऑस्ट्रेलिया वि. न्यूझीलंड- धरमशाला

29 ऑक्टोबर- भारत वि. इंग्लंड- लखनौ

30 ऑक्टोबर- अफगाणिस्तान वि. श्रीलंका - पुणे

31 ऑक्टोबर- पाकिस्तान वि. बांगलादेश- कोलकाता

1 नोव्हेंबर- न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका- पुणे

2 नोव्हेंबर- भारत वि. श्रीलंका - मुंबई

3 नोव्हेंबर- नेदरलँड्स वि. अफगाणिस्तान- लखनौ

4 नोव्हेंबर- न्यूझीलंड वि. पाकिस्तान- बंगळुरू

4 नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड - अहमदाबाद

5 नोव्हेंबर- भारत वि. दक्षिण आफ्रिका- कोलकाता

6 नोव्हेंबर- बांगलादेश वि. श्रीलंका - दिल्ली

7 नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया वि. अफगाणिस्तान- मुंबई

8 नोव्हेंबर- इंग्लंड वि. नेदरलँड्स - पुणे

9 नोव्हेंबर- न्यूझीलंड वि. श्रीलंका - बंगळुरू

10 नोव्हेंबर- दक्षिण आफ्रिका वि. अफगाणिस्तान- अहमदाबाद

11 नोव्हेंबर- ऑस्ट्रेलिया वि. बांग्लादेश - पुणे

11 नोव्हेंबर- इंग्लंड वि. पाकिस्तान - कोलकाता

12 नोव्हेंबर- भारत वि. नेदरलँड्स - कोलकाता

15 नोव्हेंबर- सेमी फायनल- मुंबई

16 नोव्हेंबर- सेमी फायनल- कोलकाता

19 नोव्हेंबर- फायनल-अहमदाबाद

विश्वचषकात भारत-पाकिस्तान लढत नेहमीच चर्चेचा केंद्रबिंदू असते. यंदाचा विश्वचषक त्याला अपवाद नाही. वनडे विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान 7 वेळा एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत.

सातही सामन्यात भारताने विजयासह वर्चस्व गाजवलं आहे. 1996 विश्वचषकात भारत-पाकिस्तान लढतीचा मान बंगळुरूला मिळाला होता. 2011 विश्वचषकात भारत-पाकिस्तान लढत मोहालीत झाली होती.

विश्वचषकातील उपांत्य फेरीचे सामने मुंबई आणि कोलकाता इथे होण्याची शक्यता आहे. 2011 विश्वचषकावेळी फायनल मुंबईत झाली होती. 1987 मध्ये भारत आणि पाकिस्तान विश्वचषकाचे संयुक्त यजमान होते. 1996 साली भारत, पाकिस्तान आणि श्रीलंका यांनी विश्वचषकाचं संयुक्त नियोजन केलं होतं. 2011 मध्ये भारत, श्रीलंका आणि बांगलादेश विश्वचषकाचे यजमान होते.

दुरावलेल्या संबंधांमुळे भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळत नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही.

आयसीसी स्पर्धांवेळी म्हणजेच वनडे विश्वचषक, ट्वेन्टी20 विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी अशावेळी पाकिस्तानचा संघ भारतात येऊन खेळतो. या सामन्यासाठी अभूतपूर्व अशी सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात येते. 2013 मध्ये पाकिस्तानचा संघ द्वपक्षीय मालिकेसाठी भारतात आला होता.

यजमान भारतासह अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका हे संघ विश्वचषकासाठी क्रमवारीतील स्थानानुसार पात्र ठरले आहेत.

अन्य दोन स्थानांसाठी सध्या पात्रता फेरीचे सामने सुरू आहेत. वेस्ट इंडिज आणि श्रीलंका संघ यांना लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने त्यांना पात्रता फेरीत खेळावे लागत आहे.

क्रिकेट वर्ल्डकप, भारत, पाकिस्तान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय संघाने 2011 मध्ये विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता.

भारतीय संघाने 1983 साली विश्वचषक पटकावत चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. त्यानंतर तब्बल 28 वर्षानंतर महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विश्वविजेतेपदावर कब्जा केला होता.

विश्वचषक विजेते

1975- वेस्ट इंडिज

1979- वेस्ट इंडिज

1983- भारत

1987- ऑस्ट्रेलिया

1992- पाकिस्तान

1996- श्रीलंका

1999- ऑस्ट्रेलिया

2003- ऑस्ट्रेलिया

2007- ऑस्ट्रेलिया

2011- भारत

2015- ऑस्ट्रेलिया

2019- इंग्लंड

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)