तुर्की : इस्तंबूलमध्ये स्फोट, 6 जणांचा मृत्यू, 53 जण जखमी

तुर्कीयेमधील इस्तंबूल शहरात एका शॉपिंग मॉलमध्ये मोठा स्फोट झाल्याची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.

स्थानिक गव्हर्नरनी या घटनेची माहिती देताना जीवितहानीबाबत आकडेवारीही सांगितली आहे.

तुर्कीयेच्या माध्यमांमधील बातम्यांनुसार, या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला. तर, 53 जण जखमी झाले आहेत.

मात्र, तुर्कीयेच्या प्रशासनाला अद्याप स्फोटाचं नेमकं अद्याप सापडलेलं नाही.

तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेचेप तैप्पप अर्दोआन यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली.

स्फोटातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले.

स्फोटानंतर आपत्कालीन विभागाच्या लोकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

इस्तंबूलचे गव्हर्नर अली यरलियाका यांनी स्फोटाबाबत माहिती देताना म्हटलं,

"स्फोट स्थानिक प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 4 वाजून 20 मिनिटांनी झाला. इस्तांबूलमधील इस्तिकलाल स्ट्रीट परिसरात ही घटना घडली."

बीबीसी तुर्की सेवेच्या माहितीनुसार, सध्या पोलिसांनी घटनास्थळाची नाकाबंदी केली आहे. TRT आणि इतर माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार, स्फोट झालेल्या ठिकाणी नेहमी लोकांची गर्दी असते. स्फोट झाला त्यावेळीसुद्धा लोक मोठ्या संख्येने तिथे उपस्थित होते.

स्फोटात जखमी झालेल्या लोकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिथे मोठ्या प्रमाणात रक्त पुरवठाही करण्यात येत आहे.

सध्या तरी स्थानिक प्रशासनाने या स्फोटाच्या कव्हरेजवर निर्बंध घातले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुकइन्स्टाग्रामयूट्यूबट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)