सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातल्या गणपती अथर्वशीर्षाच्या कोर्समुळे वाद का झालाय?

पुणे विद्यापीठ
    • Author, मानसी देशपांडे
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, पुण्याहून

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संस्कृत प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गणपती अथर्वशीर्षवरच्या सर्टिफिकेट कोर्सला सुरुवात झाली आहे.

हा कोर्स सुरू करण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. 16 नोव्हेंबर रोजी याची घोषणा करण्यात आली.

महत्त्वाचं म्हणजे हा कोर्स पुर्ण केल्यानंकर विद्यार्थ्यांना एक क्रेडिट पाॅइंटही मिळणार आहे. ट्रस्टकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार आहे.

पण या कोर्सवरून आता वाद निर्माण होण्याचीही चिन्हं आहेत. लेखक आणि विचारवंत हरी नरके यांनी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या कोर्सवर टीका केली.

हरी नरकेंचे आक्षेप काय?

माध्यमांशी बोलताना हरी नरके म्हणाले की, एखाद्या विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करावा हे अतिशय दुर्दैवी आहे.

"सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गणपती अथर्वशीर्ष हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केल्याची बातमी आज वर्तमानपत्रांमध्ये आलेली आहे. एखाद्या विद्यापीठाने असा अभ्यासक्रम सुरू करावा हे अतिशय दूर्दैवी आहे."

"एकतर पुणे शहराला ज्ञानार्जनाची मोठी परंपरा आहे. विज्ञाननिष्ठेची परंपरा आहे. त्याचबरोबर या विद्यापीठाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलेलं आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 नुसार विज्ञाननिष्ठेचा प्रचार आणि प्रसार करणं हे प्रत्येक नागरिकाचं आणि संस्थांचं कर्तव्य असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासारख्या एका जबाबदार विद्यापीठाने एका खाजगी संस्थेबरोबर असा अभ्यासक्रम सुरू करणं हे मला स्वतःला अनुचित वाटतं."

प्रमाणपत्र देणं, विद्यापीठाच्या सही शिक्क्याचं प्रमाणपत्र मिळणं यामुळे अनिष्ट पायंडा पडत आहे. मला स्वतःला ही गोष्ट विज्ञाननिष्ठेच्या संदर्भात गंभीर वाटते," असं हरी नरके यांनी म्हटलं.

दगडूशेठ गणपती
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मिळालेल्या माहितीनुसार हा कोर्स ऑनलाईन करता येणार आहे. अथर्वशीर्षाचं अर्थाचे विवेचन असणारे व्हीडिओ ट्रस्टच्या यू टयूब चॅनलवर आहेत.

ट्रस्टने दिलेल्या सांगितल्यानुसार अथर्वशीर्षाचे 21 भाग आहेत. कोर्समध्ये त्याच्यासोबत एक प्रश्नमालिका येणार आहे. त्याची उत्तरे दिल्यानंतर पुढील भाग पाहता येणार असून ती पूर्ण केल्यानंतर ई मेलवर सर्टिफिकेट मिळणार आहे.

जेव्हा हा कोर्स सुरू करण्यात आला तेव्हा यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे उपस्थित होते. या उपक्रमाचं कारभारी काळे यांनी कौतुक केलं होतं.

तेव्हा बोलताना कुलगूरू म्हणाले होते की, "तरुण पिढीमध्ये एकविसाव्या शतकात या उपक्रमाची फार गरज आहे. मला वाटतं हा उपक्रम सर्व विद्यापीठांनी त्यांच्या त्यांच्या परिने राबवावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांना एक पाॅजिटीव्ह एनर्जी आणि एक पॉझिटिव्ह डायरेक्शन मिळेल.

"आपण आग्रह करत नाही की त्यांनी हाच मंत्र म्हणाला किंवा तो मंत्र म्हणावा. परंतु अध्यात्माची जोड विज्ञानाबरोबर दर घातली तर त्यांचा मानसिक विकास होईल. त्यांचं मन सुदृढ होईल. त्यांच्या हातून जगाची, देशाची आणि कुटूंबाची सेवा घडेल असं मला वाटतं.

तर हा नुसताच अभ्यासक्रम म्हणून नाहीये किंवा पुजापाठ म्हणून नाही तर याचं श्रेयांकन तुमच्या क्रेडीटमध्ये होईल ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. भारत आणि महाराष्ट्र सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबलं आहे. भारताची आपली परंपरा आहे.

या उपक्रमांत नुसताच वेळ वाया जाणार नाही. तर तुमच्या डिग्री बरोबर याचं एक श्रेयांकसुद्धा मिळणार आहे. गणपती बाप्पा ट्रस्टचं नाव त्या सर्टीफिकेटवर सुद्धा येणार आहे. मराठवाड्यात एक संत विद्यापीठ होऊ घातलेलं आहे.

असे कोर्स त्याला सुद्धा लिॅक करुन द्यावेत आणि विद्यार्थ्यांचा फायदा करुन द्यावा. हे फक्त एसपीपीयू पुरतं मर्यादित न ठेवता या मंत्राचं महत्त्व पुर्ण महाराष्ट्रात आणि भारताबाहेर सुद्धा या मंत्राचं महत्त्व त्याचं डेडीकेशन आणि त्यांना होणारे शारिरिक आणि मानसिक फायदे हे जर विद्यार्थ्यांपर्यंत गेले तर मला वाटतं जाती पातीच्या भिंती सोडून विद्यार्थी त्यात सहभाग घेतील," असंही त्यांनी म्हटलं होतं.

आतापर्यंत किती विद्यार्थांनी हा कोर्स केला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही.

या संपूर्ण प्रकरणी आम्ही विद्यापीठाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण विद्यापीठाने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांची प्रतिक्रिया आल्यावर बातमीत अपडेट केली जाईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)