भूतबाधा काढण्यासाठी मांत्रिकाने झोडपले,भूत नाही पण चिमुरड्याचा जीव गेला

मांत्रिक, अंधश्रद्धा, गुन्हा, लहान मुलं
फोटो कॅप्शन, आर्यन लांडगे या मुलाचा मांत्रिकाच्या मारहाणीत मृत्यू झाला
    • Author, सर्फराज सनदी
    • Role, बीबीसी मराठीसाठी
    • Reporting from, सांगली

ताप आणि झोपेतली बडबड यामुळे भूतबाधा झाली असं वाटून चिमुरड्याला मांत्रिकाकडे नेण्यात आलं. मांत्रिकाने भूत उतरवण्यासाठी चिमुरड्याला मारहाण केली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मारहाणीत चिमुरड्याने जीव गमावला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात सांगली जिल्ह्यातल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

14 वर्षीय आर्यन दीपक लांडगेला काही दिवसांपासून ताप येत होता, तापामुळे तो झोपेत बडबडत होता,त्याची ही बडबड ऐकून घरच्यांना आर्यनला भूतबाधा झाली आहे,असा संशय निर्माण झाला. यातून आर्यनच्या आईने त्याला आपल्या भावाच्या पत्नीच्या सांगण्यावरून भूतबाधा काढण्यासाठी कर्नाटकच्या एका गावात पाठवले, जिथे आर्यनला भूतबाधा झाली आहे,या संशयातून देवर्षी असणाऱ्या आप्पासो कांबळे यांनी मारहाण केली.

यानंतर प्रकृती बिघडल्याने आर्यनला सांगलीच्या मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं,मात्र उपचार सुरू असताना चिमुरड्या आर्यनचा मृत्यू झाला. आर्यनचं कुटुंब सांगली जिल्ह्यातल्या कवठेमहाकाळ तालुक्यातल्या इरळी गावामध्ये मोल मजुरी करून जगतं. या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मांत्रिक, अंधश्रद्धा, गुन्हा, लहान मुलं
फोटो कॅप्शन, आर्यन लांडगे

इरळी गावात एका छोट्याशा गावात मातीच्या घरामध्ये कविता लांडगे दोन मुलांसह राहतात. त्यांना आर्यन (वय 14) आणि अस्मिता (वय 16) अशी दोन मुलं आहेत. 19 मे 2019 रोजी कविता यांचे पती दीपक लांडगे यांचा आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर कविता लांडगे मोलमजुरी करून आपल्या मुलांचं पालनपोषण करतात.

या घटनेबद्दल बोलताना आर्यनची आई कविता लांडगे म्हणाल्या, “10 मेला आर्यनला ताप आला. त्याचं सगळं अंग दुखायला लागलं. मग मी त्याला घेऊन माझी बहीण राहते त्या मिरज तालुक्यातल्या एरंडोली गावात गेले. दुसऱ्या दिवशी एका खाजगी दवाखान्यात उपचार करून घेतले.”

“मग दोन्ही मुलांना घेऊन कर्नाटकातल्या शिवनूर इथे असणाऱ्या माझ्या माहेरी गेले. पण आर्यनच्या प्रकृतीत फरक पडला नाही.”

यानंतर कविता यांच्या भावाने आर्यनला परत दवाखान्यात नेलं. पण त्या रात्री आर्यनला जास्त ताप भरला. तो झोपेत बडबडू लागला. त्यामुळे कविता आणि त्यांच्या भावजयीला आर्यनला भूतबाधा झाली आहे असं वाटलं.

मांत्रिक, अंधश्रद्धा, गुन्हा, लहान मुलं
फोटो कॅप्शन, आर्यनचं घर

कविता म्हणतात, “आर्यन रात्रभर झोपेत बडबडत होता. त्याची तब्येतही ठीक होत नव्हती, त्यामुळे आम्हाला भूतबाधेचा संशय आला. माझी भावजयी म्हणाली की तिचे वडील आप्पासो कांबळे देवर्षी आहेत आणि भूतबाधा काढण्याचं काम करतात. आपण त्यांच्याकडे आर्यनला घेऊन जाऊया.”

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुसऱ्या दिवशी कविता यांचा भाऊ आणि भावजयी दुचाकीवरून आर्यनला घेऊन कुडचीजवळ असणाऱ्या रायबाग तालुक्यातल्या शिरगुर या ठिकाणी गेले.

कविता म्हणतात, “माझ्या अडचणीमुळे मी तिकडे जाऊ शकले नाही.”

कविता म्हणतात, “आर्यन रात्रभर झोपेत बडबडत होता. त्याची तब्येतही ठीक होत नव्हती, त्यामुळे आम्हाला भूतबाधेचा संशय आला. माझी भावजयी म्हणाली की तिचे वडील आप्पासो कांबळे देवर्षी आहेत आणि भूतबाधा काढण्याचं काम करतात. आपण त्यांच्याकडे आर्यनला घेऊन जाऊया.”

दुसऱ्या दिवशी कविता यांचा भाऊ आणि भावजयी दुचाकीवरून आर्यनला घेऊन कुडचीजवळ असणाऱ्या रायबाग तालुक्यातल्या शिरगुर या ठिकाणी गेले.

कविता म्हणतात, “माझ्या अडचणीमुळे मी तिकडे जाऊ शकले नाही.”

थोड्यावेळाने कविताने आपल्या भावजयीशी संपर्क साधला आणि आर्यनच्या तब्येतीची चौकशी केली.

भावजयीने सांगितलं की आप्पासो कांबळेंनी ‘आर्यनला (त्याच्या शरीरात असणाऱ्या कथित भूताला उद्देशून) तू कोण आहे’ असं विचारलं असता त्याने ‘आपण इरळीचे असून आर्यनचे वडील’ असल्याचं सांगितलं.

कविता म्हणतात, “मग मी माझ्या बहिणीला सांगितलं की तू शिरगुरला जाऊन आर्यनला घेऊन ये. माझी बहीण तिथे पोहोचली असता तिला आर्यनच्या अंगावर मारहाणीचे वळ दिसले. बहिणीने माझं आर्यनशीही फोनवरून बोलणं करून दिलं तर तो रडत रडत म्हणाला की मला दवाखान्यात घेऊन जा.”

यानंतर आर्यनला जवळच्या अथणी गावातल्या एका रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी सांगितलं की याला तातडीने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात घेऊन जा. मिरजेच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरू असताना 19 मे ला त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं असं कविता यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

19 मे 2023 रोजी ही घटना घडली होती,यानंतर या घटनेची प्राथमिक नोंद मिरजेच्या महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यामध्ये झाली होती,महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर भालेराव यांच्याशी संपर्क साधला असता,या घडलेल्या घटनेबाबत आपल्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिरज शासकीय रुग्णालय येत असल्याने मृत्यूची प्राथमिक नोंद झाली.

मात्र मृत्यूच्या नेमकं कारण हे स्पष्ट झाले नाही,याबाबत आर्यन लांडगे याचा व्हीसेरा हा रुग्णालय प्रशासनाकडून राखून ठेवण्यात आला आहे,असं सांगितलं आहे.

मांत्रिक, अंधश्रद्धा, गुन्हा, लहान मुलं
फोटो कॅप्शन, आर्यनची आई

या प्रकाराची माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाल्यानंतर, त्यांनी या प्रकरणी संबंधित लांडगे कुटुंबांशी संपर्क साधला. कविता लांडगे या प्रचंड मानसिक दबावाखाली होत्या, कुटुंबातल्याच नातेवाईकांच्या माध्यमातून आर्यन याचा अंधश्रद्धेतून बळी गेला होता.त्यामुळे तक्रार दाखल करण्यासाठी त्या धजावात नव्हत्या,असं अनिसचे कार्यकर्ते फारूक गवंडी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. त्यानंतर लांडगे कुटुंबाला धीर देऊन कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये याबाबतची प्राथमिक तक्रार दाखल करण्यासाठी आर्यनच्या आई कविता लांडगे यांना धीर देण्यात आला.

त्यानंतर त्यांनी नात्यातील मांत्रिकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.पण घडलेला प्रकार हा सर्व अंधश्रद्धेतून घडला आहे,हे खूप धक्कादायक असून समाजात अजूनही अंधश्रद्धा कितपत पाय घट्ट रोवून आहे,हे यातून पाहायला मिळतं,असं मत अंनिसचे कार्यकर्ते फारूक गवंडी यांनी व्यक्त केलं आहे.

कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे म्हणाले, "आर्यन दीपक लांडगे- वय, 14 या मुलाच्या मृत्यूबाबत त्याची आई कविता लांडगे यांनी तक्रार दाखल केली आहे. यात त्यांनी म्हटलंय की ‘मुलाला भूतबाधा झाली म्हणून कर्नाटकमधल्या एका मांत्रिकाकडे त्याला नेण्यात आलं. भूत काढण्यासाठी म्हणून मांत्रिकाने त्या मुलाला मारहाण केली त्यामुळे आर्यन याचा मृत्यू झाला.’ त्यानुसार तक्रार दाखल करून,गुन्हा घडलेल्या कर्नाटक राज्यातल्या कुडची पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आली आहे, आता पुढचा तपास कुडची पोलीस करतील.”

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)