दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट, कारण शोधण्यासाठी तपास सुरू

नवी दिल्लीमध्ये इस्रायली दूतावासाजवळ स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे.

इस्रायली दूतावासाच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, 'दिल्ली पोलीस आणि सुरक्षा टीम या प्रकरणाचा तपास करत आहेत.'

इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, इस्रायली अधिकारी आपल्या भारतीय समकक्षांसह दूतावासाजवळ झालेल्या स्फोटाच्या कारणांच्या तपासामध्ये सहकार्य करत आहे.

या स्फोटांमुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कोणतीही इजा झाली नसल्याचंही इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितलं.

पीटीआय या वृत्तसंस्थेने दूतावासाजवळ असलेल्या सेंट्रल हिंदी ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या सुरक्षा रक्षकांसोबत संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास त्यांना स्फोटाचा आवाज आला. त्यांनी बाहेर येऊन पाहिलं तर एका झाडाजवळून धूर येत होता.

दिल्ली पोलिसांनी सांगितले की त्यांना घटनास्थळाजवळ एक पत्र सापडले आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)