पॅलेस्टाईनच्या मुलाचं ते स्वप्न, जे त्याच्या मृत्यूनंतर पूर्ण झालं...

पॅलेस्टाईन

फोटो स्रोत, Youtube

    • Author, एलिस कडी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अवनी एडूसचं युट्यूबवर प्रसिद्ध होण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न त्याच्या मृत्यूनंतर पूर्ण झालं आहे.

ऑगस्ट 2022 मध्ये पोस्ट केलेल्या एका व्हीडिओमध्ये मायक्रोफोन हातात घेऊन हसत आपल्या युट्यूब गेमिंग चॅनलसाठी असलेल्या महत्त्वाकांक्षेबद्दल तो बोलायचा.

त्यात तो म्हणतो, “तर मित्रांनो मी माझा परिचय देतो. मी गाझाचा आहे आणि 12 वर्षांचा पॅलेस्टिनी आहे. या चॅनलचं एकच उद्दिष्ट आहे. ते म्हणजे एक लाख, पाच लाख किंवा दहा लाख सबस्क्रायबर मिळवणं.”

त्याच्या शेवटच्या व्हीडिओच्या शेवटी तो त्यावेळी असलेल्या 1000 सबस्क्रायबर्सचा निरोप घेतो.

त्यानंतर एक वर्षानंतर अवनी युद्धात मारल्या गेलेल्या सुरुवातीच्या मुलांपैकी एक होता.

त्याचे नातेवाईक सांगतात की, सात ऑक्टोबरला इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्याच्या दिवशी अवनीचं घर बॉम्बस्फोटात उद्धवस्त झालं.

अवनीचा शेवटचा व्हीडिओ 40 लाख लोकांनी पाहिला आहे. त्याचा आणखी एक व्हीडिओ आहे. त्यात विना आवाजाचं रेसिंग, युद्ध आणि फुटबॉल खेळत आहेत. तो व्हीडिओ आतापर्यंत 10 लाख लोकांनी पाहिला आहे.

हे चॅनेल आतापर्यंत 15 लाख लोकांनी सबस्क्राईब केलं आहे. त्यांची काकू आला यांच्या मते, तो अतिशय आनंदी असायचा आणि त्याचा आत्मविश्वास दांडगा होता.

त्याच्या कुटुंबातील काही सदस्य त्याला 'इंजिनिअर अवनी' असं म्हणायचे, कारण त्याचं कॉम्प्युटरवर खूप प्रेम होतं.

इतरांसाठी 13 वर्षांसारखा हा गेमर एक प्रकारचं प्रतीक झाला आहे. त्याच्यामुळे गाझा पट्टीत मारल्या गेलेल्या मुलांची आठवण लोकांना होते.

त्याच्या व्हीडिओवर एकाने टिप्पणी केली आहे. “आम्हाला माफ कर. आम्ही तुला आधी ओळखलं असतं तर किती बरं झालं असतं.”

अचानक जोरदार स्फोट झाला

हमास प्रशासित आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युद्ध सुरू झाल्यानंतर आतापर्यंत 20 हजारपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी एक तृतीयांश बालक आहेत.

लहान मुलांसाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांची संस्था युनिसेफने गाझा पट्टीला लहान मुलांसाठी जगातली सगळ्यात धोकादायक जागा असं सांगितलं आहे.

ज्या दिवशी हमासवर हल्ला झाला, इस्रायलने त्याच दिवशी बॉम्बहल्ला सुरू केला. आला सांगतात की त्या दिवशी रात्री आठ वीस वाजता त्यांच्या फोनवर मित्रांचा एक मेसेज आला. त्यात लिहिलं होतं की अवनीच्या घरावर बाँब पडला आहे.

जैतून भागात तीन मजली इमारतीत त्याचं कुटुंब रहायचं. अवनी त्यातच एका मजल्यावर आपले आई वडील, दोन मोठ्या बहिणी, आणि दोन छोट्या भावांसकट रहायचा.

या हल्ल्याची दखल मानवी हक्क संघटना अमनेस्टी इंटरनॅशनलने घेतली होती.

कुटुंब

फोटो स्रोत, Family Potrait

अवनीचे काका मोहम्मद म्हणाले, “अचानक दोन बॉम्ब इमारतीवर येऊन पडले आणि त्यामुळे पूर्ण इमारत जमीनदोस्त झाली. माझी बायको आणि मी लकी होतो कारण आम्ही सर्वांत वरच्या मजल्यावर होतो.”

त्यांच्या एका शेजाऱ्याने सांगितलं की त्यांना हल्ल्याची कोणतीही पूर्वसूचना नव्हती. शेजारी म्हणाले की, अचानक जोरदार स्फोट झाला.”

या स्फोटावर इस्रायलच्या सैन्याने कोणतीही टिप्पणी केलेली नाही मात्र हे म्हटलं की सैन्याला लक्ष्य केलं होतं आणि हमास आसपास, खाली आणि घनदाट लोकसंख्या असलेल्या भागात काम करत होते.”

इस्रायलचे सैनिक म्हणाले, “त्यांच्या अभियानामुळे नागरिकांचं जे नुकसान झालं आहे त्यावर IDF ने शोक व्यक्त केला आहे. त्यातून धडे घेतले जातील आणि सुधारणा केल्या जातील. तसेच सर्व कारवाया कायद्याच्या चौकटीत राहून केल्या जातील.

शांत आणि सगळ्यांची मदत करणारा

जेव्हा आला यांना मेसेज आला, तेव्हा त्यांना विश्वास बसला नाही. मात्र, त्यांनी त्वरेने रुग्णालयाकडे धाव घेतली.

दक्षिण गाझामध्ये राहणाऱ्या आला यांनी आपल्या फेसबुक संदेशात म्हटलं, “तुम्हाला मृतदेह पाहायचा आहे का, असं त्यांनी विचारलं. मात्र, माझ्या नवऱ्याने नकार दिला. त्यांना वाटत होतं की, मी जेव्हा ते जिवंत होते तेव्हाच्या सुंदर चेहऱ्यांच्या आठवणीत राहावं.

आला म्हणतात की, त्या रात्री 15 मुलं मारली गेली त्यात अवनीचाही समावेश होता.

अवनी एक शांत आणि सगळ्यांना मदत करणारा मुलगा होता असं त्या सांगतात. अवनीचे वडील कॉम्प्युटर इंजिनिअर होते आणि ते त्याच्या वडिलांची नक्कल करायचे. ते लॅपटॉपचे सगळे भाग उघडायचे आणि प्रत्येक भाग जोडायचे.

अवनीने त्याच्या फेसबुक पेजवर एक फोटो टाकला आहे. त्यात तो ब्लॅकबोर्डवर त्याच्या वयाच्या मुलांसमोर एका कॉम्प्युटरचा मदरबोर्ड पकडून उभा आहे. तो लिटिल टीचर्स स्कीमत्या अंतर्गत आयोजित कार्यक्रमाच्या टेक्नॉलॉजी सत्राचं आयोजन करत होता. त्याच्या शाळेच्या फेसबुक पेजवर त्याने जिंकलेल्या अनेक पुरस्कारांचा उल्लेख आहे.

अवनी

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, अवनी
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्याच्या मृत्यूनंतर एका शिक्षकाने अवनीचा फोटो टाकला आणि लिहिलं, “सतत हसरा असणारा चेहरा.”

आलाच्या मते शाळेनंतर अवनीला त्याच्या कुटुंबीयांबरोबर वेळ घालवायला आवडत असे.

आला सांगतात की, एका रात्री त्यानी भावा बहिणींना चॉकलेट आणि कुरकुरे वाटले आणि पिक्चर पाहिला.

अवनीच्या मृत्यूआधी आला त्याला भेटली होती. तो किती मोठा होतोय अशी टिप्पणी केल्याची आठवणही त्या सांगतात.

अवनीला कॉम्प्युटर आणि गेमिंग आवडायचं आणि ज्यांना युट्युबर व्हायचं होतं अशा लोकांबद्दल त्याला आदर होता.

आला म्हणतात, “त्याला त्यांच्यासारखं व्हायचं होतं. त्याला फॉलोअर्स हवे होते.”

अवनीने त्याचं चॅनल जून 2020 मध्ये सुरू केलं होतं. त्याच्या व्हीडिओमध्ये फुटबॉल गेम, कार रेसिंग आणि युद्धाचे गेम्स होते.

एक दूरचे नातेवाईक अशरफ एडूस एक प्रोग्रामर आहेत आणि त्यांनी अनेक युट्यूब चॅनल सुरू करायला मदत केली आहे. ते सांगतात की अवनी त्यांना मदत करण्यासाठी संपर्क करायचे.

ऑगस्ट 2022 मध्ये एका मेसेजमध्ये, जो बीबीसीने शेअर केला होता. अवनी युट्यूबच्या टीप्ससाठी त्यांना ब्रदर अशरफ बोलवायचे.

ते कधी कधी आपल्या वडिलांपासून लपवून त्यांच्या फोनवरून अशरफला फोन करत होते.

चर्चेत असणाऱ्या युट्यूबरने वाहिली श्रद्धांजली

अशरफ सांगतात की, गेल्या वेळी अवनीच्या वडिलांनी त्यांना म्हटलं होतं, “अवनीकडे लक्ष ठेवा. त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्या. तो महत्त्वाकांक्षी आहे.”

अशरफ सांगतात, “माझा स्पर्धक होणं त्याचं स्वप्न होतं. त्याने एक युट्यूब चॅनल तयार केलं होतं. हे फार मोठं नव्हतं आणि त्याला फारसे व्ह्युजपण नव्हते. प्रत्येक स्टार्ट अप सुरुवातीला कठीणच असतं.”

ऑक्टोबरमध्ये अवनीच्या मृत्यूनंतर जेव्हा कुवैतचे गेमर अबोफ्लाह सकट अनेक स्थापित युट्युबर्सने त्यांच्या व्हीडिओमध्ये जागा दिली तर व्ह्युज वाढले.

एका व्हीडिओमध्ये अबोफ्लाह रडतात आणि कॅमेरापासून दूर जातात. त्याला 90 लाख वेळा पाहिलं गेलं.

त्यावे सोशल मीडियावर अवनीने पाठवलेला संदेश पाहिला.

अवनी

फोटो स्रोत, Facebook

त्यातील एका संदेशात तो म्हणतो, “पॅलेस्टाईनच्या थंडीला तोड नाही. इथलं वातावरण अतिशय चांगलं आहे. आम्ही सतत गोड दूध पीत आहोत. हे फार छान आहे. आम्ही भाजेलेले अक्रोड खात आहोत. मला अपेक्षा आहे तुम्ही पॅलेस्टाईनला याल.”

व्हीडिओमध्ये रडत असलेले अबोफ्लाह म्हणतात, “हा मुलगा त्या मुलांपैकी आहे जो त्यांच्याहून छोटा आहे. अल्लाहला वाटलं तर त्यांना स्वर्गातही स्थान मिळेल.”

अबोफ्लाहने ऑक्टोबरमध्ये पोस्ट केलेल्या एका व्हीडिओबद्दल बीबीसीला सांगितलं, “यात तो अगदी मनापासून बोलला होता. मी माझे अश्रू रोखू शकलो नाही. तो मला एक आदर्श मानायचा. माझ्या मनाला ते अगदी स्पर्शून गेलं.”

“तो उत्साहाने आपल्या चॅनलबद्दल सांगायचा. आता तो स्वर्गातही खूश असेल.”

(मुआथ अल खातिबचं यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)