आंग सान सू ची यांची पुन्हा नजरकैदेत रवानगी, एक वर्ष होत्या एकांतवासात

फोटो स्रोत, Getty Images
म्यानमारच्या सर्वोच्च नेत्या आंग सान सू ची यांची रवानगी आता नजरकैदेत करण्यात आली आहे. म्यानमार लष्कराने त्यांना 2021 मध्ये अटक केली होती.
सू ची यांना नाय प्यि ताव या शासकीय इमारतीत घेऊन जाण्यात आलं आहे, अशी माहिती तुरुंग अधिकाऱ्यांनी बीबीसी बर्मिजला दिली. त्यांनी एक वर्ष एकांतवासात घालवलं आहे.
78 वर्षीय सू ची सध्या 33 वर्षं कारावासाची शिक्षा भोगत आहे. त्यांना लष्कराने अटक केली होती.
त्यानंतर गेली दोन वर्षं त्यांच्याविषयी कोणतीही माहिती बाहेर आली नव्हती.
त्यांना तुरुंगातून बाहेर काढल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र हे सैन्यातर्फे एक सकारात्मक पाऊल असल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्या सुटकेसाठी सैन्यावर मोठा दबाव आणण्यात आला होता.
सू ची आजारी असल्याच्या अफवा होत्या. मात्र सैन्याने या बातम्यांचं खंडन केलं आहे. नाय प्यि ताव या तुरुंगातील अधिकाऱ्याने बीबीसी बर्मिजला दिलेल्या माहितीनुसार त्यांची तब्येत उत्तम आहे.
थायलंडच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही सू ची यांची भेट घेतल्याची माहिती दिली होती. मात्र त्यांच्या तब्येतीविषयी काहीही माहिती देण्यास नकार दिला होता.
सैन्याने सू ची आणि संसदेच्या कनिष्ठ सभागृहाचे सभापती टी खून म्यात यांची भेट सैन्याने घालून दिली होती अशी माहिती बीबीसी बर्मिजने दिली. मात्र त्याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही.
म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी उठावानंतर तिथे गृहयुद्ध झालं होतं. त्यात हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. सैन्यांवर घातलेल्या बंधनांमुळे हा उठाव थांबला नव्हता.
सू ची यांना उठावानंतर नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर गेल्या जून महिन्यात त्यांना एकांतवासात पाठवण्यात आलं होतं.
सू ची यांनी त्यांच्यावर असलेल्या आरोपांचा सातत्याने इन्कार केला आहे.
त्यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आलं आहे. लोकशाहीचा स्तंभ अशी त्यांची प्रतिमा आहे. 2010 मध्ये त्यांच्या सुटकेमुळे म्यानमार आणि संपूर्ण जगात आनंदाची लाट आली होती.
मात्र नंतर वांशिक हत्यांचं समर्थन केल्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. जेव्हा त्या सत्तेत होत्या तेव्हा रोहिंग्यांविरुद्ध मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








