FIFA World Cup : रोनाल्डोच्या करिअरचा सूर्य मावळतीला? पोर्तुगालच्या टीमला त्याची गरज नाही?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, फिल मॅकनल्टी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
सध्या फुटबॉल जगतात ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची चर्चा जोरावर आहे. त्याच्या नावाची चर्चा त्याच्या परफॉर्मन्समुळे असते. पण यावेळी स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्यात पोर्तुगालच्या या स्टार प्लेयरला मैदानात उतरवलंच नाही. त्यामुळे त्याच्या नावाच्या चर्चांनी वेग धरला.
शनिवारी (11 डिसेंबर) मोरक्कोविरूद्ध झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातही पोर्तुगालने फर्स्ट हाफमध्ये रोनाल्डोला मैदानात उतरवलं नाही. सेकंड हाफमध्ये तो मैदानात आला, पण गोल करून संघाला विजय मिळवून देण्यात मात्र अपयशी ठरला.
याआधी मँचेस्टर युनायटेड या इंग्लिश क्लबला रोनाल्डोची गरज नसल्याचे संकेत मिळाले होते. पण आता कतारमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकप मध्ये पोर्तुगालने सुद्धा रोनाल्डोला बाहेर बसवून त्याची गरज नसल्याचं दाखवून दिलंय.
पोर्तुगालच्या कोचने स्वित्झर्लंडविरूद्ध रोनाल्डोला बेंचवर बसवण्याचा जो प्रयोग केला तो पण सक्सेसफुल ठरला. पोर्तुगालचे कोच सँटोस यांनी जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्यांना भेटही मिळाली.
पोर्तुगालने स्वित्झर्लंडचा 6-1 असा पराभव केला.
मागच्या ग्रुप मॅचमध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध खेळताना सँटोसने रोनाल्डो ऐवजी गोन्सालो रामोसला मैदानात उतरवलं होतं. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला होता. पण रामोसला खेळवण्याचा फायदा झाला.
रामोसने स्वित्झर्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये शानदार हॅट्रिक केली आणि सगळीकडे रामोसचं कौतुक झालं.
या सगळ्यात 37 वर्षांच्या रोनाल्डोचा अहंकार मात्र दुखावला गेलाय. करियरच्या सुरुवातीला मँचेस्टर युनायटेडमध्ये असताना त्याचं भांडण सुरू होतं आणि भांडणातच ते संपलं.
आणि आता पोर्तुगालच्या टीमने जे केलंय, त्याची साधी कल्पनाही कोणी केली नसेल. पोर्तुगालने रोनाल्डोसोबत खेळलेल्या 31 मॅचेस आणि युरो 2008 बघता, पोर्तुगाल आणि रोनाल्डो समीकरण बिनसलेलं दिसतंय.
पोर्तुगीलच्या कोचने घेतलेला धाडसी निर्णय
कतारमध्ये सुरू असलेल्या या फुटबॉलच्या सर्वात मोठ्या टूर्नामेंट मध्ये पोर्तुगालने रोनाल्डोला स्टार्टिंग लाइन-अप पासून लांब ठेवलंय.
वर्ल्डकप मध्ये एखाद्या खेळाडूच्या सिलेक्शन बाबतीत असा निर्णय घेणं धाडसीपणाचं आहे. सँटोस मागच्या आठ वर्षांपासून पोर्तुगालचे कोच आहेत. त्यांच्या कोचिंग करियरमधला हा सर्वात मोठा निर्णय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
युरो 2016 मध्ये पोर्तुगालने चांगली कामगिरी केल्याबद्दल सँटोस यांची वाहवा झाली. जर पोर्तुगाल या वर्ल्डकप मधून हरून बाहेर पडला असता तर दोष ख्रिस्तियानो रोनाल्डोवर नाही तर सँटोसना दिला गेला असता.
पण तरीही मॅच सुरू असताना सँटोसच्या चेहऱ्यावर त्याच्या टीमविषयीचा आत्मविश्वास दिसत होता. दुसऱ्या बाजूला मॅच सुरू असताना पोर्तुगालचे खेळाडू एकदम चपळ आणि अॅटॅक मोडमध्ये असल्याचं दिसत होतं. अशा मॅचेस जेव्हा खेळवल्या जातात तेव्हा रोनाल्डो आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो.
स्वित्झर्लंडविरुद्धच्या या मॅचमध्ये पोर्तुगालने मिड फिल्डर असलेल्या बर्नार्डो सिल्वा आणि ब्रुनो फर्नांडिस यांच्या जोरावर जबरदस्त खेळी केली.

फोटो स्रोत, Getty Images
त्या दोघांमुळे बेनफिकाचा 21 वर्षीय स्ट्रायकर रामोसकडे बॉल पोहोचत राहिला. रामोसला अशा पद्धतीच्या गोल-स्कोअरिंग स्टेजचा जास्त अनुभव नाहीये. त्यामुळे रोनाल्डो नसल्यामुळे त्याच्यावर जे परफॉर्मन्स प्रेशर होतं ते त्याने लीलया पेललं.
दबक्या चालीत खेळणारा फेलिक्सही यावेळी मोकळ्या पध्दतीने खेळत होता.
रामोसने जी हॅट्रिक मारली ती एकदम कसलेल्या खेळाडूसारखी होती. त्याने केलेले गोल हे पोस्ट फिनिशच्या अगदी जवळून केलेत. प्रत्येक वेळी त्याचा गोल स्विस गोलकीपरच्या डोक्यावरून गेलाय.
या गेमच्या आधी रोनाल्डो वर्ल्ड कप नॉकआऊट फुटबॉलमध्ये 514 मिनिटांचा गेम खेळला होता, पण या गेममध्ये त्याला एकही गोल करता आला नव्हता. रामोसने मात्र अवघ्या 67 मिनिटांच्या या गेममध्ये तीन गोल केले.
39 वर्षांचा डिफेंडर पेपेने या मॅचमध्ये दाखवून दिलं की, वयाचा काहीच फरक पडत नाही. त्याने दोन गोल केले. राफेल गुरेरोने चौथा गोल करून स्कोअर 4-0 वर नेऊन ठेवला.
रोनाल्डोच्या डोक्यात काय विचार सुरू होता?

फोटो स्रोत, Getty Images
या संपूर्ण मॅचमध्ये रोनाल्डो बेंचवर बसलेला असताना कॅमेऱ्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कैद केले. मँचेस्टर युनायटेडनंतर आता पोर्तुगालमधलीही कारकीर्दही संपल्याचे भाव पोर्तुगालच्या स्टार खेळाडूच्या चेहऱ्यावर तरळत होते.
पोर्तुगालचं राष्ट्रगीत संपताच त्याला शेकडो कॅमेरामननी घेरलं. तो नसतानाही पोर्तुगालने स्वित्झर्लंडला वाईट पद्धतीने हरवून आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं होतं.
रोनाल्डोला बघण्यासाठी जे लोक पैसे खर्च करून आले होते तेच लोक चिअरअप करताना दिसत होते.
रामोसमुळे पोर्तुगालचा 5-1 असा स्कोअर झाला, तेव्हा लुसेल स्टेडियम 'रोनाल्डो-रोनाल्डो' अशा घोषणांनी दुमदुमलं होतं. गोल केल्यानंतर रोनाल्डो सुद्धा 'सियू-सियू' म्हणत सेलिब्रेशन करत होता. त्याच्या या सिग्नेचर स्टाइलने स्टेडियममध्ये एकदम कल्ला सुरू होता.
रोनाल्डोच्या नावाचा जयजयकार करणाऱ्यांमध्ये त्याचे स्विस फॅन्सही असावेत. त्यांना कदाचित असं वाटलं असेल की या जयघोषामुळे सँटोस स्वित्झर्लंडच्या टीमसाठी व्हिलन ठरलेल्या रामोसला हटवेल. शेवटची 16 मिनिटं उरली असताना जोआओ फेलिक्सच्या जागी रोनाल्डो मैदानात आला. त्याचं स्वागत अगदी पॉप स्टारच्या अंदाजात झालं.
बॉल रोनाल्डोकडे आला की, प्रेक्षकांना वाटायचं आता काहीतरी जादू होईल. रोनाल्डोची ही जादू पाहायला लोक उतावळे झाले होते. आणि तो क्षण आलाच होता, इतक्यात रेफ्रीने ऑफसाइड फ्लॅग दाखवला.
हे खूपच विचित्र घडलं होतं. म्हणजे रोनाल्डोला अशा पद्धतीने एका नॉक आउट मॅचमध्ये स्थान मिळणं निरर्थक वाटत होतं. कदाचित हा करिअर संपत असल्याचा इशारा होता.
खरंच रोनाल्डोचं करिअर उतरणीला लागलंय का?
अगदी थोड्याच वेळासाठी रोनाल्डोला मैदानात उतरवलं होतं. पण या थोड्या वेळाची हवा काढून घेतली एका राफेल लिओ नावाच्या तरुण पोर्तुगाली स्ट्रायकरने. रोनाल्डो मैदानात असतानाच लिओने सहावा गोल केला.
फायनलची शिट्टी वाजताच रोनाल्डोने प्रेक्षकांना चिअरअप केलं आणि त्याने स्टेडियम सोडलं.
या विजयावर फक्त त्याच्या पोर्तुगाली सहकाऱ्यांचा हक्क असावा अशा पद्धतीने रोनाल्डो निघून गेला.
या टूर्नामेंटमध्ये रोनाल्डो अजूनही त्याचं निर्णायक योगदान देऊ शकतो.
पण त्याला आता नव्या एका क्लबमध्ये एन्ट्री करायची आहे असं वाटतंय. पण मोरोक्कोविरुद्ध होणाऱ्या मॅचमध्ये तो पहिल्या 11 प्लेयर्स मध्ये दिसेल असं वाटत नाही.
आपल्या तापट स्वभावामुळे मँचेस्टर युनायटेडमधून हकालपट्टी झालेला रोनाल्डो आता स्वः शोधत असावा असं वाटतंय.
आता तर पोर्तुगालच्या संघातही आपल्याला स्थान उरलेलं नाही असं त्याला वाटत असावं.
एकेकाळी रोनाल्डो म्हणजे पोर्तुगालचं भविष्य असं म्हटलं जायचं. पण आता तो भूतकाळ बनत चाललाय.
भविष्यात रामोस आणि लिओ असे नवे स्टार्स पुढं यायला लागलेत. त्यामुळे आता क्लब आणि सोबतच देशाचा स्टार असलेल्या रोनाल्डोचं स्थान काय असणार हा ही प्रश्न आहेच. मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यात तो निदान बेंचवर तरी दिसेलच.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








