एम्बापे : अर्जेंटिनाच्या विजयातही फ्रान्सचा हा लढवय्या खेळाडू राहिला लक्षात

एम्बापे

फोटो स्रोत, Getty Images

गोल करण्याच्या अद्भुत क्षमतेच्या बळावर लिओनेल मेस्सीने अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून दिला. पण अर्जेंटिनाच्या विजयातही ठसठशीत लक्षात राहिला फ्रान्सचा 23वर्षीय लढवय्या एम्बापे.

79व्या मिनिटापर्यंत अर्जंटिनाची बॉलवर आणि पर्यायाने सामन्यावर घट्ट पकड होती. एम्बापेने गोल करत ही कोंडी फोडली. या विजयाचा जल्लोष ओसरतोय तोच एम्बापेने पुन्हा एकदा खणखणीत गोल केला.

अतिशय वेगवान पासवर एम्बापेने बॉलवर नियंत्रण मिळवलं आणि ताकदीचा प्रत्यय घडवत दिमाखदार गोल केला. एकतर्फी वाटणाऱ्या सामन्यात एम्बापेने जान फुंकली.

अर्जेंटिना सामना 3-2 असा जिंकणार असं वाटत असतानाच एम्बापेने आपली जादू दाखवत फ्रान्सला बरोबरी करुन दिली.

1966 नंतर वर्ल्डकप फायनलमध्ये हॅट्ट्रिक नोंदवणारा एम्बापे पहिलाच खेळाडू ठरला.

पेनल्टी शूटआऊटमध्येही एम्बापेने अर्जेंटिनाचा गोलकीपर मार्टिनेझला भेदत टिच्चून गोल केला.

अर्जेंटिनाला जिंकून देण्यासाठी मेस्सीने जीवाचं रान केलं तसंच किंबहुना त्याहून जास्त जीवाची बाजी एम्बापेने लावली.

विश्वविजेतेपदाचा नायक होण्याचं त्याचं स्वप्न अधुरंच राहिलं.

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या एम्बापेला गोल्डन बूट पुरस्काराने गौरवण्यात आलं.

चार वर्षांपूर्वी वर्ल्डकप स्पर्धेत एम्बापेला सर्वोत्कृष्ट युवा खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. तो पुरस्कार किती चपखल होता हे एम्बापेने यंदाच्या वर्ल्डकपमध्येही सिद्ध केलं.

एम्बापे

फोटो स्रोत, Getty Images

2018 चा फिफा वर्ल्ड कप...अर्जेंटिना आणि फ्रान्सदरम्यान रशियातल्या कझान एरिना स्टेडिअममध्ये रंगलेला सामना...हा तोच सामना होता, ज्यामुळे अर्जेंटिनाचं वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगलं.

या सामन्यानंतर अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीला कठोर टीकेला सामोरं जावं लागलं. दुसरीकडे फ्रान्सच्या 23 वर्षाच्या खेळाडूची चर्चा सुरू झाली. त्याला फुटबॉलचा पुढचा स्टार म्हटलं जाऊ लागलं. त्याचं नाव होतं किलियन एम्बापे.

अर्जेंटिना हा सामना 4-3 अशा फरकाने गमावला. फ्रान्सच्या या विजयात महत्त्वाची भूमिका होती एम्बापेची.

एम्बापेची खासियत आहे त्याचा वेग. तो एवढ्या वेगाने पळतो की, प्रतिस्पर्धी टीमचे डिफेंडर्स हतबल होऊन जातात. त्याचा धावण्याचा वेग जवळपास ताशी 35 किलोमीटर आहे.

एम्बापेच्या वेगाला आव्हान देणारेही आहेत, पण त्याच्याकडे वेगाबरोबरच गोल करण्याचं एक किलर इन्स्टिंक्टही आहे.

एम्बापेची तुलना ब्राझीलचे फुटबॉलपटू पेलेंसोबत केली जाऊ लागली. पेलेंनी वयाच्या 17 व्या वर्षीच 1958चा वर्ल्डकप गाजवला होता.

आज चार वर्षांनंतर एम्बापेने आपली पेलेंसोबत होणारी तुलना योग्य असल्याचं सिद्ध केलं.

फ्रान्सने रविवारी (4 डिसेंबर) वर्ल्ड-कपच्या उपउपांत्यपूर्व फेरीत पोलंडला 3-1 फरकानं हरवलं. एम्बापेनं या मॅचमध्ये एकापाठोपाठ एक दोन गोल केले. एक 74 व्या मिनिटाला आणि एक 90 व्या मिनिटाला.

फ्रान्सच्या टीमने झिनेदिन झिदान, मिशेल प्लातिनी, थिऑरी ऑन्री, जस्ट फॉन्टेन असे एकाहून एक सरस खेळाडू दिले आहेत. मात्र, यावेळी वर्ल्डकपमध्ये जीरू आणि एम्बापे हे फ्रान्सच्या टीममधले दोन असे खेळाडू आहेत जे फॉर्ममध्ये आहेत. पण मैदानात एम्बापेची जादू काही वेगळीच चाललीये. पोलंडविरूद्धच्या सामन्यात एम्बापेनं स्वतः तर दोन गोल केलेच, पण पहिला गोल करण्यात ऑलिव्हियर जीरूलाही मदत केली.

एम्बापे

फोटो स्रोत, Getty Images

 ‘मॅजिकल मॅच’ फिनिशर

सामन्याच्या शेवटच्या मिनिटांमध्ये गोल करण्याचं कौशल्य एम्बापेकडे आहे.

2018 मध्ये वर्ल्ड कप जिंकणाऱ्या फ्रान्सने क्रोएशियाला 4-2 ने हरवलं होतं. या सामन्यात एम्बापेनं 65 व्या मिनिटाला केलेला गोल हा ‘फिनिशर’ ठरला.

रविवारी (4 डिसेंबर) पोलंडविरुद्ध दोन करणारा एम्बापे वर्ल्ड कपमध्ये 9 गोल करणारा खेळाडू बनला आहे. MAGES

ही गोलसंख्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या वर्ल्ड कपमधली गोल संख्येपेक्षा जास्त आहे आणि लिओनल मेस्सीच्या रेकॉर्डची बरोबरी आहे. मेस्सीने वर्ल्ड कपच्या 23 सामन्यांमध्ये आतापर्यंत 9 गोल केले आहेत.

एम्बापे

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

2018 मध्ये आपला पहिला वर्ल्ड कप खेळणाऱ्या एम्बापेनं त्या स्पर्धेत चार गोल केले होते. त्याने आपला पहिला गोल पेरूविरुद्ध केला होता. त्याचबरोबर वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा फ्रान्सचा तो सर्वांत लहान खेळाडूही ठरला.

कतार वर्ल्ड कपमध्ये एम्बापेनं पहिला गोल ऑस्ट्रेलियाविरूद्ध केला. डेन्मार्कविरुद्धच्या सामन्यातही त्याचा फॉर्म कायम राहिला. फ्रान्सने डेन्मार्कवर 2-1 ने विजय मिळवला. या सामन्यातील दोन्ही गोल एम्बापेने केले होते.

ट्यूनिशियाविरुद्धच्या मॅचमध्ये फ्रान्स 0-1 नं पराभूत झाला. या सामन्यात फ्रान्सच्या कोचने एम्बापेला बदली खेळाडू म्हणून ठेवण्याचा निर्णय घेतला.

नुकत्याच झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये एम्बापेने म्हटलं की, त्याला वर्ल्ड कपचं वेड आहे आणि सलग दुसऱ्यांदा जगज्जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची त्याची इच्छा आहे.

त्याने म्हटलं, “ही माझ्या स्वप्नातली स्पर्धा आहे. मला यात खेळायला मिळतंय हे माझं भाग्य आहे. मी पूर्ण सीझन स्वतःला यासाठी शारीरिक आणि मानसिकरित्या तयार केलं आहे. आता या स्पर्धेत रंगत येतीये. पण आमचं ध्येय वर्ल्ड कप जिंकणं आहे. त्यापासून आम्ही अजून दूर आहोत.” या स्पर्धेत एम्बापेने एकूण पाच गोल केले आहेत. मेस्सीने तीन तर ख्रिस्तियानो रोनाल्डोने एकही गोल केला नाहीये.

मोरक्कोविरुद्ध एम्बापेवर नजर

एम्बापे

फोटो स्रोत, Getty Images

बुधवारी (14 डिसेंबर) फ्रान्स आणि मोरक्कोमध्ये वर्ल्ड कपची सेमी फायनल होईल.

या सामन्यात 23 वर्षांचा एम्बापेच्या कामगिरीवर लक्ष असेल.

एम्बापेचा वेग सरस ठरणार की मोरक्कोचा गोलकीपर यासिम बोनो त्याला अडविण्यात यशस्वी होणार याकडे सर्वांचंच लक्ष असेल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)