मॅराडोनाचं दुबईत चोरीला गेलेलं घड्याळ आसाममध्ये असं सापडलं...

फोटो स्रोत, CHRIS MCGRATH
अर्जेंटिनाचा दिवंगत महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना याचं दुबईतून चोरीला गेलेलं घड्याळ आसामच्या शिवसागर जिल्ह्यात सापडलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली होती.
एएनआय आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी या वृत्ताला दुजोरा दिला. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव वाझिद हुसैन असल्याचं एएनआयनं म्हटलं होतं
आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा सरमा आणि पोलिस महासंचालकांनीही त्यांच्या ट्विटर हँडलवरून याबाबतची माहिती दिली होती.
आंतरराष्ट्रीय सहकार्यानुसार आसाम पोलिसांनी दुबई पोलिसांच्या समन्वयानं चोराचा शोध लावल्याचं त्यांनी ट्विटद्वारे सांगितलं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
आरोपी हुसैन यानं तो दुबईत काम करत असलेल्या कंपनीतून हे घड्याळ चोरलं होतं. त्यानंतर तो भारतात आला होता. मात्र पोलिसांनी छडा लावत त्याला अटक केली.
नेमकं प्रकरण काय?
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना याच्या साहित्यासह त्यानं वापरलेलं घड्याळ दुबईतील एका कंपनीनं सांभाळून ठेवलं होतं. हे साहित्य ठेवण्याची जबाबदारी या कंपनीवर होती.
मात्र, काही महिन्यांपूर्वी मॅराडोनाचं हे घड्याळ चोरीला गेल्याच्या वृत्तानं एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून दुबई पोलिस घड्याळाची चोरी करणाऱ्या चोराच्या शोधात होते.
माध्यमांतील वृत्तांनुसार आरोपी हुसैन हे या कंपनीमध्येच सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. घड्याळाची चोरी झाल्यानंतर काही दिवस त्यांनी कंपनीत काम केलं. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात वडिलांची तब्येत खराब असल्याचं कारण सांगून ते भारतात परत आले होते.

फोटो स्रोत, @himantabiswa
मात्र, दुबई पोलिसांचा तपास सुरुच होता. त्यांच्या तपासाचे धागे-दोरे वाझिद हुसैन पर्यंत पोहोचले. दुबई पोलिसांनी आसाम पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानुसार कारवाई करण्यात आली.
आसाम पोलिसांनी पहाटे चार वाजता वाझिद हुसैनला त्याच्या घरून अटक केली. तसंच मॅराडोनाचं घड्याळही त्याच्याकडून जप्त करण्यात आलं आहे, अशी माहिती आसामच्या पोलिस महासंचालकांनी दिली.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
लाखो रुपये किंमत
हबलट (Hublot) कंपनीचं हे लिमिटेड एडिशन घड्याळ मॅराडोनाने 2010 च्या फिफा विश्वचषकादरम्यान वापरलं होतं, तसंच त्याची किंमत 20 लाखांच्या आसपास होती असंही काही माध्यमांनी म्हटलं आहे.
दिएगो मॅराडोना हे अर्जेंटिनाचे प्रसिद्ध फुटबॉलपटू आणि अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचे मॅनेजरही होते. इतिहासातीस महान फुटबॉलपटूंमध्ये मॅराडोना यांचं नाव घेतलं जातं.
नोव्हेंबर 2020 मध्ये मॅराडोना यांचं निधन झालं होतं. या प्रसिद्ध घड्याळावर मॅराडोनाचा फोटो, सही आणि जर्सीचा क्रमांकदेखील कोरलेला होता. अशा प्रकारची केवळ 250 घड्याळं त्यावेळी कंपनीनं तयार केली होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)