You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेनं केलेलं पहिलं 'मून लँडिंग' खोटं होतं? 'ते' दृश्य हॉलिवूडच्या स्टुडिओमधलं?
चंद्रावर मनुष्याला पहिल्यांदा पोहोचवणारा देश होता अमेरिका. 1969 साली अमेरिकेचं अपोलो 11 हे यान चंद्रावर उतरलं. या यानातून चंद्रावर पहिल्यांदा पाऊल ठेवणारी व्यक्ती होती- नील आर्मस्ट्राँग.
मानवाने चंद्रावर ठेवलेल्या या ऐतिहासिक पहिल्या पावलाच्या प्रतिमाही आपण पाहिल्या आहेत.
पण अनेकांच्या मनात आजही या ऐतिहासिक घटनेबद्दल संशय आहे. चंद्रावर आर्मस्ट्राँगचं उतरणं ही घटना फसवी असल्याचा दावा अनेकदा करण्यात आला.
पण असं का म्हटलं जातं? हा दावा खरा आहे की खोटा हे कसं कळणार?
विज्ञान लेखक डेल्लास कॅम्पबेल यांनी म्हटलं होतं की, 1969 साली चंद्राच्या प्रतिमा काढण्याचं तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं, पण आमच्याकडे चंद्रावर उतरण्याचं तंत्रज्ञान मात्र होतं.
अपोलो 11चं ‘मून लँडिंग’ खोटं असल्याचा दावा करणाऱ्यांनी दिलेले पहिले कारण म्हणजे पार्श्वभूमीतील तारे दृश्यांमध्ये दिसत नाहीत.
हे प्रकाशातील 'हाय कॉन्ट्रास्ट' म्हणून ओळखल्या जाणार्या अत्यंत तीव्रतेमुळे आहे, अस फिल्म आणि फोटोग्राफी तंत्रज्ञानातील तज्ज्ञ मार्क शुबिन सांगतात.
“जर आपण दुपारच्या रखरखीत उजेडातून आलो आणि बंद घराचं दार उघडून पाहिलं, तर आपल्याला पटकन आतमधल्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत. याचं कारणही हा ‘हाय कॉन्ट्रास्ट’ आहे,” असं शुपिन सांगतात.
याच परिणामामुळे चंद्रावर उतरण्याच्या दृश्यात आपल्याला तारे दिसत नसल्याचं शुपिन सांगतात.
मून लँडिंगचं दृश्य हॉलिवूडच्या स्टुडिओत चित्रीत केलं गेलेलं?
मून लँडिंग ही केवळ बनवाबनवी असल्याचा दावा करणारे अजून एक गोष्ट सांगतात.
हे दृश्य चक्क हॉलिवूडमधल्या एका स्टुडिओमध्ये सेटवर चित्रित करण्यात आलं होतं.
पण तज्ज्ञ हा दावाही फेटाळून लावतात. चंद्रावरच्या कमी गुरुत्वाकर्षणाचा परिणाम एखाद्या स्टुडिओमध्ये तयार करणं अशक्य असल्याचं त्यांचं मत आहे.
जिथे हवा असते, तिथल्या धूळ आणि मातीचे गुणधर्म विशिष्ट असतात. चंद्राच्या पृष्ठभागावर जिथे हवा नसते, तिथल्या माती आणि धुळीचे गुणधर्म पूर्ण वेगळे असतात. जर स्टुडिओमध्ये मून लँडिंगचं दृश्य जसंच्या तसं उतरविण्यासाठी तिथली हवा काढून तिथे एक व्हॅक्यूम तयार करायला लागला असता, असं शुपिन यांचं म्हणणं आहे.
सोव्हिएत युनियन त्यावेळी काय करत होतं?
1969 साली जेव्हा अमेरिका चंद्रावर उतरली, तेव्हा सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेत शीतयुद्ध सुरू होतं.
त्यावेळी सोव्हिएत युनियनकडे पाळत ठेवण्याचे प्रगत तंत्रज्ञान होते, असे लंडन विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय राजकीय संबंधांचे वरिष्ठ प्राध्यापक अँटवान बुस्क सांगतात.
“त्या तंत्रज्ञानाचा वापर करून सोव्हिएत युनियनला आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आणि उपग्रहांचा मागोवा घेता येत होता. जर अमेरिकेचं ‘मून लँडिंग’ बनावट असेल तर सोव्हिएत युनियनला ते सापडले असते.
त्यांना या मून लँडिंगमध्ये काहीही संशयास्पद आढळलं असतं, तर त्यांनी ते उघड करत अमेरिकेविरोधात मोहीमच सुरू केली असती, असं बुस्क म्हणतात.
पण तसं काहीही झालं नव्हतं.
चंद्रावरून आणलेले दगड
चंद्रावरून आणलेले दगड हा एक महत्त्वाचा पुरावा असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
या दगडांवर अजूनही संशोधन सुरू असल्याचं युके स्पेस एजन्सीमधील भौतिकशास्त्रज्ञ लिबी जॅक्सन सांगतात.
“त्यातील काही दगड आजही सीलबंद आणि संरक्षित आहेत. त्यांना कोणी हातही लावला नाही,” असं जॅक्सन सांगतात.
जॅक्सन सांगतात की, 1960 आणि 1970 च्या दशकाच्या सुरुवातीस शास्त्रज्ञांना कल्पना आली होती की, तंत्रज्ञानामध्ये सुधारणा होईल आणि नवीन वैज्ञानिक शोध लागतील.
चंद्रावर मानवी पावलांचा ठसा
चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांनी तिथं काही रिफ्लेक्टर लावले.
जर लेझर किरण पृथ्वीवरून चंद्रावर सोडले गेले तर परावर्तक त्यांच्याशी टक्कर घेऊन ते उडून जातील, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
त्याद्वारे चंद्राच्या चक्रातील बदलांची तपासणी केली जाते, असं ते म्हणतात.
झेंडा कसा फडकावला? पायाचा ठसा कसा तयार झाला?
याशिवाय हवा नसलेल्या चंद्रावर अमेरिकेचा ध्वज कसा फिरवला गेला आणि तिथे पाणी नसताना पायाचे ठसे कसे तयार झाले, असे प्रश्न अनेकदा उपस्थित केले जातात.
या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी बीबीसीने ज्येष्ठ शास्त्रज्ञ टी.व्ही. वेंकटेश्वरन यांच्याशी चर्चा केली.
ते म्हणाले, त्यांची साधी वैज्ञानिक स्पष्टीकरणं आहेत.
ते म्हणाले की, ध्वज फडकावणं हे जडत्वाच्या सिद्धांतावरून स्पष्ट केलं जाऊ शकतं.
दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर चालत्या बसला अचानक ब्रेक लावल्यास, उभे असलेले लोक पुढे ढकलले जातील. त्याचप्रमाणे घर्षणरहित पृष्ठभागावर बसवलेला ध्वज सोडला तर तो गतीमुळे काही काळ फडकतो.
त्याचप्रमाणे चंद्रावर राहिलेल्या पावलांच्या ठशांबाबत बोलताना ते म्हणाले की, पृथ्वीवर वायूमंडळ नसल्यामुळे चंद्रावरील उल्का रंगीबेरंगी असतील.
“जसजसे त्या आदळत राहतात, तसतसं त्या जवळपास एक फूट अंतरावर चंद्राच्या पृष्ठभागावर तुटून पडतात आणि त्याचा ढीग होते. याला ‘रेगोलिथ’ म्हणतात. त्यावर पाऊल टाकले की मग एक पाऊलखुण तयार होते."
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)