सिक्कीममध्ये दरीत कोसळून 16 सैनिकांचा मृत्यू, तर 4 सैनिक जखमी

सिक्कीम

फोटो स्रोत, Getty Images

सिक्कीमच्या उत्तरेस भारतीय लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळला आहे. या दुर्घटनेत 16 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

भारतीय लष्कराच्या इस्टर्न कमांडने दिलेल्या माहितीनुसार ही घटना उत्तर सिक्कीममधील जेमा येथे घडली आहे.

या इस्टर्न कमांडच्या पत्रकात नमूद केलंय की, “तीन गाड्यांच्या ताफ्य़ातील ही एक गाडी होती. हा ताफा चैट्टेनकडून थांगूच्या दिशेने जात होता. जेमा जवळ एका वळणावर ही गाडी दरीत कोसळली.”

घटनास्थळी मदतकार्य करणाऱ्या चमूला पाठवलं असून चार जखमींना हेलिकॉप्टरच्या मदतीने तिथून हलवण्यात आलं आहे. या दुर्घटनेत तीन ज्युनियर कमिशन्ड ऑफिसर आणि 13 जवानांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी या दुर्घटनेप्रती दुःख व्यक्त केलं असून शोकाकुल परिवारांसाठी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

राजनाथ सिंग

फोटो स्रोत, Twitter

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करून या घटनेवर शोक व्यक्त केलाय.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट मध्ये म्हटलंय की, "सिक्कीम दुर्घटनेत झालेल्या जवानांच्या मृत्युमुळे आम्हाला दुःख झालं आहे. आम्ही दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या जवानांच्या कुटुंबियांसोबत आहेत. जखमी जवान लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो " 

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

या दुर्घटनेत तीन कनिष्ठ अधिकारी आणि 13 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती लष्कराने दिली आहे. अपघातानंतर तात्काळ बचाव मोहीम सुरू करण्यात आली असून आणि चार जखमी जवानांना हेलिकॉप्टरने उपचारासाठी हलवण्यात आलंय.