निर्वासितांच्या छावण्यांमध्ये इस्रायली सैनिक, पॅलेस्टिनी कट्टरतावादी म्हणतात-

इस्रायल

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, जेनिन कँप

इस्रायलचं सैन्य आणि हत्यारबंद पॅलेस्टिनी कट्टरवाद्यांमध्ये वेस्ट बँकमध्ये असलेल्या जेनिन या निर्वासितांच्या छावणीत मोठ्या प्रमाणात संघर्ष उफाळून आला आहे.

इस्रायल या भागात एका मोठी सैनिकी कारवाई करत असल्याचं दिसत आहे. त्याची सुरुवात आज (4 जुलै) सकाळी ड्रोन हल्ल्याने झाली आहे.

आतापर्यंत या गोळीबारात आठ पॅलिस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि 50 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत.

इस्रायलच्या मते त्यांनी आतापर्यंत कट्टरतावादी संघटनांचा मोठ्या प्रमाणात बीमोड केला आहे.

मात्र पॅलेस्टाईनने इस्रायलवर युद्धाचा आरोप लावला आहे.

इस्रायलच्या लष्कराच्या एका प्रवक्त्याने सांगितलं की, हे ऑपरेशन कधीपर्यंत चालेल ते सांगता येणार नाही.

ही कारवाई काही तास ते अगदी दोन दिवसही सुरू राहील.

कट्टरवाद्यांचा बालेकिल्ला

जेनिन हा पॅलिस्टिनी कट्टरवाद्यांचा एक नवा गड म्हणून उदयाला आला आहे. इस्रायलच्या सैन्याने इथे अनेकदा कारवाई केली आहे. अनेकदा पॅलेस्टिनी हल्लेखोरांवर इस्रायली सैन्यावर हल्ला केला आहे.

इस्रायलने जेनिन ब्रिगेड नावाच्या संस्थेच्या सैनिकांविरोधात हे ऑपरेशन सुरू केलं आहे. या गटावर पॅलेस्टाईनच्या प्रशासनाचं नियंत्रण नाही.

इस्रायली सैन्याच्या मते त्यांनी एका अपार्टमेंटवर ड्रोनने हल्ला केला आहे. तिथे इस्रायली सैनिकांवर हल्ला करणारे कट्टरतावादी राहत होते.

इस्रायल

फोटो स्रोत, Reuters

याआधीसुद्धा या परिसरावर ड्रोनने अनेकदा हल्ले करण्यात आले आहेत.

जेनिनमध्ये सध्या हजारोंच्या संख्येने इस्रायली सैनिक तैनात आहे आणि सैन्याच्या प्रवक्त्यांनी याला कट्टरवाद्यांविरुद्ध ऑपरेशन असं नाव दिलं आहे.

हत्यारं जप्त करणं आणि कँपमधील कट्टरवाद्यांचा गड उद्धवस्त करणं हे या ऑपरेशनचं उद्दिष्ट असल्याचं या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.

शेवटच्या श्वासापर्यंत लढणार

इ्स्रायल

फोटो स्रोत, Reuters

इस्रायली सैन्याबरोबरच्या संघर्षावर जेनिन ब्रिगेडने एक निवेदन जारी केलं आहे.

ते म्हणतात, “आमच्यावर ताबा मिळवणाऱ्या इस्रायली सैन्याच्या विरुद्ध आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आणि शेवटच्या गोळीपर्यंत लढू. आम्ही या परिस्थितीत एकमेकांबरोबर आहोत.”

जेनिन कँपमध्ये राहणाऱ्या अहमद जकी यांनी बीबीसीला सांगितलं, “इस्रायली सैनिकांच्या अनेक गाड्यांनी कँपमध्ये अनेक मार्गांनी प्रवेश केला आहे.”

पॅलेस्टिन अँम्ब्युलन्स ड्रायव्हर खलिद-अल-अहमद यांनी म्हटलं, “निर्वासितांच्या छावणीत संघर्ष उफाळून आला आहे.”

अल अहमद रॉयटर्सशी बोलताना म्हणाले, “छावणीवर हवाई हल्ले झाले आहेत. एकावेळेला आम्ही पाच ते सात रुग्णवाहिका घेऊन जात आहोत. दरवेळी ही रुग्णवाहिका जखमी लोकांनी भरून येते.”

पॅलेस्टिनी गटाचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी इस्रायलच्या ऑपरेशनवर टीका केली आहे. हा नि:शस्त्र लोकांविरुद्ध युद्ध अपराध आहे. अशा पद्धतीने या परिसरात सुरक्षा आणि स्थैर्य येणं कठीण आहे.

हमास हस्तक्षेपासाठी तयार

इस्रायलने जेनिनमध्ये सर्व सीमा ओलांडल्या तर ते हस्तक्षेप करतील, असं हमासने सांगितलं आहे.

गाझा पट्टीत हमासच्या प्रवक्त्यांनी हे वक्तव्य कलं आहे.

प्रवक्ता हाझिम कासिम यांनी इस्रायलची सैनिकी कारवाई हे पॅलेस्टिनविरुद्ध गंभीर युद्ध असल्याचं सांगितलं आहे.

कासिम त्यांच्या निवेदनात म्हणाले, “आम्ही गाझा पट्टीच्या घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहोत. आमच्या सैन्याने सर्व सीमा ओलांडल्या तर आम्हीसुद्धा हस्तक्षेपासाठी तयार आहोत.”

इस्रायल

फोटो स्रोत, Shutterstock

तिकडे अमेरिकेने या ऑपरेशनमध्ये इस्रायलला पाठिंबा दिला आहे. इस्रायलला स्वत:चं संरक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं अमेरिकेनं म्हटलं आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, “आम्ही ऑपरेशनचे सगळे फोटोज पाहिले आणि स्थितीवर लक्ष ठेवून आहोत. हमास आणि इतर संस्थांपासून स्वत:चा बचाव करण्याचा अधिकाराचं समर्थन करत असल्याचं अमेरिकेचं मत आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)