जिथे गांजा बाळगल्याबद्दल 5 वर्षांची शिक्षा व्हायची; तिथे आता गांजा घातलेला चहा मिळतो

थायलंड

फोटो स्रोत, LULU LUO/BBC

    • Author, जोनाथन हेड
    • Role, बीबीसी प्रतिनिधी, दक्षिण-पूर्व आशिया

सुखुमवित रोड हे थायलंडची राजधानी बँकॉकमधील सर्वात गर्दी असणारा रस्ता आहे. रंग-बेरंगी प्रकाशांनी न्हाऊन निघालेला हा रस्ता आपल्याला एका वेगळ्याच जगात आल्याचा अनुभव देतो.

गेल्याच वर्षी थायलंडनं गांजाच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिली. त्यानंतर तिथं गांजाच्या उत्पादनात अचानक वाढ झाली. त्यामुळे थायलंडमधील व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

बँकॉकमधील बीबीसी कार्यालयापासून पूर्वेला दोन किलोमीटर चालत गेल्यास वाटेत 40 हून अधिक औषधांची दुकानं दिसतात. या दुकानांमध्ये गांजाच्या फुलांच्या कळ्या आणि धूम्रपानाशी संबंधित इतर वस्तूंची विक्री करतात.

विरुद्ध दिशेने चालत गेल्यास प्रसिद्ध खाओ सॅन रोडवर गांजा-थीम असलेला शॉपिंग मॉल ‘प्लँटोपिया’ आहे. ग्राहकांनी निर्माण केलेल्या धुराच्या धुक्यामागे मॉलमधील दुकाने धुंद झालेली दिसतात. हे ठिकाण पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे.

थायलंडमधील ‘वीड’ या वेबसाईटवर देशभरातील गांजा आणि त्याचे डेरिव्हेटिव्ह विकणाऱ्या चार हजारहून अधिक आउटलेट्सची यादी आहे, जी गांजा आणि संबंधित उत्पादने विकतात.

हे तेच थायलंड आहे, जिथे गेल्या वर्षी जूनपर्यंत गांजा बाळगल्यास 5 वर्षांपर्यंत आणि तो पिकवल्यास 15 वर्षांच्या शिक्षेची तरतूद होती. तर इतर अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांमध्ये मृत्युदंडाची शिक्षा होती. देशातील बदलाचा हा वेग आश्चर्यजनक आहे.

थायलंडमध्ये गांजा व्यवसायात सल्लागार म्हणून काम करणाऱ्या ‘एलिव्हेटेड इस्टेट’टे संस्थापक आणि नव्या नियमांना पारित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संसदीय समितीचे सदस्य राहिलेले किट्टी चोपका म्हणतात की, “हे सगळं गोंधळात टाकणारं आहे. मात्र, हे थायलंड आहे आणि गांजाच्या व्यवसायात उदारीकरण आल्याशिवाय आजची स्थिती अशी झाली नसती.”

पण किट्टी चोपका यांसारख्या प्रचारकांनी गांजाच्या उदारीकरणाची जी कल्पना केली होती, ती ही नव्हती.

“आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, हे सांगणारी नियामक व्यवस्था हवी आहे. कारण बर्‍याच लोकांना त्यांच्या मर्यादा काय आहेत हे माहित नाही,” असं किट्टी चोपका म्हणतात.

गांजावरून राजकारण

जरी यात सूट असली, तरी काही नियमही आहेत. मात्र, त्यांची अंमलबजावणी अत्यंत बेधडकपणे केली जातेय.

सर्व औषध दुकानांकडे गांजा विकण्याचा परवाना नाही. गांजाच्या उत्पन्नापासून ग्राहकांचे वैयक्तिक तपशील नोंदवण्यापर्यंतची अपेक्षा दुकानांकडून आहे.

प्रक्रिया न केलेल्या गांजाची फुले वगळता, कोणत्याही उत्पादनात THC चे प्रमाण 0.2 टक्क्यांपेक्षा जास्त नसावं. THC हे गांजात असलेले सायकोट्रॉपिक रसायन आहे. या उत्पादनांची ऑनलाइन विक्री प्रतिबंधित आहे.

किट्टी चोपका

फोटो स्रोत, LULU LUO/BBC

फोटो कॅप्शन, किट्टी चोपका
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

असं असूनही, THC अधिक असलेल्या गांजाची पुरवठादार ऑनलाइन विक्री करतायेत. या उत्पादनांमध्ये गांजापासून बनलेली ब्राउनी आणि गमी समाविष्ट आहेत. त्यांची डिलिव्हरीही तासाभरात केली जाते.

20 वर्षांखालील कोणत्याही ग्राहकाला गांजा विकता येत नाही. पण मोटारसायकलवर कोणते उत्पादन दिले जात आहे, हे कुणाला माहित आहे?

अशी अनेक रेस्टॉरंट्स आहेत, जी गांजा किंवा गांजापासून बनवलेले पदार्थ देतात. मारिजुआना चहा आणि मारिजुआना आईस्क्रीम देखील येथे उपलब्ध आहे. किराणा दुकानांमध्ये तर गांजा किंवा भाग पाण्यात मिसळून विकले जाते.

थायलंड पोलिसांनी मान्य केलंय की, काय कायदेशीर आहे आणि काय नाही. याबद्दल ते खूप गोंधळलेले आहेत. ते गांजाच्या संदर्भात कडक नियम लागू करण्यात फारसे सक्षम नाहीत.

गांजा आणि गांजाच्या नियमांमध्ये झालेला बदल हा राजकीय योगायोग आहे.

थायलंडच्या सर्वात मोठ्या पक्षाचे प्रमुख नेते अनुतिन चरणविराकुल यांनी 2019 च्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात गांजा आणि भांग कायदेशीर करण्याचं आश्वासन दिलं होतं.

या आश्वासनामुळे त्यांना निवडणूक जिंकता आली. गरीब शेतकऱ्यांसाठी गांजा हे फायदेशीर पर्यायी नगदी पीक ठरू शकते, या कल्पनेला बहुतेक लोक बळी पडले.

नवीन सरकारमध्ये आरोग्यमंत्री झाल्यानंतर अनुतिन चरणविराकुल यांनी आपले निवडणूक आश्वासन पूर्ण करण्यासाठी बंदी असलेली औषधे बंदी यादीतून लवकरात लवकर काढून टाकण्यास प्राधान्य दिले.

गांजाच्या उत्पादनांच्या नवीन व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियम तयार होईपर्यंत, गांजा आणि भांग यांना कायदेशीर करण्यात आलं होतं. त्यात नवीन नियम पक्षाअंतर्गत वादाचा मुद्दाही बनले होते.

मे 2023 मध्ये आणखी एका सार्वत्रिक निवडणुकीनंतरही, या वर्षाच्या अखेरीस संसदेने कायदा मंजूर करण्याची शक्यता कमी आहे.

विरोधी पक्ष आधीच अनियंत्रित गांजाच्या धोक्यांबद्दल इशारा देत आहेत आणि सत्तेत आल्यास ते पुन्हा गांजाला प्रतिबंधित करण्याचा इशारा देतायत.

वनौषधी आणि अन्नामध्ये केला जात असे गांजाचा वापर

या बेलगाम नवीन उद्योगाचे भविष्य अनिश्चित आहे.

गेल्या वर्षी 21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेल्या तुक्ताने गांजाच्या या खेळात प्रवेश केला. त्यानं बँकॉकच्या क्लोंग टोई जिल्ह्यातील हर्ब क्लबमध्ये 10 लाख पेक्षा जास्त (30,000 डॉलर) गुंतवणूक केली.

गांजाच्या रोपांच्या फुलांचे 16 वेगवेगळे प्रकार ती विकते. यांची किंमत प्रति ग्रॅम 10 डॉलरपासून 80 डॉलरपर्यंत प्रति ग्रॅम आहे. पण आता तिला कायद्यातील बदलांच्या शक्यतांमुळे काळजी वाटू लागलीय.

किट्टी चोपका म्हणतात की, “गांजाच्या भरमसाठ उत्पादनामुळे किंमतीत घसरण होत आहे.”

“इथे बरीच अवैध आयात केली जाते. आम्ही गांजाच्या परदेशी जाती वाढवत आहोत, ज्यांना वातानुकूलित आणि सूर्यप्रकाशाची आवश्यकता आहे. खर्च कमी करण्यासाठी आम्ही इथल्या हवामानात चांगल्या प्रकारे वाढू शकतील, अशा जाती विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.”

“आपल्याला जुन्या वारशाकडे, आपल्या जुन्या संस्कृतींकडे परत जाण्याची गरज आहे. कारण गांजाची वनस्पती आणि थायलंड एकमेकांशी जोडलेले आहेत.”

थायलंड

फोटो स्रोत, LULU LUO/BBC

बर्‍याच थाय लोकांच्या मते, ते अशा देशात वाढले आहेत, जिथं कुठल्याही अंमली पदार्थाकडे सामाजिक विकृती म्हणूनच पाहिलं गेलंय. अशावेळी गांजाचं उत्पादन, विक्री, खरेदी यांमध्ये झालेली वाढ अनेकांना आश्चर्यचकित करते.

1970 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत उत्तर थायलंडमधील पहाडी जमाती गांजाची मोठ्या प्रमाणावर लागवड करत. हे गोल्डन ट्रँगल म्हणून ओळखले जात असे, जे अफूचे जगातील सर्वात मोठे स्त्रोत होते. ईशान्य थायलंडमध्ये गांजा एक औषधी वनस्पती आणि स्वयंपाकासाठी एक घटक म्हणून वापरली जात असे.

1960 च्या दशकात व्हिएतनाम युद्धात जेव्हा अमेरिकन सैनिक 'विश्रांती आणि करमणुकीच्या' अभावामुळे 'कमजोर' होत होते, तेव्हा त्यांना थाई स्टिक (बांबूच्या काठीच्या भोवती पानांमध्ये गुंडाळलेल्या गांजाच्या कळ्यापासून बनवलेला जाड सिगार) मिळाली होती.

अमेरिकन सैनिकांनी थायलंडच्या गांजाला मोठ्या प्रमाणावर अमेरिकेत पाठवायला सुरुवात केली. गोल्डन ट्रँगलमधून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ अमेरिकेत पाठवली जाऊ लागली.

अमेरिकेच्या मदतीने अंमली पदार्थांवर बंदी घालण्यात आली होती..

व्हिएतनाम युद्ध संपुष्टात येताच, अमेरिकेने थायलंडवर औषध उत्पादन थांबवण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली.

1979 मध्ये थायलंडने अंमली पदार्थ कायदा लागू केला, ज्यामध्ये मृत्युदंडासह अंमली पदार्थांचा वापर आणि विक्रीसाठी कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली.

थायलंड, सिंगापूर आणि मलेशियाने त्यांच्या इमिग्रेशन अधिकार्‍यांना हिप्पी (अनेक देशांत फिरणारा भटक्यांचा प्रकार) शोधण्याची आणि त्यांना प्रवेशावर बंदी घालण्याची सूचना केली. सिंगापूर विमानतळावर लांब केस असलेल्या लोकांना नाभिकाकडे जाण्याचा किंवा मायदेशी माघारी जाण्याचा पर्याय देण्यात यायचा.

मलेशियामध्ये देश सोडण्यापूर्वी कोणत्याही संशयास्पद व्यक्तीच्या पासपोर्टवर 'SHIT' असा शिक्का मारला जायचा, ज्याचा अर्थ ट्रांझिटमध्ये सापडलेला संशयित हिप्पी असा होत असे.

ऑक्टोबर 1976 मध्ये बँकॉकच्या थम्मसॅट विद्यापीठात डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थ्यांच्या चळवळीला चिरडल्यानंतर थायलंडचे सरकार उदयोन्मुख तरुण संस्कृतीपासून अधिक सतर्क राहत होते.

थायलंड

फोटो स्रोत, LULU LUO/BBC

शरीर आणि मनावर परिणाम

थायलंडमदील पुराणमतवाद्यांना भीती होती की, तरुण पिढी थायलंडमध्ये साम्यवादाचं समर्थन करेल. जसं थायलंडच्या शेजारील लाओस, कंबोडिया आणि व्हिएतनाममध्ये घडलं होतं.

थायलंडमधील राजेशाहीनं आणलेल्या पीक सुधार प्रकल्पांच्या माध्यमातून पहाडी जमातीला अफू आणि गांजाच्या लागवडीऐवजी कॉफी आणि मॅकॅडॅमिया नट्सकडे जाण्यास प्रवृत्त केले गेले.

1990 च्या दशकापासून म्यानमारच्या युद्धग्रस्त भागातून थायलंडमध्ये स्वस्त मेथॅम्फेटामाइनची निर्यात केली गेली. मेथॅम्फेटामाइन अत्यंत शक्तिशाली, व्यसन लावणारं आणि प्राणघातक पदार्थ आहे.

मेथॅम्फेटामाइनमुळे मेंदूतील डोपामाईनचे प्रमाण वाढते आणि त्याचा वापर माणसाला उत्तेजित करतो. त्याचे व्यसन फार लवकर लागते आणि त्याचे शरीरावर अनेक नकारात्मक परिणाम होतात.

थायलंडमधील लोक मेथॅम्फेटामाइनच्या व्यसनाच्या विरोधात उभे राहिले. कारण त्याचा समाजावर परिणाम झाला. त्यामुळे 2003 मध्ये अमली पदार्थ विरोधी धडक मोहीम सुरू झाली.

या मोहिमेचा एक भाग म्हणून किमान 1400 संशयित वापरकर्ते आणि डीलर्सना मारण्यात आले.

टॉम क्रुसोपोन

फोटो स्रोत, LULU LUO/BBC

फोटो कॅप्शन, टॉम क्रुसोपोन

त्यावेळी थायलंडच्या तुरुंगात खूप गर्दी झाली होती. यापैकी तीन चतुर्थांश कैद्यांना अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांसाठी आणि अनेकांना अगदी किरकोळ गुन्ह्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आले होते. तुरुंगांमध्ये जास्त गर्दीमुळे थाय अधिकाऱ्यांना त्यांच्या कठोर कारवाईवर पुनर्विचार करण्यास भाग पाडले आहे.

याचसोबत देशाच्या यशस्वी वैद्यकीय पर्यटन उद्योगात गांजाचा औषधी आणि उपचारात्मक वापर हा पूरक ठरू शकतो, हेही त्यांच्या लक्षात आले. गांजाच्या चांगल्या वापराच्या क्षमतेची चाचणी घेणे हा मोठा निर्णय नव्हता.

‘गांजा वैध केल्यानं नुकसान न होता मदतगारच ठरलंय’

देशातील ड्रग्ज कायद्यांना अधिक उदार बनवल्यानं थायलंडचे उद्योजक टॉम क्रुसोपोन यांना ‘मिस्टर वीड’ म्हणून ओळखलं जातंय. ते जर्मन पर्यटकांच्या एका गटाला म्हणतात की, “ड्रग्जच्या अॅमस्टरडॅममध्ये आपलं स्वागत आहे.”

क्रुसोपोन यांनी बँकॉकमध्ये अमेरिकन कॅनॅबिस स्टोअर कुकीजची शाखा उघडली आहे. स्टोअरमध्ये स्थानिक ठिकाणी पिकवण्यात आलेल्या गांजाच्या वेगवेगळ्या प्रकारांना सुंदर जारमध्ये ठेवलंय.

स्टोअरमध्ये गांजाच्या थीमवर बनवलेले टी-शर्ट, अंतर्वस्त्र आणि चप्पलसुद्धा ठेवल्या आहेत.

बँकॉकच्या हिल्टन तुरुंगात अनेक दशकांपासून पडलेल्या असह्य पाश्चिमात्य लोकांच्या परिचित कहाण्या अनेकांना थोड्या गोंधळात टाकतात.

टॉम क्रुसोपॉन त्यांच्या दुकानात धुम्रपान करू देत नाहीत. मात्र, खरेदी करणाऱ्यांना आश्वासन देतात की, गांजा खरेदी केल्यानं तुम्हला अटक केली जाणार नाही.

एक रस्त्यावरील 32 वर्षीय विक्रेत्याने सांगितलं की, “हे चांगलं नाही. गांजा अजूनही माझ्यासाठी ड्रग्जसारखेच आहे. तरुण गांजाचा जास्त वापरतायेत आणि पूर्व जे वापरत होते तुम्हा याकडे आलेत.”

मात्र, एका वृद्ध दुचाकीस्वाराला वाटतं की, गांजाला कायदेशीर केल्यानं नुकसान होण्यापेक्षा मदतच झालीय. ते म्हणतात, “आम्ही धुम्रपान करत नसल्यामुळे आम्ही लक्ष देत नाही. तरीही आम्हाला काही फरक पडत नाही.”

थायलंड

फोटो स्रोत, LULU LUO/BBC

काही डॉक्टरांनी भांगाच्या व्यसनाच्या धोक्यांविषयी इशारा दिलीय. मात्र, बहुतेक थाय लोकांसाठी ते दीर्घकाळ चाललेल्या मेथॅम्फेटामाइन संकटाच्या तुलनेत फिकट आहे.

मध्य बँकॉकमधील औषधांच्या दुकानदारांचं म्हणणं आहे की, त्यांचे बहुतेक ग्राहक थाय नागरिक नसून परदेशी पर्यटक आहेत.

थायलंडमध्ये नवीन नियम लागू होण्यापूर्वी नियमितपणे गांजाचे सेवन करणाऱ्यांची संख्या कमी नव्हती.

भरभराटीचा व्यवसाय

अमांडा देखील अशा लोकांपैकी एक आहे. आता ती तिच्या आवडीच्या गांजाची लागवड करण्यात आनंदी आहे. पोलिसांचे दार ठोठावण्याची तिला आता भीती वाटत नाही.

तिने तिच्या छोट्याशा अपार्टमेंटमध्ये गांजा पिकवण्यासाठी जागा बनवली आहे. आपल्या लहानशा बेडरूमची बाल्कनी तंबू आणि लाईटने भरली आहे, तिथे तिने गांजाची सात रोपे लावली आहेत. तिच्या मांजरीला या खोलीत जाण्याची परवानगी नाही.

ती म्हणते, “सुरुवातीला हे अवघड होते. मला खूप काही शिकायला मिळालं. सुरुवातीला मला तापमानाची कल्पना नव्हती आणि खोली 24 तास वातानुकूलित असावी लागते. पण थायलंडमध्ये जे घडलं, ते खूप विलक्षण आहे. आता हजारो फार्म आणि दवाखाने आहेत, या व्यवसायात बरेच मनोरंजक लोक आहेत.”

थायलंडच्या राजकीय पक्षांनी गांजावर पुन्हा बंदी घालण्यावर आणि वैद्यकीय वापरापर्यंत मर्यादित ठेवण्याचा प्रयत्न करण्यावर एकमत होण्याची अपेक्षा आहे. नऊ महिन्यांनंतर ही बंदी मागे घेता येईल, असे वाटत नाही.

पण थायलंडमध्ये गांजा उद्योग कोणत्या स्तरावर पोहोचला आहे, हे कोणाच्याही कल्पनेपलीकडचे आहे.

हे वाचलंत का?