गरोदरपणात किती आणि काय खावं?

फोटो स्रोत, Getty Images
बऱ्याचदा गरोदर महिलांना त्यांच्या गर्भारपणात काय खावं काय खाऊ नये याची माहिती नसते.
ब्रिटनच्या नॅशनल चॅरिटी पार्टनरशिपने जे सर्वेक्षण केलं आहे त्यात निघालेल्या निष्कर्षानुसार हा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.
या सर्वेक्षणात गरोदर स्त्रियांना काही प्रश्न विचारण्यात आले, यात केवळ एक तृतीयांश स्त्रियांनी योग्य प्रश्नांची उत्तरं दिली.
ब्रिटनमधील लोकांच्या आरोग्यावर लक्ष ठेवणाऱ्या नाईस (NICE) या संस्थेने दिलेल्या सल्ल्यानुसार, महिलांना गर्भधारणेच्या पहिल्या सहा महिन्यांत अतिरिक्त कॅलरीजची गरज नसते.

फोटो स्रोत, PA Media
पण गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यांत स्त्रियांनी दररोज 200 अतिरिक्त कॅलरीज घ्यायला हव्यात. या कॅलरीज मिळवण्यासाठी स्त्रियांनी ऑलिव्ह ऑईलमध्ये भाजलेल्या दोन ब्रेडचा आपल्या आहारात समावेश करावा.
नॅशनल चॅरिटी पार्टनरशिपच्या म्हणण्यानुसार, गरोदर स्त्रियांनी जो आहार घ्यायला हवा त्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही.

फोटो स्रोत, Science Photo Library
या सर्वेक्षणात 2100 स्त्रियांनी सहभाग घेतला होता. यातल्या एक तृतीयांश स्त्रियांनी वाटतं की गरोदरपणात दररोज 300 कॅलरीज किंवा मग त्यापेक्षाही जास्त कॅलरीजचा आहार घेतला पाहिजे.
सर्वसाधारण असा समज आहे की, गर्भधारणेदरम्यान स्त्रियांनी दोन लोकांचं जेवण जेवायला हवं. एक म्हणजे त्या बाईसाठी तर दुसरं न जन्मलेल्या बाळासाठी.
पण या गोष्टीत कोणतंच तथ्य नाहीये, असं नॅशनल चॅरिटी पार्टनरशिपचं म्हणणं आहे. ते यासाठी रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्ट (RCOG) संस्थेसोबत काम करत आहेत.
मग प्रश्न उरतो तो म्हणजे गरोदरपणात महिलांनी किती खायला हवं?

फोटो स्रोत, Science Photo Library
गरोदर महिलांना त्यांच्या गर्भारपणात दररोज 2000 कॅलरीजची आवश्यकता असते. यात जेवण आणि पेयं अशा दोन्ही गोष्टींचा समावेश असतो.
डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे, आहार संतुलित असावा, यात फळे आणि भाज्या, कार्बोहायड्रेट (पास्ता आणि बटाटे), प्रथिने (डाळी, मासे, अंडी आणि मांस, दूध, दही यांसारखे दुग्धजन्य पदार्थ) आणि चरबीयुक्त पदार्थ यांचा समावेश असावा.
रॉयल कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिशियन्स अँड गायनॅकॉलॉजिस्टचे प्रोफेसर जेनिस रायमर सांगतात की, गरोदरपणात जड आहार घेतल्यास स्त्रियांना त्रासाला सामोरं जावं लागू शकतं.
ते सांगतात की, "अतिखाण्याने स्त्रिया गरोदरपणाच्या लठ्ठ होऊ शकतात आणि यातून गर्भपात होण्याचा धोका वाढतो. सोबतच हाय ब्लड प्रेशर आणि डायबिटीस होण्याची शक्यता असते. बाळही वेळेआधी जन्माला येऊ शकतं. तर काही स्त्रियांना सिझेरियन करावं लागू शकतं."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








