राज्याभिषेकाला आले आणि मंत्रिपद गमावलं...

जस्टीन केटचेंको

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, थॉमस मॅकिनटोश
    • Role, बीबीसी न्यूज प्रतिनिधी

ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स (तृतीय) यांच्या राज्याभिषेकासाठी गेलेल्या अधिकृत प्रतिनिधी मंडळावर अवास्तव खर्च केल्याच्या वादानंतर पापुआ न्यू गिनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.

पापुआ न्यू गिनीचे परराष्ट्रमंत्री जस्टिन त्कात्चेन्कोने यांनी राज्याभिषेकासाठी येताना आपल्या मुलीला सवानालाही सोबत आणले होते. सवानाने या विमानप्रवासाचा तसेच सिंगापूरमधील खरेदी करतानाचा व्हिडिओ टिकटॉकवर पोस्ट केला.

तिच्या या व्हिडिओवर टीका करणाऱ्यांना जस्टिन त्कात्चेन्कोने यांनी "आदिम प्राणी" म्हटलंय.

जस्टिन त्कात्चेन्कोने यांनी केलेल्या या टिपणीमुळे शुक्रवारी पोर्ट मोरेस्बीमधील संसद भवनाबाहेर निदर्शने करण्यात आली.

पापुआ न्यू गिनी हा पॅसिफिक महासागरातील एक कॉमनवेल्थ देश असून राजे चार्ल्स (तृतीय) याचे प्रमुख आहेत.

या प्रकरणासंदर्भात जस्टिन त्कात्चेन्कोने यांनी शुक्रवारी एक निवेदन प्रसिद्ध केलं. यात त्कात्चेन्कोने यांनी म्हटलंय की, पंतप्रधान जेम्स मॅरापे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सोबत असल्याचं सांगितलं आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटलंय की, अलीकडील घटनांमुळे येणाऱ्या राजकीय भेटीगाठींवर परिणाम होणार नाही याची खातरजमा करणं सुरू आहे. येत्या काळात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर असणार आहेत.

"शिवाय या प्रकरणात देण्यात आलेल्या माहितीची सत्यता तपासली जाईल."

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स (तृतीय) यांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी 10 अधिकार्‍यांसह प्रवास केल्याबद्दल परराष्ट्रमंत्री त्कात्चेन्कोने आणि त्यांच्या मुलीवर टीकेची झोड उठली होती. या प्रवासावर जवळपास 900,000 अमेरिकन डॉलर खर्च करण्यात आल्याचं वृत्त स्थानिक वृत्तपत्र पोस्ट-कुरियरने दिलं आहे.

सरकारचे प्रवक्ते बिल टोरासो यांनी रॉयटर्स वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, या कार्यक्रमासाठी 10 कर्मचारी 10 पाहुणे लंडनला गेले होते.

परराष्ट्र मंत्र्यांच्या मुलीने टिकटॉकवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सिंगापूरमधील लक्झरी फॅशन स्टोअर्स, लंडनला जाताना फर्स्ट क्लास लाऊंजमध्ये केलेलं जेवण आदी गोष्टी दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया वेबसाइटवरून आता हटविण्यात आला आहे.

या व्हिडिओमुळे पापुआ न्यू गिनीमधील वातावरण ढवळून निघालं आहे. लोकांनी या उधळपट्टीवर टीका करत म्हटलंय की, लोकांचे पैसे मूलभूत सेवांवर खर्च केले असते तर आणखीन चांगलं झालं असतं.

यावर त्कात्चेन्कोने यांनी ऑस्ट्रेलियाच्या एबीसीला मुलाखत देताना या टीकाकारांना लक्ष्य केलं.

ते म्हणाले, "या आदिम प्राण्यांनी केलेल्या टीकेमुळे ती पूर्णपणे हादरली आहे.मी त्यांना आदिम प्राणी म्हणतो कारण ते आहेत."

"दुसऱ्यांचा मत्सर करणं एक शाप आहे. आणि या लोकांच्या आयुष्यात करण्यासारखं काहीच नाही. देशासाठी काहीतरी चांगलं करू इच्छिणाऱ्या लोकांवर टीका करणं हेच यांचं काम आहे."

पण नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल लोकांची माफी मागितली. आपलं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचं देखील ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, ज्या लोकांनी माझ्या मुलीसाठी अत्यंत वाईट शब्द वापरले केवळ अशाच लोकांवर मी टीका केली आहे.

पापुआ न्यू गिनीच्या लोकांनी त्कात्चेन्कोना मोठ्या मनाने माफ करावं असं पंतप्रधान जेम्स मॅरापे यांनी म्हटलंय. शिवाय लोकांनी केलेल्या वाईट टिप्पण्यांवर आपण नाराज असल्याचं देखील म्हटलंय.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 मे पासून पापुआ न्यू गिनीच्या दौऱ्यावर असणार आहेत. त्यानंतर लगेचच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा दौरा सुरू होईल. त्कात्चेन्को यांनी या दौऱ्यापूर्वीच आपला राजीनामा सादर केला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जपानमध्ये पार पडणाऱ्या जी 7 नेत्यांच्या शिखर परिषदेला हजेरी लावणार आहेत. त्यानंतर ते पोर्ट मोरेस्बी येथे उतरणार असल्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)