अनिल जयसिंघानीचं एकनाथ शिंदे कनेक्शन काय आहे?

- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
अनिक्षा जयसिंघानी नावाची डिझायनर विविध व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार अमृता फडणवीस यांनी पोलिसांत दाखल केली.
त्याचबरोबर माझ्या वडिलांवरील केसेस काढून टाका यासाठी लाच देण्याचा प्रयत्न केल्याचही अमृता फडणवीस यांनी तक्रारीत म्हटलं आहे.
या तक्रारीबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत काही धक्कादायक खुलासे केले. अनेक नेत्यांची यात नावं असल्याचं त्यांनी म्हटलं. त्याचबरोबर माझ्या कुटुंबाला ‘ट्रॅप’ करण्याचा प्रयत्न केल्याचही त्यांनी म्हटलं.
ते नेते नेमके कोण आहेत? याची चर्चा त्यानंतर सुरू झाली. त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं नाव अप्रत्यक्षरित्या घेतलं जात आहे.
भाजप आणि ठाकरेंच्या वादात शिंदेंची अडचण?
या सगळ्या प्रकारानंतर ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी ट्वीट करून काही प्रश्न उपस्थित केले.
मग अमृता फडणवीस आणि प्रियंका चतुर्वेदी यांच्यात ट्विटर वॉर बघायला मिळालं. त्यानंतर अनिल जयसिंघानी यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे उध्दव ठाकरेंसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. यावर खासदार संजय राऊत यांनी बोलणे टाळले.
पण शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्वीट करून एकनाथ शिंदेकडे बोट दाखवले.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
अनिल जयसिंघानी यांना अटक झाल्यानंतर भाजपचे नेते मोहित कंबोज यांनी ट्वीट करून म्हटलं, “उध्दव ठाकरे यांचे निकटवर्तीय बुकी अनिल जयसिंघानी यांना अटक करण्यात आली आहे. माजी पोलीस आयुक्त संजय पांडे आणि आणखी एक माजी पोलीस आयुक्त यांचा लवकरच पर्दाफाश होईल.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आणि भाजप आमदारांचीही अडचण झाली. भाजपच्या आमदारांना याबाबत प्रतिक्रिया विचारली असता याची सखोल चौकशी झाली पाहीजे असं त्यांनी म्हटलं. पण प्रत्यक्षात शिवसेना आणि उद्धव ठाकरेंचं नाव घेणं त्यांनी टाळलं.
दुसरीकडे आदित्य ठाकरे यांनी याबाबत बोलताना म्हटलं, “मातोश्रीवर अनेक लोक येत असतात. त्यांना तिथे कोणी आणलं हे सर्वांना माहिती आहे. पण या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहीजे. “
शिवसेनेच्या अनेक आमदारांना याबाबत प्रतिक्रिया विचारलं असता अनेक आमदारांनी यावर बोलण्यास नकार दिला. त्यात आमदार योगेश कदम यांनी “सरकार गेले आहे म्हणून काहीही आरोप करतात. या आरोपांना आम्ही उत्तर देणार नाही” असं म्हटलं.
त्यामुळे भाजप आणि ठाकरेंच्या या राजकीय वादात शिंदेंच्या आमदारांची कोंडी झाल्याचं चित्र आहे.
शिंदेच्या आशीर्वादाने शिवसेनेत प्रवेश?
2002 मध्ये उल्हासनगरमधून अनिल जयसिंघानी हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा नगरसेवक म्हणून निवडून आला होता, तर 1995 आणि 1997 मध्ये त्याने कॉंग्रेसकडून निवडणूक लढवली होती.
अनिल जयसिंघानी याने 2014 मध्ये तत्कालीन पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला होता.
उल्हासनगरला राहणारा अनिल जयसिंघानी याचा प्रवेश तत्कालीन ठाणे जिल्हाप्रमुख आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशिर्वादाने झाल्याचा आरोप ठाकरे गटाच्या आमदारांनी केला आहे.

फोटो स्रोत, Facebook
जिल्हाप्रमुखांनी पुढे नावं दिल्यानंतर ‘मातोश्री’वर प्रवेश होण्याची पध्दत आहे.
‘लोकमत’चे सहायक संपादक संदीप प्रधान सांगतात, “सर्व पक्षांमध्ये विभागप्रमुख, जिल्हाप्रमुख यांच्यामार्फत असे प्रवेश होत असतात. जर वरच्या नेत्याच्या ओळखीने जर तो आला तर खालच्या लोकांना त्यासंदर्भात माहिती देणं किंवा त्यांची मतं जाणून घेतली जातात. पण जयसिंघानी ही व्यक्ती पूर्वी कॉंग्रेसमध्ये नंतर राष्ट्रवादीमध्ये होती. त्यामुळे या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींना ज्या पक्षाची सरशी असते. त्या पक्षाकडे जाण्याकडे त्यांचा कल असतो असं आतापर्यंत दिसून आले आहे.”
कोण आहे अनिल जयसिंघानी?

फोटो स्रोत, Facebook
अनिल जयसिंघांनी हा कुख्यात बुकी आहे. त्याच्यावर 14-15 गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे. क्रिकेट सट्टेबाजी प्रकरणात जयसिंघानीला तीन वेळा पकडण्यात आलं होतं. पाच राज्यात वॉन्टेड म्हणून घोषीत करण्यात आलं होतं. मे 2015 मध्ये ईडीने जयसिंघानी यांच्या घरावर छापेमारी केली होती. त्यानंतर आजारपणाचं कारण देत जयसिंघानी हा फरार झाला होता.
1 मे 2016 ला जयसिंघानी च्या विरोधात फसवणूकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला. मुंबई पोलीसांबरोबर ठाणे, गोवा, आसाम, गुजरात आणि मध्यप्रदेशचे पोलीस जयसिंघानीला शोधत होते. त्याचबरोबर ईडी अधिकारीही त्याचा शोध घेत होते. इतक्या वर्षांनी अनिल जयसिंघानी याला गुजरातमधून अटक केली आहे.
या अटकेसाठी मुंबई पोलिसांची पाच पथकं निर्माण केली होती. वेगवेगळ्या राज्यात हे अभियान राबवलं जात होते. सदर आरोपी शिर्डीवाटे बारडोलीला पळून गेला होता. तीन पथकं गुजरात मध्ये पाठवण्यात आले. गुजरात पोलिसांशी समन्वय करून ऑपरेशन राबवलं. आरोपींनी 72 तास गुंगारा दिला. रात्री पावणेबाराला नाकाबंदी करून कलोल येथे गुजरात पोलिसांच्या मदतीने पकडलं.
मोबाईल, इंटरनेट संसाधने कार जप्त केली. त्याच्याबरोबर इतर आरोपीना अटक केली आहे. बरीच आव्हानं आली. मात्र मुंबई पोलिसांनी त्यांचं कौशल्य वापरण्यात आलं. आरोपीला मलबार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलं. अशी माहिती उपयुक्त बालसिंग राजपूत यांनी दिली.
'इंडियन एक्सप्रेस'ची बातमी समोर येताच त्याचे पडसाद सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात उमटले होते.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत यासंदर्भात निवेदन केलं होतं. घटनाक्रम काय होता आणि नेमकं काय झालं याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








