कोरोना : भारतात गेल्या 24 तासांत किती रुग्ण आढळले?

भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 227 रुग्ण आढळले. या आकडेवारीसह देशातील एकूण रुग्णसंख्या 3 हजार 424 वर पोहोचलीय. हे आकडे भारत सरकारच्या 'माय गव्हर्नमेंट' वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

दिलासादायक बाब म्हणजे, भारतात गेल्या 24 तासांत कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नाही. तसंच, गेल्या 24 तासांत 186 लोक कोरोनावर मात करून बरे झाले.

लसीकरणाबाबत बोलायचं झाल्यास, एक लाख पाच हजारहून अधिक जणांना लस देण्यात आली असून, आतापर्यंत एकूण दोन अब्ज 20 कोटींहून अधिक लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

त्याचसोबत, कोरोनाची कुणाला लागन झालीय का, हे शोधण्यासाठी गेल्या 24 तासांत एक लाख 29 हजार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली.

चीन, जपान, ब्राझील आणि दक्षिण कोरियामध्ये कोरोना संसर्ग वाढल्यानंतर भारतात चिंता वाढली आहे.

भारत सरकारनं कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्देशही जारी केले असून, आरोग्य क्षेत्रातल्या तयारीचा आढावाही घेतला आहे.

जगभरातील काही देशांमध्ये कोव्हिड-19 ची रुग्णसंख्या वाढत असल्याने भारतात चिंतेचं वातावरण आहे.

चीनमध्ये कोव्हिड-19 चा सबव्हेरियंट BF.7 च्या संसर्गात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. भारतातही या व्हेरियंटचे 4 रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

दरम्यान, देशातील कोरोना स्थिती आणि त्यासंदर्भात यंत्रणेची तयारी यांचा आढावा घेण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे.

शिवाय, अनेक राज्यांनीही यासंदर्भात आणीबाणीच्या बैठका बोलावल्या. कोरोना संदर्भात सगळेच जण सक्रिय झाले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)