वाढत्या वयानुसार केस का पिकतात? केसांचं पिकणं कायमचं थांबवता येऊ शकतं का?

फोटो स्रोत, Getty Images
वय वाढतं तसं केस पांढरे का होतात, याचं कारण शोधून काढल्याचा दावा अमेरिकेच्या एका शास्त्रज्ञाने केला आहे.
केस काळे राखणाऱ्या पेशी जेव्हा परिपक्व होण्याची क्षमता गमावतात तेव्हा केस पिकू लागतात. या पेशी परिपक्व झाल्या तर त्यांचं रुपांतर मेलनोसाईट्समध्ये होतं. यामुळे केसांचा नैसर्गिक रंग टिकून राहतो.
न्यूयॉर्क विद्यापीठातील संशोधकांच्या चमूने उंदरांवर प्रयोग केला. उंदरांमध्ये अशाच स्वरुपाच्या पेशी असतात.
संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकांचा दावा आहे की, या शोधामुळे केस पुन्हा काळे करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात मदत मिळेल. ब्रिटिश असोसिएशन ऑफ डर्मेटालॉजिस्ट (बीएडी) संस्थेच्या मते मेलनोसाईट्सवर अभ्यासातून कॅन्सर आणि अन्य गंभीर आजारांसंदर्भात सखोल माहिती मिळवण्यासाठी तसंच उपचारात याची मदत होऊ शकेल.
केस कसे पिकतात?

फोटो स्रोत, Getty Images
आपलं वय वाढतं, आपले केस गळतात. ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे, जी संपूर्ण आयुष्यभर सुरू राहते. त्वचेत छिद्रांमधून केस निघतात, तिथेच केसांना काळं ठेवणाऱ्या पेशी असतात. या पेशी सातत्याने तयार होत असतात आणि नष्टही होत असतात. स्टेम सेलच्या माध्यमातून या पेशींची निर्मिती असते. न्यूयॉर्क विद्यापीठाच्या वैज्ञानिकांच्या मते स्टेम सेल जेव्हा पेशींची निर्मिती थांबतात, तेव्हा केस पांढरे होऊ लागतात.
न्यूयॉर्क विद्यापीठाच्या लँगवन हेल्थ चमूने या पेशींची निर्मिती आणि सातत्याने वाढ व्हावी यासाठी स्पेशल स्कॅनिंग आणि प्रयोगशाळेच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे. केसांचं वय वाढतं, तसे ते गळू लागतात. त्यांच्या जागी नवे केस येतात. पण काही काळानंतर मेलनोसाईट्स पेशी संथ होतात.
स्टेम सेल आपल्या जागी स्थिर होतात आणि त्यामुळे मेलनोसाईट्स विकसित होऊ शकत नाही. यामुळे केसांना रंग मिळण्याच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते आणि केस पांढरे होऊ लागतात.
पांढरे केस काळे होऊ शकतात का?
न्यूयॉर्क विद्यापीठाचे लँगवन हेल्थचे पीएचडी स्कॉलर आणि संशोधन चमूचे प्रमुख डॉ. सी सुन यांनी नेचर जर्नलला सांगितलं की, मेलनोसाईट्स स्टेम सेल केस काळे राखण्यात काम करतं हे समजून घेण्यासाठी आमचं संशोधन उपयोगी ठरेल. मेलसोनाईट्स स्टेम सेल्सना पक्कं केलं जाऊ शकेल जेणेकरुन पिकलेले केस पुन्हा काळे होऊ शकतील.
पिकलेले केस काळे होण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न केल्याची ही पहिलीच वेळ नाही. साधारणत: वृद्धत्वामुळे केस पिकतात. अकाली केस पिकण्याचे, पांढरं होण्याचं कारण प्रदूषणही असतं. काही संशोधकांच्या मते दडपण, ताणतणावामुळेही केस पांढरे होतात. तणावाचं कारण कमी करुनही केस पिकणं लांबवू शकतो असं संशोधकांना वाटतं.
काही संशोधकांच्या मते केस पिकण्यामागे अनुवांशिक कारणं असतात. काही लोक केसांना वेगवेगळे रंग लावतात. काही लोक कृत्रिम रंग लावतात.

फोटो स्रोत, Getty Images
ग्लॅमर मासिकाने दिलेल्या बातमीनुसार सिल्व्हर अर्थात करड्या रंगाचे केस मुलींमध्ये लोकप्रिय आहेत. उज्ज्वल आणि मोती रंगाचे केस इन्स्टाग्रामवर ट्रेन्डिंग आहेत.
केशरचनातज्ज्ञ ल्यूक हर्शसनने वोग मासिकाशी बोलताना सांगितलं की, काही वर्षापूर्वीपर्यंत लोकांना पिकलेले केस ठेवणं आवडत नसे. पण आता केस पिकले म्हणजे वय झालं असं मानलं जात नाही. लॉकडाऊननंतर लोकांना हे पटू लागलं आहे. अनेकांचे केस पिकले कारण केसांना रंग लावणारे उपलब्ध नव्हते. त्यामुळे अनेकांनी हा बदल पटून घेतला.
सर्वसाधारणपणे केसांपैकी एखादा केस पिकला तर तो काढून टाकला जातो. तज्ज्ञांच्या मते यामुळे त्याच पेशींमधून निघणारे दुसरे केस पिकण्यापासून रोखणं शक्य नाही. त्वचेवरी छिद्रं क्षतिग्रस्त झाल्यामुळे नवीन केसांची निर्मिती थांबते. या स्थितीत केसांचं प्रमाण कमी होतं, टक्कल पडू लागतं.
ब्रिटिश असोसिएशन ऑफ डर्मेटोलॉजिस्टच्या डॉ. लीला असफोर यांनी बीबीसीला सांगितलं की, केसांना रंग लावून देण्याचा उद्योग मोठा आहे. केसांना रंग लावण्याचा वैश्विक बाजार 2030 पर्यंत 33.7 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल. केसांना रंग लावायला मागणी आहे.
त्यांनी सांगितलं, या शोधाने दिलेला संकेत स्पष्ट आहे. पिकलेले केस पुन्हा काळे करण्याच्या दृष्टीने आम्ही एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. शास्त्रीय पातळीवर बोलायचं झालं तर एक जटिल प्रक्रिया समजून घेण्यासाठी आणखी एका जटिल प्रक्रियेचा आधार घेतला. मेलेनोमा तसंच त्वचेचा कॅन्सर अशा गंभीर आजाराचे तपशील समजून घेण्यासाठीही हे उपयोगी ठरले.
डॉ. लीला यांच्या मते याद्वारे एलोपेसिया एरीटा नावाची स्थिती समजून घेण्यातही हे उपयुक्त ठरेल. या स्थितीत शरीराची रोगप्रतिकारक क्षमता केसांवर हल्ला करते. यामुळे केस झडतात. काही वेळेला अशा लोकांचे केस पिकलेले केस तयार होतात.
डॉ. लीला यांच्या मते या शोधातून विटिलिगो म्हणजेच त्वचेच्या एखाद्या भागावर पांढरे डाग का येतात याबाबत अधिक माहिती मिळू शकेल. त्वचेचा नैसर्गिक रंग टिकवून ठेवण्यातही हे संशोधन उपयोगी पडू शकतं. अर्थात त्यासाठी आणखी अभ्यासाची आवश्यकता आहे.
ब्रिटिश हेअर अँड नेल सोसायटीचे डॉ. युसर अल नुमामी यांनी सांगितलं, डोक्यावरच्या केसांच्या चांगल्या वाढीसाठी वाढत्या वयाबरोबर डोक्यावरची त्वचा चांगली राहणं आवश्यक आहे.
त्यांनी सांगितलं, उंदरांवर केलेल्या संशोधनातून केसांना काळं ठेवण्याच्या पेशींबद्दल आम्हाला कळलं आहे. केस झडणं आणि अन्य आजारांसाठी स्टेम सेल उपचार क्षमतेसंदर्भात अधिक माहिती घेत आहोत. रंगउत्पादक पेशींसंदर्भात नवा शोध रुग्णांसाठी भविष्यात उपचारांचे पर्याय निर्माण करू शकतात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








