हिमोफिलिया: असा आजार ज्यात रक्त गोठत नाही, वाहतच राहतं

हिमोफिलिया, आरोग्य, रक्त

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हिमोफिलिया

समजा आपल्या हाताला कापलं किंवा पायाला काही लागलं, रक्त येऊ लागलं तर थोड्यावेळात रक्त वाहणं थांबतं. पण काही लोकांच्या बाबतीत रक्तप्रवाह थांबणं बंदच होत नाही.

हिमोफिलिया आजारात रक्ताचा प्रवाह वाहतच राहतो. हे जीवघेणंही ठरू शकतं.

17 एप्रिल हा दिवस हिमोफिलिया जागरुकता दिवस म्हणून पाळला जातो.

हिमोफिलिया काय आहे?

हिमोफेलिया, आरोग्य, रक्त

फोटो स्रोत, iStock

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक

हा एक अनुवांशिक आजार आहे. यामध्ये शरीरातून बाहेर पडणारं रक्त थांबतच नाही. जेव्हा आपल्या शरीरावर जखम होते, रक्तस्राव सुरू होतो. त्यावेळी रक्ताची गुठळी बनून प्रवाह थांबावा यासाठी प्लेटलेट्स मिळून त्याला दाट करतात. यामुळे रक्तप्रवाह थांबतो. हिमोफिलिया झालेल्या लोकांच्या शरीरात रक्त घट्ट करणारे घटक कमी प्रमाणात असतात. यामुळे प्रदीर्घ काळ रक्त वाहत राहतं.

गंगाराम रुग्णालयाचे मेडिसन कंसल्टंट डॉ.अतुल गोगिया सांगतात, "हा आजार बरेचदा अनुवांशिक कारणांमुळे होतो. आईवडिलांना हा आजार असेल तर मुलांनाही हा त्रास होण्याची शक्यता असते. अन्य कारणांमुळे हा आजार होण्याची शक्यता कमी असते".

"हिमोफिलिया दोन प्रकाराचा असतो. हिमोफिलिया ए प्रकारात फॅक्टरची कमतरता असते. हिमोफिलिया बी प्रकारात फॅक्टर9ची कमतरता असते. दोन्ही घटक रक्त गोठण्यासाठी आवश्यक असतात.

डॉ. अतुल यांच्या मते हा एक दुर्लभ आजार आहे. हिमोफिलिया ए या स्वरुपाचा आजार 10000 मध्ये एका व्यक्तीला होतो. बी प्रकाराचा आजार 40000 मध्ये एकाला होऊ शकतो. पण कुठलाही प्रकार असला तरी तो गंभीर आजार आहे. पण यासंदर्भात लोकांमध्ये जागरुकता झालेली नाही".

हिमोफिलियाचे लक्षण

हिमोफेलिया, आरोग्य, रक्त

फोटो स्रोत, iStock

फोटो कॅप्शन, रक्तस्राव

याची लक्षणं हलकी असू शकतात किंवा गंभीरही असू शकतात. रक्त गोठवणारे घटक किती प्रमाणात आहेत यावर ते अवलंबून असतं. प्रदीर्घ काळ रक्तस्राव होणं हे अन्य आजाराचंही लक्षण असू शकतं.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

-नाकातून रक्त वाहणं

-हिरड्यातून रक्त येणं

-त्वचा सहजपणे सोलली जाणं

-शरीरात अंतर्गत रक्तस्राव होत असल्यामुळे सांध्यांमध्ये वेदना

हिमोफिलिया आजार झाला असेल तर डोक्यात आतमध्ये रक्तस्राव होतो. प्रचंड प्रमाणात डोकेदुखी, मान आखडल्यासारखी वाटणं, उलटी अशी लक्षणं दिसतात. याव्यतिरिक्त धूसर दिसणं, बेशुद्ध पडणं, चेहऱ्याला लकवा येणं अशी लक्षणंही दिसतात. पण ही लक्षणं फारच कमी रुग्णांमध्ये दिसतात.

हिमोफिलियाचे तीन स्तर आहेत. हलक्या पातळीवर शरीरात रक्त गोठवणारे घटक 5 ते 10 टक्के असतात. मध्यम पातळीवर 1 ते 5 टक्के असतात. गंभीर आजार असेल तर हे प्रमाण केवळ एक टक्का एवढंच असतं.

हा आजार जन्मत: होऊ शकतो. अनेकदा मूल जन्माला आल्यानंतर या आजाराविषयी कळतं. हिमोफेलिया मध्यम किंवा गंभीर स्वरुपाचा असेल तर लहानपणी अंतर्गत रक्तस्राव झाल्यामुळे काही लक्षणं दिसू लागतात.

पण हिमोफिलिया गंभीर स्वरुपाचा असेल तर धोका अधिक असतो. जोरात काही लागलं तरी शरीरात अंतर्गत रक्तस्राव सुरू होतो.

आजाराचं स्वरुप गंभीर नसेल तर सहजपणे याबद्दल कळत नाही. लहान मुलांना दात येतात आणि रक्त वाहणं थांबत नाही त्यावेळी या आजाराबद्दल कळतं.

अनेकदा पायाला मार बसतो. त्यावेळी रक्त साकळतं. ज्यामुळे गुडघ्याला सूज येते.

उपाय काय?

हिमोफेलिया, आरोग्य, रक्त

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इंजेक्शनच्या माध्यमातून उपचार होतात

काही वर्षांपूर्वी हिमोफिलियावर उपचार कठीण होते. पण आता रक्ताची गुठळी करणारे घटक इंजेक्शनच्या माध्यमातून देता येतात. आजाराचं स्वरुप गंभीर नसेल तर औषधांनीही बरं वाटू शकतं.

आईवडिलांना हा आजार असेल आणि मुलाला हा आजार होण्याची शक्यता वाटत असेल तर त्वरित चाचणी करणे आवश्यक आहे.

भावाबहिणींपैकी कोण्या एकाला हा आजार असेल आणि दुसऱ्याला आजाराची लक्षणं नसतील तर काही कालावधीनंतर भावंडाला हा आजार होऊ शकतो.

डॉ. अतुल सांगतात, "बहुतांश रुग्णांमध्ये फॅक्टरची कमतरता जाणवते. शरीरात नेमक्या कोणत्या घटकाची कमतरता आहे हे समजून घेतलं जातं. बाजारात असे घटक उपलब्ध आहेत त्यामुळे योग्यवेळी उपचार सुरू होतात. वेळीच कळलं तर इंजेक्शन देऊन उपचार सुरू केले जातात".

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)