अंटार्क्टिकातल्या प्राण्यांना होतोय 'सनबर्न', हे आहे कारण

ओझोन

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, व्हिक्टोरिया गिल
    • Role, विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

गेल्या काही वर्षांमध्ये अंटार्क्टिकामधल्या वन्यप्राण्यांना असणारा सूर्यकिरणांपासूनचा धोका वाढला असल्याचं संशोधकांचं म्हणणं आहे.

घातक अतिनील किरणांपासून - Ultraviolet Rays पासून संरक्षण करणाऱ्या वातावरणातल्या ओझोन गॅसच्या थराला छिद्र पडलंय आणि गेल्या वर्षभरापासून अधिक काळ हे छिद्र अंटार्क्टिका खंडाच्या वर आहे.

वातावरण बदलामुळे ऑस्ट्रेलियात पेटलेल्या भयानक वणव्यांतून बाहेर पडलेला प्रचंड धूर हे ओझोनच्या पातळीत घट होण्याचं मोठं कारण मानलं जातंय.

ग्लोबल चेंज बायोलॉजी नावाच्या एका पत्रिकेत याविषयीचा एक अभ्यास प्रकाशित करण्यात आलाय.

ओझोनला पडलेलं छिद्र

क्लायमेट चेंज बायोलॉजिस्ट प्रा. शॅरन रॉबिन्सन यांनी बीबीसी न्यूजशी बोलताना सांगितलं, "मी लोकांना ओझोनच्या छिद्राबद्दल सांगते तेव्हा ते म्हणतात, 'पण ते तर आता भरून येतंय ना?"

पृथ्वीपर्यंत पोहोचणाऱ्या सोलर रेडिएशनच्या प्रमाणावरून 1985 मध्ये अंटार्क्टिकामध्ये काम करणाऱ्या संशोधकांनी ओझोनच्या थरातील छिद्राचा शोध लावला होता.

ओझोनवर परिणाम करून या वायूच्या पातळीत घट करणारी काही रसायनं - Chemicals हे छिद्र पडण्यासाठी कारणीभूत ठरतात.

रेफ्रिजरंट (Refrigerant) म्हणजे थंडावा निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणारे हे क्लोरोफ्लुरोकार्बन्स (chlorofluorocarbons) म्हणजेच CFC वायू ओझोनसाठी घातक ठरत होते.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

ओझोनवर परिणाम करून या थरात घट करणाऱ्या या वायूंचा वापर कमी करण्यावर 1987 मध्ये जगभरातल्या देशांनी मान्य केलं. या कराराला माँट्रिआल प्रोटोकॉल (Montreal Protocol) म्हटलं जातं आणि हा आजवरच्या इतिहासातला सर्वांत यशस्वी पर्यावरण विषयक करार आहे.

ओझोनचा थर आता भरून येतोय. पण असं असलं तरीही जिथे हा ओझोनचा थर पातळ झालाय तिथे छिद्र असून ते दर वसंत ऋतूत अंटार्क्टिकाच्या वर येत असल्याचं प्रा. रॉबिन्सन सांगतात.

अत्यंत कमी तापमान आणि वातावरणात अगदी वर असणारे बर्फाचे स्फटिक असणारे ढग म्हणजेच High Atmospheric Clouds यांच्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होता आणि ध्रुवीय खंडाच्या या भागात ओझोनमध्ये ही घट होते. या केमिकल रिअॅक्शन्समुळे ओझोनच्या थराला छिद्र पडतं.

सप्टेंबर - ऑक्टोबरच्या काळात हे छिद्र सर्वांत मोठ्या आकाराचं असतं. हा तो काळ असतो जेव्हा अंटार्क्टिकामध्ये जमिनीवरील झुडपं आणि प्राणी हे बर्फाच्या थराखाली सुरक्षित असतात आणि समुद्रावर तयार झालेल्या मोठ्या प्रमाणातल्या बर्फाखाली जलचरही सुरक्षित असतात.

पण आता हे ओझोन छिद्र डिसेंबरनंतरही टिकून राहिलंय. या काळात अंटार्क्टिकामधला उन्हाळा सुरू होतो.

"या काळात झाडं - प्राणी यांच्यावर अडोसा नसतो, आणि त्यांना सर्वाधिक धोका असण्याची शक्यता असते," प्रा. रॉबिन्सन सांगतात.

अतिनील किरणं आणि प्राण्यांवरील परिणाम

सूर्याकडून येणारे विशिष्ट प्रकारचे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ज्याला UV-B किरणं म्हटलं जातं, त्यामुळे माणसामध्ये त्वचेचा कॅन्सर आणि मोतीबिंदूचा धोका वाढतो. पण अंटार्क्टिकातले सस्तन प्राणी आणि पक्ष्यांवर असाच परिणाम होतो का याची स्पष्टता अजून संशोधकांना आलेली नाही.

फर आणि पिसं - Feathers असणाऱ्या सील आणि पेंग्विन्ससारखा प्राण्यांना संरक्षण मिळण्याची शक्यता असल्याचं प्रा. रॉबिन्सन सांगतात.

"पण अंटार्क्टिकातल्या प्राण्यांना असलेला सर्वात मोठा धोका म्हणजे डोळ्यांचं होऊ शकणारं नुकसान."

ओझोन

फोटो स्रोत, Getty Images

अंटार्क्टिकातल्या UV किरणांचा झाडं आणि प्राण्यांवर होणाऱ्या परिणामाबद्दलच्या सगळ्या संशोधनांचा प्रा. रॉबिन्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला.

अंटार्क्टिकातलं मॉस (Moss) स्वतःसाठीची सनस्क्रिनसारख्या संयुगांचं (Sunscreen Compounds) संश्लेषण (Synthesis) करत असल्याचं त्यांना आढळलं.

प्रा. रॉबिन्सन सांगतात, "जर सनस्क्रीन तयार करण्यासाठी ऊर्जा वापरली जात असेल तर याचा अर्थ वाढीसाठी कमी ऊर्जा वापरली जाते. म्हणजे सूर्यापासून संरक्षण मिळवण्यासाठी किंमत मोजली जातेय."

Krill - क्रिल नावाचा कोलंबीसारखा लहान जलचर अंटार्क्टिकामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो आणि इथल्या अन्न साखळीसाठीचा पाया आहे. UV किरणं टाळण्यासाठी हे क्रिल जलचर समुद्रात आणखी खोलवर झाल्याचं आढळून आलयं. याचा परिणाम त्यांना खाणारे व्हेल्स, सील्स, पेंग्विन्स आणि इतर समुद्री पक्ष्यांवर होण्याची शक्यता आहे.

प्रा. रॉबिन्सन सांगतात, "क्रिल जे फायटोप्लँक्टॉन (Phytoplankton) खातात, त्यांनाही सूर्यकिरणांपासूनचा संभाव्य धोका टाळण्यासाठी कवच वा सनस्क्रीन तयार करावं लागेल."

ओझोनमधलं छिद्र का भरून येत नाहीये?

ओझोनचं छिद्र इतका काळ टिकण्याचं कारण म्हणजे 2019 आणि 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात मोठ्या प्रमाणात लागलेले प्रचंड वणवे म्हणजेच Bushfires.

जिम हेवुड हे एक्सटर विद्यापीठात वातावरण विज्ञानाचे (Atmospheric Science) प्राध्यापक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये अंटार्क्टिकावरील ओझोनच्या छिद्राचा टिकून राहण्याचा वाढत चाललेला कालावधी ही धोक्याची घंटा असल्याचं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं.

ही समस्या हाताळण्यासाठी सध्या करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबद्दल समाधानी राहून चालणार नसल्याचंही ते म्हणतात.

ओझोन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अंटार्क्टिकातल्या या मॉसने सूर्यकिरणांपासून बचाव म्हणून सनस्क्रीनसारखं संयुग तयार करायला सुरुवात केलीय.

ओझोनच्या थराला पडलेलं छिद्र पटकन भरून न येण्यामागे अनेक कारणं आहेत. यात वणवे, जगभरात जागृत झालेले ज्वालामुखी ही महत्त्वाची कारणं आहेत. कारण अशा घटनांमधून जे कण वातावरणात उत्सर्जित होतात ज्यामुळे ओझोनवर परिणाम करणाऱ्या रासायनिक प्रक्रियांचा अधिक भडका उडतो.

वातावरणाचं तापमान कमी करण्यासाठी केले जाणारे काही प्रयोग - Geoengineering हे देखील घात ठरू शकत असल्याचं प्रा. रॉबिन्सन सांगतात. यामध्ये वातावरणाच्या वरच्या थरामध्ये कण सोडून ढग तयार करण्याची योजना आहे, पण यामुळेही ओझोन विरळ होणार असल्याने की कल्पना चांगली नसल्याचं त्या सांगतात.

प्रा. रॉबिन्सन म्हणतात, "अंटार्क्टिकाला मदत करण्यासाठी आपण करू शकतो अशी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे हवामान बदल रोखण्यासाठी पावलं उचलणं. शक्य तितक्या लवकर कार्बन उत्सर्जन कमी करायला हवं, म्हणजे वणव्यांचं प्रमाण कमी हवोईल आणि ओझोनचा थर भरून येण्याची प्रक्रिया काहीशी सुकर होईल."