'मेड इन हेवन' सीरिज मधला दलित मराठी मुलीच्या लग्नाचा एपिसोड वादात का?

मेड इन हेवन वेब सीरिजमधील दृश्य

फोटो स्रोत, neeraj.ghaywan/instagram

फोटो कॅप्शन, मेड इन हेवन वेब सीरिजमधील दृश्य
    • Author, मधू पाल वोहरा
    • Role, बीबीसीसाठी

ॲमेझॉन प्राईमवरील मेड इन हेवन ही वेब सीरिज सध्या चर्चेत आहे.

दिल्ली आणि एनसीआरमधल्या वेगवेगळ्या हायफाय लग्नांचं प्लॅनिंग करणाऱ्यांची ही गोष्ट आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये एका नवीन जोडप्याची लग्नाची गोष्ट दाखवली जाते.

यंदाच्या सीझन-2 च्या 7 भागांपैकी 5व्या एपिसोडची खासकरून चर्चा होताना दिसतेय.

नीरज घेयवान यांनी दिग्दर्शित केलेल्या या एपिसोडमध्ये दलित मुलीचं पंजाबी मुलासोबतचं लग्न दाखवण्यात आलं आहे.

यात राधिका आपटे ही पल्लवी मेनके नावाच्या एका दलित मुलीची भूमिका साकारताना दिसतेय, जिला तिचं लग्न बौद्ध रीतीरिवाजांप्रमाणे करण्यासाठी तिच्या होऊ घातलेल्या पंजाबी सासरच्यांशी संघर्ष करावा लागतो.

कौतुक आणि वादही

या एपिसोडच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक बौद्ध विवाहसोहळा मुख्य प्रवाहात पाहायला मिळत असल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. खुद्द वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या भागाचं कौतुक केलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

मात्र हा एपिसोड एका वादातही सापडला आहे.

या भागात पल्लवी मेनके हे पात्र उच्चशिक्षित आहे, ती अमेरिकेत प्राध्यापिका आहे. तिने आपला एक दलित महिला म्हणून जगाला सामोरं जाण्याचा संघर्ष तिने एका पुस्तकातून मांडल्याचंही या भागात सुरुवातीला दाखवलं जातं.

दरम्यान, Coming out as a Dalit या पुस्तकाच्या लेखिका यशिका दत्त यांनी राधिका आपटेने साकारलेलं पात्र त्यांच्या जीवनापासून प्रेरित आहे, मात्र त्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचं क्रेडिट दिलं गेलं नाही, असं म्हटलंय.

यशिका दत्त यांची इन्स्टाग्राम पोस्ट

फोटो स्रोत, yashicadutt

फोटो कॅप्शन, यशिका दत्त यांची इन्स्टाग्राम पोस्ट

एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये यशिका लिहितात, “आज नीरज घेयवानसारख्या दिग्दर्शकांमुळे अनेक दलित पात्र बॉलिवुडमध्येही मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहेत, जे आधी फक्त दाक्षिणात्य सिनेमांमध्येच दिसायचे. 'मेड इन हेवन'चा पाचवा एपिसोड खरंतर दलित महिलांसाठी एक मोठा विजय आहे, ज्या एका जातीयवादी समाजात राहतात.”

“त्यातील एक पात्र तिच्या आजीची गोष्ट सांगतं, जी हाताने शौचालयं साफ करायची. मी माझ्या खऱ्याखुऱ्या आयुष्याचं पडद्यावर असं रूपांतरण पाहून भारावून गेले होते. ते माझेच शब्द होते, जे पल्लवी मेनके नावाचं पात्र त्या एपिसोडमध्ये बोलत होतं. पण माझं नाव तिथे कुठेही नव्हतं. त्यामुळे आपल्या सर्वांच्या सामूहिक विजयाच्या या क्षणाला एका वेगळ्याच नैराश्याचं गालबोट लागलं.”

जे विचार मी आयुष्यभर रुजवले, जे माझं काम आहे, ज्यासाठी माझा आजही प्रचंड तिरस्कार केला जातो, ते माझ्या परवानगीशिवाय वापरण्यात आले आहेत.”

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

Instagram पोस्ट समाप्त

दरम्यान, या एपिसोडचे दिग्दर्शक नीरज घेयवान यांनी यशिका दत्त यांच्या या पोस्टआधीच सोशल मीडियावरील चर्चांची दखल घेत इन्स्टाग्रामवर अनेकांचे आभार मानले होते.

व्हीडिओ कॅप्शन, 'मेड इन हेवन'मधला दलित मराठी मुलीच्या लग्नाचा एपिसोड वादात का?

त्यात त्यांनी दलित विचारवंत, लेखक सुरज येंगडे आणि सुजाता गिल्डा यांचे आभार मानले आहेत. याशिवाय त्यांनी यशिका दत्त यांच्या पुस्तकाचाही उल्लेख करत म्हटलं आहे की, पल्लवी मेनकेचं पात्र लिहिताना त्यातून प्रेरणा घेण्यात आली होती.

राधिका आपटे

फोटो स्रोत, Radhika Apte/Facebook

फोटो कॅप्शन, राधिका आपटे

आता यशिका दत्त यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की एपिसोड आणि शो प्रसिद्ध झाल्यानंतर असे सोशल मीडियावर क्रेडिट देण्याऐवजी त्यांना एपिसोडच्या निर्मितीदरम्यानच सांगितलं गेलं पाहिजे होतं आणि एपिसोडमध्येच त्यांना क्रेडिट देणं योग्य ठरलं असतं.

मात्र आता ॲमेझॉन प्राईमच्या वतीने 'मेड इन हेवन' या शोचे निर्माते झोया अख्तर, रीमा कागती, अलंकृता श्रीवास्तव आणि नीरज घेयवान यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, “सोशल मीडियावरील चर्चा ऐकून आम्हाला दुःख झालं आहे. या शोच्या केंद्रस्थानी वेडिंग प्लॅनर्स आहेत, आणि या एपिसोडचं मुख्य पात्र तिच्या इच्छेनुसार एका बौद्ध लग्नासाठी संघर्ष करताना दाखवलं आहे.

"यातलं काहीही यशिका दत्त यांच्या ‘Coming out as a Dalit’ या पुस्तकातून घेण्यात आलेलं नाही. त्यामुळे आम्ही दत्त यांचं काम आणि त्यांचे विचार वापरले आहेत, हे दावे फेटाळतो.”

मुस्लिम पात्राविषयी वाद

झोया अख्तर आणि रीमा कागतीच्या शो 'मेड इन हेवन 2' मधील दुसरा मोठा वाद हा प्रत्येक वेळी शो आणि चित्रपटांमध्ये मुस्लिम पात्रे योग्य प्रकारे का दाखवली जात नाहीत याबद्दल आहे.

अत्याचार होत नसलेली एखादं मुस्लिम स्त्री पात्र कधी दाखवली जाईल का? हा प्रश्न दिया मिर्झाने साकारलेल्या शहनाजच्या पात्राबाबत होता.

या एपिसोडमध्ये, शहनाजचा पती लग्नाच्या अनेक वर्षांनी दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतो आणि यामुळे ती पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे आणि तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

मेड इन हेवन

फोटो स्रोत, neeraj Ghaywan

यावर उपस्थित होत असलेला प्रश्न पाहता झोया अख्तरने दिलेल्या उत्तराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

झोया अख्तरनं तिच्या मागील सर्व चित्रपटांचा संदर्भ देत लिहिलंय की, "लक बाय चान्समधील जफर खान आणि तनवीर. दिल धडकने दो मधील फराह अली, जिंदगी ना मिलेगी दोबारा मधील इम्रान आणि लैलाची गोष्ट. गली बॉयची गोष्ट. इन मेड इन हेवनमध्ये सरफराज खान, लीला शिराझी, कबीर, फैजा आणि नवाब यांची गोष्ट...”

'संवेदनशील मुद्दे मांडणं महत्त्वाचं'

ही सीरिज पाहिल्यानंतर बीबीसीशी बोलताना जेएनयूचे प्राध्यापक हरीश एस. वानखेडे म्हणाले की, "मला ही वेब सिरीज खूप आवडली. लग्न आणि प्रेमप्रकरणावर आधारित आत्तापर्यंत आलेल्या पारंपरिक चित्रपटांपेक्षा हा चित्रपट खूपच वेगळा आहे. या वेब सिरीजमध्ये लेस्बियन मॅरेज, म्हातारपणीचा विवाह किंवा दलित विवाह अशा अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.

"ज्या विषयांवर फारशी चर्चा होत नाही आणि तुम्हाला दिसेल की या दुसऱ्या सीझनमध्ये हे सर्व विषय अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडण्यात आले आहेत. हे सर्व विषय अतिशय संवेदनशील असले तरी ते अतिशय सुंदर पद्धतीने मांडण्यात आले आहेत. आतापर्यंत OTT प्लॅटफॉर्मवर आलेल्या सर्व प्रकारच्या कंटेंटमध्ये हा अतिशय बौद्धिक आणि प्रगतीशील कंटेट मानला जाऊ शकतो, असं मला वाटतं."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)