कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा जागीच मृत्यू

कर्नाटकमधील चित्रदुर्गमध्ये अपघात, 11 जण मृत्युमुखी

फोटो स्रोत, ANI

कर्नाटकातील चित्रदुर्ग जिल्ह्यात झालेल्या एका भीषण अपघातात किमान 11 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. हा अपघात राष्ट्रीय महामार्ग 48 वर झाला आहे.

चित्रदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, "हा अपघात बुधवारी रात्री सुमारे 2 वाजता झाला. बंगळुरूहून गोकर्णकडे जाणाऱ्या बसची समोरून येणाऱ्या ट्रकला धडक बसली आणि त्यामुळे बसला आग लागली."

"ही बस स्लीपर कोच होती आणि त्यात 32 प्रवासी होते. आतापर्यंत आम्ही 11 मृतदेहांची ओळख पटवली आहे आणि सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे."

घटनास्थळावरून मिळालेल्या छायाचित्रांवरुन हा अपघात अतिशय गंभीर असल्याचं दिसतंय. बसचं पूर्ण नुकसान झालं आहे, तर ट्रकच्या (लॉरीच्या) पुढील भागाचेही मोठे नुकसान झाले आहे.

(ही बातमी सतत अपडेट होत आहे)

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)