कमला हॅरिस नेमक्या कुठे कमी पडल्या, उशिराची उमेदवारी की मंदावलेला प्रचार?

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कमला हॅरिस या स्वतःला बायडन यांच्या धोरणांपासून वेगळे करू शकल्या नाहीत, असं बोललं जातंय.
    • Author, कर्टनी सुब्रम्हण्यम
    • Role, बीबीसी न्यूज, वॉशिंग्टन

कमला हॅरिस साधारणपणे एका महिन्यापूर्वी एबीसी वृत्तसंस्थेच्या ‘द व्हू’ या कार्यक्रमात आल्या होत्या. त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता असणाऱ्या अमेरिकन नागरिकांसाठी कमला हॅरिस कशा आहेत याची ओळख करून देणारी एक मुलाखत होईल, हे तेव्हा अपेक्षित होतं.

पण जो बायडन यांच्याबाबत एका प्रश्नाचं हॅरिस यांनी दिलेलं उत्तर ऐकून सगळ्या मुलाखतीलाच ग्रहण लागल्यासारखं झालं.

“त्यांच्याबद्दल विचार केल्यावर माझ्या मनात काहीही येत नाही,” असं हॅरिस म्हणाल्या होत्या.

हॅरिस यांनी दिलेलं हे उत्तर रिपब्लिकन पक्षानं निवडणुकीत त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी सतत वापरलं. त्यांच्या प्रचारावर लागलेला हा डाग हॅरिस पुसूच शकल्या नाहीत आणि तेच डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात त्यांच्या पराभवाचं कारण बनलं.

‘वाईट वाटून घेऊ नका,’ असं आवाहन स्वतःचा पराभव मान्य करता बुधवारी दुपारी हॅरिस यांनी त्यांच्या समर्थकांना केलं.

पण त्या कुठे चुकल्या आणि आणखी काय करायला हवं होतं यावर बराच काळ चर्चा चालणार आहे. त्यात एकमेकांकडे बोटं दाखवण्यासोबतच पक्षाच्या भवितव्याची काळजीही केली जाणार आहे.

हॅरिस यांच्या प्रचार अधिकाऱ्यांकडून बुधवार सकाळपर्यंत काहीही प्रतिक्रिया आली नव्हती. पण त्यांना मदत करणारे मात्र, धक्का बसला असल्याचं सांगत होेते. कमला हॅरिस इतक्या मतांनी मागे पडतील असंही त्यांना कधी वाटलं नव्हतं.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

“हा पराभव फार त्रासदायक आणि अविश्वसनीय होता,” असं हॅरिस यांचे प्रचारप्रमुख झेन ओमालेय डिलॉन यांनी बुधवारी त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका ईमेलमध्ये म्हटलं. “हे स्वीकारायला वेळ लागले,” असं पुढं लिहिलं होतं.

विद्यमान उप-राष्ट्राध्यक्ष असूनही हॅरिस स्वचःला फारशा प्रसिद्ध नसलेल्या राष्ट्राध्यक्षांपासून अंतरावर ठेवू शकल्या नाहीत. देश आर्थिक संकटात असताना त्या कशापद्धतीने बदल घडवून आणू शकतात हेही त्यांना मतदारांना पटवून देता आलं नाही.

बायडन यांचं ओझं

डिबेटमध्ये अडचणीत आल्यानंतर जो बायडन उमेदवारीच्या शर्यतीत मागं पडले. त्यावेळी नेहमीची प्रक्रिया न करता किंवा कोणत्याही मतमतांतराचा विचार न करता कमला हॅरिस यांना थेट डेमोक्रेटिक पक्षाची उमेदवारी मिळाली.

“नेतृत्व करणाऱ्यांच्या नव्या पिढीची” आशा दाखवत त्यांनी 100 दिवसांच्या प्रचाराला सुरुवात केली. महिलांसाठी गर्भपाताचा अधिकार आणि कष्टकरी वर्गाला जिंकून घेण्यासाठी वाढणारी महागाई आणि घरांच्या किंमती यावर भर देत त्या प्रचार करत होत्या.

मतदानाच्या दिवसापर्यंत तीन महिन्यांत त्यांनी समर्थकांची एक लाट तयार केली होती.

सोशल मीडियावरचे मीम्स, टेलर स्वीफ्ट सारखे सेलिब्रेटी समर्थक आणि आधी कधीही मिळाली नव्हती एवढी देणगी हे सगळंच त्याची साक्ष देतं. पण तरीही मतदात्यांच्या मनातली बायडन-विरोधी भावना त्या कमी करू शकल्या नाहीत.

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हॅरिस यांना प्रचारासाठी फारच कमी वेळ मिळाला तर ट्रम्प या वर्षाच्या सुरुवातीपासून निवडणूक प्रचारात व्यस्त होते.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

गेल्या चार वर्षातल्या त्यांच्या कार्यकालात बायडन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून सतत 40 पेक्षाही कमी मार्क मिळत होते. जवळपास दोन तृतीयांश मतदात्यांमध्ये देश चुकीच्या मार्गाने चालला असल्याची भावना होती.

बायडन यांची जागा घेताना हॅरिस त्यांच्याशी फारच प्रामाणिक राहिल्या का? असा सवाल काही समर्थक खासगीत करतायत. पण उप-राष्ट्राध्यक्षांचे माजी सहकारी जमल सिमोन्स यांनी हा सगळा एक सापळा होता असं म्हटलं.

बायडन यांच्यासोबत अंतर ठेऊन वागल्या असत्या तर हॅरिस अप्रामाणिक असल्याची टीका करायची आणखी एक संधी रिपब्लिकन पक्षाला मिळाली असती असं ते म्हणतात. “तुम्हाला ज्यानं निवडलं त्या राष्ट्राध्यक्षापासून तुम्ही अंतर ठेवून कसं राहणार,” असं ते म्हणाले.

बायडन यांच्या प्रशासकीय कामाबद्दल हॅरिस बोलत होत्या. पण त्यांनी त्यांच्यावर थेटपणे कोणतीही टीका केली नाही.

तसंच, बायडन यांनी सुरू केलेली कोणतीही धोरणं बंद करण्याचा प्रयत्न असल्याचं दाखवलं नाही. पण त्या धोरणांचा प्रचारासाठी वापरही केली नाही.

पण या सगळ्यात त्यांनी देशाचं नेतृत्व का केलं पाहिजे? याचं ठोस कारण आणि आर्थिक निराशा आणि स्थलांतरीतांचा मुद्दा त्या कशा हाताळणार आहेत याचं स्पष्टीकरण द्यायला हॅरिस कमी पडल्या.

कमला हॅरिस

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कमला हॅरिस महागाई आणि मध्यमवर्गाच्या प्रश्नांवर उत्तर देऊ शकल्या नाहीत

आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खराब होत असल्याचं 10 पैकी 3 मतदार सांगत होते. चार वर्षांपूर्वी हा आकडा 10 पैकी 2 असा होता असं एपीव्होटकास्ट या सर्वेक्षणात समोर आलं.

अमेरिकेतल्या शिकागो युनिवर्सिटीतनं 1,20,000 मतदारांबरोबर केलेलं हे सर्वेक्षण होतं.

10 पैकी 9 मतदार किराणा सामानाच्या वाढणाऱ्या किमतीबद्दल काळजीत होते.

याच सर्वेक्षणात 10 पैकी 4 मतदार अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या स्थलांतरितांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवायला सांगत होते. 2020 मध्ये हा आकडा 10 पैकी 3 इतका होता.

त्याचं प्रशासन हे बायडन यांच्यासारखं नसेल हे सांगण्याचा हॅरिस यांनी प्रयत्न केला असला, तरी नवीन धोरणं नेमकी काय असतील? हे स्पष्टपणे सांगायला त्या कमी पडल्या.

काही प्रश्न थेटपणे बोलायचे त्यांनी टाळले आणि लोकांना बायडन यांचं प्रशासन कुठे कमी पडलं असं वाटतं याबद्दल त्या मोकळेपणाने बोलत राहिल्या.

समर्थकांचं जाळं तयार करण्यासाठीचा संघर्ष

कृष्णवर्णीय, लॅटीन, तरूण तसंच कॉलेजपर्यंत शिकलेला निमशहरी भागातला वर्ग हा बायडन यांना 2020 मध्ये जिंकायला मदत कराणारा मतदार आपण पुन्हा जोडून शकू अशी आशा हॅरिस यांना वाटत होती.

पण याच मतदात्यांमुळे हॅरिस यांच्या पदरी निराशा आली. लॅटिन मतदारांकडून 13, कृष्णवर्णीय मतदारांकडून 2 तर तीसपेक्षा कमी वयाच्या मतदारांकडून 6 पॉईन्ट्स त्या हरल्या असा अंदाज एक्झिट पोलने दिला आहे.

मतमोजणी होईल तसं हे चित्र बदलूही शकतं पण सध्या हेच प्रातिनिधिक स्वरूपात मांडलं जातंय.

वर्मोटमधल्या स्वतंत्र सिनेटर बर्नी सॅन्डर्स 2016 ला डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात तर 2020 मध्ये बायडन यांच्या विरोधात हरले होते.

कष्टकरी वर्गातल्या मतदात्यांनी डेमोक्रेटिक पक्षाची साथ सोडली यात काहीही आश्चर्य नसल्याचं ते म्हणतात.

“पहिल्यांदा श्वेतवर्णीय कष्टकरी वर्गाने आणि आता लॅटिन आणि कृष्णवर्णीय कामगारांनीही साथ सोडली आहे. डेमोक्रेटिक नेते जैसे थे स्थितीचं समर्थन करणारे आहेत. तर रागवलेल्या अमेरिकन लोकांना आता बदल हवा आहे. त्यांचं बरोबरच आहे,” बर्नी म्हणाले.

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प.
फोटो कॅप्शन, कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प.

अनेक महिला मतदार या ट्रम्प यांना सोडून हॅरिस यांच्या मागे गेल्या असल्या तरी प्रचारादरम्यान वाटत होती तितकी मतही उप-राष्ट्राध्यक्षांना मिळालेली नाहीत.

त्यांची उमेदवारी इतिहासानं नोंद करून ठेवावी अशी असली तरीही. निमशहरी भागात राहणाऱ्या रिपब्लिकन पक्षाच्या महिलांना जिंकून घेणं ही महत्त्वकांक्षा हॅरिस बाळगून होत्या. पण प्रत्यक्षात 53% श्वेतवर्णीय महिलांनी त्यांच्या विरोधात मतदान केलं.

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं गर्भपाताचा अधिकार सांविधानिक नसल्याचा निकाल दिल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. त्यामुळे हॅरिस यांनी प्रजननाच्या अधिकारांवर दिलेला भर जिंकायला मदत करेल असं डेमोक्रेटिक पक्षाला वाटत होतं.

तरी जवळपास 54% महिलांनी हॅरिस यांना मत दिलं. पण 2020 ला बायडन यांना मिळालेल्या 57% महिलांच्या मतांपेक्षा ते कमीच होतं. ही आकडेवारी एक्झिट पोलमधून घेण्यात आलीय.

ट्रम्प यांच्यावर लक्ष्य केंद्रीत करणं उलटलं

तिकिट मिळण्याआधीच हॅरिस निवडणुकीचा मुद्दा बायडन यांच्या कार्यकळापेक्षा ट्रम्प यांच्या कामावर नेला.

पूर्वी कॅलिफोर्नियामध्ये वकील म्हणून काम करणाऱ्या हॅरिस यांनी माजी राष्ट्राध्यक्षांवर जोरदार खटला भरण्याचे मनसुबेही रचले.

पण ट्रम्प लोकशाहीला असणारा सगळ्यात मोठा धोका आहे या बायडन यांच्या मुख्य आरोपाकडं त्यांनी लक्ष दिलं नाही. त्याऐवजी खासगी स्वातंत्र्याचं संरक्षण करणारा आणि मध्यम वर्गीयांना आधार देणारा संदेश देत आनंददायी भविष्याची चित्रं त्या प्रचाराच्या सुरुवातीच्या दिवसात दाखवत होत्या.

प्रचाराच्या शेवटी दुसऱ्यांदा ट्रम्प आल्याने उद्भवणारे धोके लोकांसमोर आणण्याचा निर्णय हॅरिस यांनी घेतला. त्यांच्या कामकाजाला फॅसिस्ट म्हणत ट्रम्प यांच्यावर नाराज असणाऱ्या रिपब्लिकन समर्थकांसोबत प्रचार केला.

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प

हिटरलच्या अन्यायाला मान्यता देणारी वक्तव्य ट्रम्प यांनी केल्याचं व्हाईट हाऊसमधल्या कर्मचाऱ्यांचे माजी प्रमुख जॉन केली यांनी सांगितलं. तेव्हा हॅरिस यांनी राष्ट्राध्यक्ष मानसिक दृष्ट्या अस्थिर असल्याचं म्हटलं.

“डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करणं हेच त्यांचं एकमेव ध्येय झालं तेव्हा कमला हॅरिस हरल्या,” असं अनुभवी निवडणूक विश्लेषक फ्रँक लुन्ट्झ मंगळवारी रात्री म्हणाले.

“ट्रम्प यांच्याबद्दल मतदात्यांना आधीपासूनच सगळं माहिती आहे. त्यामुळं निवडून आल्यानंतरच्या पहिल्या एका तासात, एका दिवसात, एका महिन्यात आणि एका महिन्यात हॅरिस यांचं प्रशासन काय काम करेल हे मतदात्यांना माहीत करून घ्यायचं होतं,” असं ते पुढे सांगतात.

“हॅरिस यांच्यावरून हलवून ट्रम्पवर यांच्यावर स्पॉटलाईट टाकणं हेच त्यांचा प्रचार फसण्यामागचं कारण होतं.”

ट्रम्प यांना हरवण्यासाठी लागणारे हॅरिस यांचे समर्थक एकत्र आलेच नाहीत. डेमोक्रेटिक पक्षाला मिळालेली एवढी कमी मतं ही फारसा प्रसिद्ध नसलेला उमेदवार उभं करण्यामुळं नाहीत, तर इतर अनेक प्रश्न असल्यामुळेच झाली आहे हेच दाखवतात.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.