तुषार देशपांडे ठरला पहिला इम्पॅक्ट प्लेयर; जाणून घ्या इम्पॅक्ट प्लेयरचा नियम

चेन्नई सुपर किंग्स, अंबाती रायुडू, तुषार देशपांडे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चेन्नईने अंबाती रायुडूऐवजी तुषार देशपांडेला संघात समाविष्ट केलं.

IPL म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी एक पर्वणीच असते. चेन्नई सुपर किंग्सचा तुषार देशपांडे आयपीएलमधला पहिला इम्पॅक्ट प्लेयर ठरला. यंदाच्या आयपीएल हंगामापासून इम्पॅक्ट प्लेयर हा नियम लागू करण्यात आला.

अहमदाबाद इथे झालेल्या पहिल्या लढतीत चेन्नईने पहिल्या इनिंग्जनंतर अंबाती रायुडूला वगळून इम्पॅक्ट प्लेयर म्हणून तुषार देशपांडेला संघात सहभागी केलं. रायुडूने 12 चेंडूत 12 धावा केल्या.

गोलंदाजी करताना अतिरिक्त गोलंदाज असावा या हेतूने चेन्नईने रायुडूऐवजी तुषारला खेळवण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय चेन्नईसाठी फलदायी ठरला नाही.

तुषारच्या 3.2 षटकात 51 धावा वसूल झाल्या. त्याने शुबमन गिलची 63 धावांची खेळी संपुष्टात आणली पण त्यानंतरही 2022 चा हंगाम जिंकलेल्या गुजरात टायटन्सने या सामन्यात विजय मिळवला.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाने तुषारला लिलावात संघात सामील केलं. दोन हंगाम दिल्लीसाठी खेळल्यानंतर 2022 मध्ये झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने 20 लाख रुपये खर्चून तुषारला संधी दिली.

28वर्षीय तुषारच्या नावावर 5 विकेट्स आहेत. आयपीएल स्पर्धेत तुषारला नोबॉलच्या समस्येने सतवलं आहे.

याच लढतीत गुजरात टायटन्सने दुखापतग्रस्त केन विल्यमसनऐवजी साई सुदर्शनला खेळवण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणादरम्यान केन गंभीररीत्या दुखापतग्रस्त झाला. केनने त्यानंतर क्षेत्ररक्षणाला आला नाही. तो फलंदाजीही करु शकणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर गुजरातने तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शनला पाठवलं. सुदर्शनने 17 चेंडूत 22 धावांची उपयुक्त खेळी केली. त्याने गिलसह दुसऱ्या विकेटसाठी 35 चेंडूत 53 धावांची भागीदारी करत गुजरातच्या विजयाचा पाया रचला.

आयपीएल 2023, इम्पॅक्ट प्लेयर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इम्पॅक्ट प्लेयर ठरवण्यात कर्णधारांची भूमिका निर्णायक असणार आहे.

स्पर्धा अधिकाअधिक रंजक आणि आकर्षक व्हावी यासाठी इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत यंदा इम्पॅक्ट प्लेयर हा नवीन प्रकार अमलात येणार आहे. मॅचदरम्यान अंतिम अकरापैकी एका खेळाडूला बदली करण्याचा अधिकार संघांना देण्यात आला आहे.

आयपीएल 2023, इम्पॅक्ट प्लेयर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चेन्नई सुपर किंग्स

2023 आयपीएलचा हंगाम एप्रिल मे महिन्यात भारतातच होणार आहे.

कोरोनामुळे 2021चा हंगाम युएईत झाला होता.2022चा हंगाम मुंबई आणि पुण्यातील मैदानांवर आयोजित करण्यात आला होता. कोरोना केसेस कमी झाल्याने तसंच धोका हळूहळू कमी होत असल्याने दहा संघांना आता त्यांच्या घरच्या मैदानावर खेळता येईल.

लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर आली आहे.

1. इम्पॅक्ट प्लेयर म्हणजे नेमकं काय?

प्रत्येक संघ अंतिम अकराच्या बरोबरीने चार बदली खेळाडू जाहीर करतील. या चारपैकी एकाला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून अंतिम अकरात समाविष्ट करता येईल. दोन्ही संघांना एकाच खेळाडूला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घेता येईल. इम्पॅक्ट प्लेयर वापरणं अनिवार्य नसेल.

डावातल्या 14व्या ओव्हरआधी इम्पॅक्ट प्लेयरला संघात घेता येईल. इम्पॅक्ट प्लेयर संघातल्या कोणत्याही खेळाडूऐवजी घेता येऊ शकतो. कर्णधार, मुख्य प्रशिक्षक किंवा व्यवस्थापक यासंदर्भात ऑन फिल्ड अंपायर, फोर्थ अंपायर यांना सूचित करतील.

बॅटिंग करणारा संघ एखादी विकेट पडल्यानंतर तसंच डाव संपल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयरला खेळायला उतरवू शकतात.

इम्पॅक्ट प्लेयरला संघात समाविष्ट केल्यानंतर तो खेळाडू उर्वरित ओव्हर्स बॅटिंग करू शकतो. तो 4 ओव्हर्सही टाकू शकतो.

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

एखादा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यास ओव्हरच्या शेवटी इम्पॅक्ट प्लेयरला संघात घेता येईल. त्याला बॅटिंग करता येऊ शकेल.

कोणत्याही परिस्थितीत 11 खेळाडूंनाच बॅटिंग करता येईल.

पावसाने बाधित तसंच 10 ओव्हर्सचा खेळ न झालेल्या मॅचमध्ये इम्पॅक्ट प्लेयर वापरता येणार नाही.

इम्पॅक्ट प्लेयर खेळायला उतरल्यानंतर ज्या खेळाडूला बदली करण्यात आलं आहे त्याला सामन्यात पुढे भाग घेता येणार नाही.

नियमभंगाच्या कारवाईसाठी एखाद्या खेळाडूवर कारवाई झाली तर त्याच्याऐवजी इम्पॅक्ट प्लेयरला सहभागी होता येणार नाही.

2. इम्पॅक्ट प्लेयर कधी आणता येईल?

आयपीएल 2023, इम्पॅक्ट प्लेयर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डेव्हिड वॉर्नर

कर्णधार चार बदली खेळाडूंपैकी एकाची इम्पॅक्ट प्लेयर म्हणून निवड करु शकतो. नवीन डावाच्या सुरुवातीला, कोणत्याही ओव्हरच्या शेवटी, विकेट पडल्यानंतर किंवा बॅटर काही कारणांनी रिटायर झाल्यास इम्पॅक्ट प्लेयरला संघात घेतलं जाऊ शकतं. जर बॉलिंग करणाऱ्या टीमने इम्पॅक्ट प्लेयर ओव्हर सुरु असतानाच घेतला तर त्या खेळाडूला उरलेली ओव्हर टाकता येणार नाही.

3. इम्पॅक्ट प्लेयर घेतल्यावर मूळ खेळाडूचं काय होणार?

आयपीएल 2023, इम्पॅक्ट प्लेयर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मयांक अगरवाल

इम्पॅक्ट प्लेयर घेतल्यानंतर मूळ खेळाडूला पुन्हा सामन्यात सहभागी होता येणार नाही. मूळ खेळाडूला बदली खेळाडू म्हणूनही मैदानात उतरता येणार नाही.

4. इम्पॅक्ट प्लेयर भारतीय खेळाडूच असणार?

आयपीएल 2023, इम्पॅक्ट प्लेयर

फोटो स्रोत, BCCI/IPL

फोटो कॅप्शन, कोलकाता नाईट रायडर्स

आयपीएलच्या नियमानुसार अंतिम अकरात चारच विदेशी खेळाडू खेळू शकतात. इम्पॅक्ट प्लेयर विदेशी असेल तर अंतिम अकरात पाच विदेशी खेळाडू होतील. हे टाळण्यासाठी इम्पॅक्ट प्लेयर भारतीय असावा असं आयपीएलने म्हटलं आहे. पण अंतिम अकरात एखाद्या संघाने चारपेक्षा कमी विदेशी खेळाडू समाविष्ट केले असतील तर त्यांना इम्पॅक्ट प्लेयर विदेशी घेता येऊ शकतो. त्या संघाने चार बदली खेळाडूंमध्ये त्या खेळाडूच्या नावाचा समावेश करणं आवश्यक आहे.

5. अकरा खेळाडूच बॅटिंग करणार का?

हो. बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंची संख्या११च राहील.

6. बॉलिंग करणाऱ्या टीमसाठी हा नियम कसा लागू होईल?

बॉलिंग टीमने इम्पॅक्ट प्लेयर घेतला तर त्या खेळाडूला चार ओव्हर्सचा कोटा पूर्ण करता येईल. मूळ खेळाडूने किती ओव्हर्स टाकल्या आहेत याचा विचार केला जाणार नाही. एखादा संघ पॉवरप्ले स्पेशालिस्ट बॉलरच्या ओव्हर्स पूर्ण झाल्यावर त्याला रिप्लेस करुन डेथ ओव्हर स्पेशालिस्ट खेळाडूला खेळवू शकतात.

7. मॅच उशिराने सुरू झाली तर इम्पॅक्ट प्लेयर खेळवता येणार का?

नाही. आय़पीएल प्रशासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार मॅचच्या ओव्हर्स कमी झाल्या तरी इम्पॅक्ट प्लेयर कधीही घेता येईल.

पहिला प्रयोग कधी झाला?

काही महिन्यांपूर्वी झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत इम्पॅक्ट प्लेयर वापरण्यात आला. मणिपूरविरुद्धच्या लढतीत दिल्लीचा ऋतिक शोकीन हा पहिला इम्पॅक्ट प्लेयर ठरला.

दिल्लीच्या हितेन दलालने बॅटिंग करताना 27 बॉलमध्ये 47 रन्सची खेळी केली. त्यानंतर दिल्लीने हितेनऐवजी ऋतिकला संघात समाविष्ट केलं.

आयपीएल 2023, इम्पॅक्ट प्लेयर

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, आयपीएल

ऋतिकने 3 ओव्हर्समध्ये 13 रन्सच्या मोबदल्यात 2 विकेट्स घेतल्या. दिल्लीने 167 रन्सची मजल मारली. प्रत्युत्तरादाखल खेळताना मणिपूरला 99 धावाच करता आल्या.

मुंबई संघानेही या स्पर्धेदरम्यान इम्पॅक्ट प्लेयरचा वापर केला होता. मुंबईने धवल कुलकर्णीऐवजी साईराज पाटीलला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून समाविष्ट केलं.

याआधी असा प्रयोग झाला आहे का?

आयपीएल 2023, इम्पॅक्ट प्लेयर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सुपर सब नियमाअंतर्गत विक्रम सोळंकी यांना संघात समाविष्ट करण्यात आलं होतं.

2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने सुपर सब नावाचा नियम आणला होता. त्यानुसार कर्णधाराला टॉसपूर्वीच एका खेळाडूची सुपर सब म्हणून निवड करावी लागायची.

मॅचदरम्यान संघांना सुपर सब खेळाडूला अंतिम अकरात खेळण्याची संधी मिळायची.

अनेक संघांनी याचा उपयोगही केला. पण टॉसपूर्वीच सुपर सबची निवड करावी लागत असल्याने संघांना या नियमाचा फारसा फायदा मिळाला नाही.

वर्षभरातच आयसीसीने हा नियम रद्द केला. ऑस्ट्रेलियातल्या बिग बॅश स्पर्धेत यास्वरुपाचा नियम लागू करण्यात आला होता.

एक्स फॅक्टर असं याला नाव देण्यात आलं होतं. टॉसवेळी दोन्ही कर्णधारांना बदली खेळाडूंची नावं द्यावी लागत. एक्स फॅक्टर खेळाडू दहाव्या ओव्हरनंतरही खेळायला उतरु शकतो.

फायदा काय?

मूळ संघात नसलेला खेळाडू समाविष्ट करता येणार असल्यामुळे कर्णधाराला हा नियम उपयुक्त ठरु शकतो.

बॅटिंग चांगली केलेल्या बॅट्समनचं खेळून झाल्यानंतर त्याच्या जागी बॉलरचा समावेश करता येणार असल्याने कर्णधाराला अतिरिक्त बॉलर मिळू शकतो.

याच धर्तीवर बॉलिंग करुन झालेल्या बॉलरऐवजी बॅट्समनला खेळवता येणार असल्याने संघाला एक अतिरिक्त बॅट्समन मिळतो.

अकरा खेळाडूंचा विचार करुन डावपेच तयार केले जातात. आता संघांना बाराव्या खेळाडूचाही विचार करावा लागेल. प्रतिस्पर्धी संघांची डोकेदुखी वाढू शकतो.

आयपीएलमध्ये प्रत्येक संघाकडे 22हून अधिक खेळाडू असतात. लाईक अ लाईक रिप्लेसमेंट अर्थात जशात तसं कौशल्य असणारे खेळाडू असतात.

इम्पॅक्ट प्लेयरचा नियम लागू झाल्यास अंतिम अकरात नसलेल्या खेळाडूंनाही खेळण्याची संधी मिळू शकते.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)