You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तानः या व्यक्तीच्या 'खोट्या साक्षी'मुळे झाली झुल्फिकार अली भुट्टो यांना फाशी
“मला माफी दिली तर या हत्येशी संबंधित गोष्टी मी समोर आणू शकेन.”
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या फाशीच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका निभावलेला माफीचा साक्षीदार मसूद महमूदशी या वक्तव्याचा संबंध आहे.
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टाने मसूदला झुल्फिकार अली भुट्टो यांच्या प्रेसिडेन्शिअल रेफरन्स केसच्या प्रकरणात ‘नैतिक अध:पतनाचा शिकार आणि खोटा साक्षीदार’ घोषित केलं.
एका निर्दोष व्यक्तीला निष्पक्षपाती सुनावणी न करता फाशी दिली गेली, असं सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात म्हटलं गेलं. झुल्फिकार भुट्टो यांना फाशी झाल्यानं जनरल जिया-उल-हक यांना सरळ फायदा झाला होता.
झुल्फिकार अली भुट्टो यांना सोडलं असतं, तर त्यांनी जिया-उल-हक यांच्याविरोधात देशद्रोहाचा खटला चालवण्याची शक्यता होती.
पण, या निर्णयानं फेडरल सिक्युरिटी फोर्सचे तत्कालीन डायरेक्टर जनरल मसूद महमूद यांच्या वक्तव्यावर आणि त्यांच्या मुख्य भूमिकेवर सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, एफएसएफ हे निमलष्करी दल झुल्फिकार अली भुट्टो यांनीच तयार केलं होतं.
भुट्टो यांच्या कथित आदेशावरून भुट्टो फाशी प्रकरणात राजकीय नेते अहमद राजा कसुरी यांची हत्या करण्याचा कट रचल्याचा आरोप एफएसएफवर होता. मात्र 11 नोव्हेंबर 1975 ला अहमद रजा कसुरी यांच्या कारवर झालेल्या कथित हल्ल्यात त्यांचे वडील मुहम्मद अहमद खान कसुरी यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात अन्य आरोपीही होते, त्यात एफएसएफचे महासंचालक मसूद अहमद यांचाही समावेश होता.
सैन्याने सत्तांतर केल्यावर मसूद अहमद यांना अटक करण्यात आली होती. सर्वांत आधी त्यांना आरोपी म्हणून उभं करण्यात आलं होतं.
7 सप्टेंबर 1977 ला लाहोरच्या जिल्हाधिकाऱ्यांना आरोपी मसूद अहमद यांच्याकडून एक पत्र मिळालं. त्यानंतर एका आठवड्यानंतर त्यांनी दाखल केलेले शपथपत्र ,1979 मध्ये भुट्टो यांना दिलेल्या फाशीत महत्त्वाचं ठरलं.
आपल्या साक्षीत मसूद अहमद यांनी दावा केला की, भुट्टो यांनी त्यांना अहमद रजा कसुरी यांची हत्या करण्याचा आदेश दिला होता. “मला त्याचा मृतदेह हवाय किंवा त्याच्या जखमी शरीरावर सगळीकडं पट्ट्या लागलेल्या हव्यात,” असं त्यांनी सांगितल्याचा दावा त्यात कला होता.
मसूद अहमद म्हणाले की, अहमद रजा कसुरी हे आपले वडील मुहम्मद अहमद खान यांचे चांगले मित्र होते. मात्र त्यांना आपल्या वडिलांच्या चांगल्या मित्राच्या मुलाची हत्या करण्याचा आदेश दिला गेला.
मसूद महमूद यांना अचानक हा विचार का आला? त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर त्यांनी असं केलं? कारण असा आदेश मिळाल्यामुळे त्यांच्या मनावर ओझं होतं.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयात सांगितलं की, “तुरुंगात राहिल्यामुळे त्यांचं लयाला गेलेलं अंतर्मन पुन्हा जागं झालं होतं. हा गुन्हा तीन वर्षांआधी केला होता. मात्र त्यावेळी ते काही बोलले नाही, मात्र अटक होताच त्यांचं अंतर्मन पुन्हा जागृत झालं. या अंतर्मनाला आधी स्वत:साठी माफी हवी होती. त्यांच्यासाठी एखाद्याचा खून करणं म्हणजे एखाद्याच्या आदेशाचं पालन केल्यासारखंच होतं."
हे पत्र लिहिल्यानंतर एक आठवड्याच्या आत मसूद महमूद यांच्या अर्जाला मान्यता देण्यात आली आणि त्यांची साक्षही नोंदवण्यात आली.
मसूद महमूद कोण होते, ते निमलष्करी दलाचे प्रमुख कसे झाले, आणि सुप्रीम कोर्टाने त्यांच्या साक्षीविषयी काय म्हटलं हे जाणून घेऊ या.
मसूद महमूद एफएसएफचे महासंचालक कसे झाले?
सुप्रीम कोर्टाच्या मते, मसूद महमूदच्या वतीने न्यायालयासमोर जी साक्ष दिली गेली त्याचा बहुतांश भाग फारसा गरजेचा नव्हता आणि पहिले चार पानं फक्त त्यांच्या पदांचा उल्लेख होता. 21व्या स्केलपर्यंत ते कसे पोहोचले याचीच माहिती जास्त होती.
या साक्षीत ते म्हणाले की, भारतीय पोलिसांमध्ये त्यांची नियुक्ती युद्धासाठी आरक्षित केली गेली होती कारण काही काळ त्यांना रॉयल इंडियन एअर फोर्समध्येही सामील करून घेण्यात आलं होतं. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर 18 सप्टेंबर 1948 ला सहायक पोलीस अधीक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली.
त्यानंतर पुढे ते म्हणतात की, 12 एप्रिल 1974 ला पंतप्रधान भुट्टो यांनी त्यांना बोलावलं आणि त्यांचा प्रमाणिकपणा, कष्ट आणि चांगल्या कामाची स्तुती केली.
यावर भाष्य करताना सुप्रीम कोर्ट म्हणालं, “प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा असे गुण आहेत, जे तुम्ही अशा व्यक्तीत शोधाल, जी तुमच्यासाठी काहीही करायला तयार आहे.”
मसूद महमूद यांनी सांगितलं की, भुट्टो यांनी एक तास त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर त्यांना एफएसएफच्या महासंचालक पदासाठी त्यांचं नाव सुचवलं आणि त्यादरम्यान सैन्य दलाला प्रशिक्षण देऊन संघटित करण्याचं काम केलं.
त्यानंतर भुट्टो यांच्यात असलेल्या दोषाबद्दलही सांगितलं. भुट्टो यांचे माजी सहकारी अहमद खान, जे पंतप्रधानांचे मुख्य सुरक्षा अधिकारी होते. त्यांचे सहायक अब्दुल माजिद बाजवा यांनी अहमद खान यांना सांगितलं की, जर भुट्टो यांनी सांगितलेलं काम केलं नाही तर तुमच्या पत्नी आणि मुलाचं तोंड तुम्ही कधीही पाहू शकणार नाही.
कसुरी यांना मारण्यासंदर्भात मसूद महमूद यांचे दावे
अशाच प्रकारे मसूद महमूद यांनी आणखी एका व्यक्तीचा उल्लेख केला होता जो एमआर वेल्च यांचा मुलगा होता. ते क्वेट्टा येथे एफएसएफचे संचालक होते आणि त्यांनी क्वेटामध्ये कसुरीला मारायला सांगितलं होतं.
मसूद महमूद यांच्या मते एफएसएफचे संचालक मियां महमूद अब्बास यांना याआधी हक नवाज टवाना ( माजी महासंचालक एफएसफ) यांच्याकडून भुट्टो यांनी अहमद राजा कसुरी यांना मारण्याचा आदेश दिला होता.”
“भुट्टो यांनी मला नंतर सांगितलं की, मियां अब्बासला सांग- एक तर अहमद रजा कसुरीचा मृतदेह आण किंवा जखमांनी छिन्नविछिन्न झालेलं आणि ठिकठिकाणी पट्ट्या बांधलेलं शरीर आण.”
न्यायलयाने त्यांच्या निर्णयात सांगितलं की मोहम्मद अब्बास यांनी सत्र न्यायालयातील आपली साक्ष परत घेतली होती आणि माजी महासंचालक एफएसएफ चे महासंचालक नवाज टवाना यांना साक्षीदार म्हणून सादर केलं गेलं नाही.
मसूद महमूद यांनी असंही सांगितलं की भूट्टो बऱ्याच काळापासून कसुरी यांना मारणार होते आणि यासंबंधी त्यांनी मियां अब्बास यांना आधीच आदेश दिले होते मात्र त्यांनी या आदेशाचं पालन केलं नाही.
मात्र जेव्हा मसूद महमूद यांना आदेश दिला की तेव्हा अहमद रजा कसुरी यांच्यावर गोळ्या घातल्या पण त्यांच्याऐवजी मोहम्मद अहमद खान यांना ती लागली.
सुप्रीम कोर्टाने लिहिलं की, “मसूद महमूद खान यांनी स्वत:ला अशा पद्धतीने सादर केलं जो खुदाशी प्रामाणिक होता आणि त्याला माहिती होतं की कोणाची हत्या करण्याचा आदेश जारी करणं हे खुदाच्या आदेशाविरुद्ध होतं.
मात्र भुट्टो यांना खास आदेश दिला होता आणि त्यांच्या साक्षीनुसार “मी खुदाच्या आदेशाची अवहेलना करणं आणि एक मौल्यवान माणूस जीव घेताना एक महत्त्वाचं पात्र झालं. (खुदा ने मला माफ करावं.)”
निर्णयानुसार “मसूद महमूद च्या वतीने खुदाच्या आदेशानुसार नाकारण्याचं कारण हे सांगितलं की, त्यांचं लग्न झालं होतं.”
ते म्हणाले की, “जर मी अविवाहित असतो तर मी त्या आदेशाचं पालन केलं नसतं आणि सोडून आलो असतो.”
सुप्रीम कोर्टाने मसूद महमूद यांच्या प्रतिष्ठेवर उपस्थित केले प्रश्न
सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयात, महमूदच्या प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
न्यायालयाच्या निर्णयानुसार “त्यावेळी न्यायालयाकडून मसूद महमूदच्या प्रतिष्ठेवर, कोणत्याही प्रकारची शंका व्यक्त केली नाही.”
“मात्र असे अनेक लोक होते की, जे बुद्धिमान माणसाला जागं करण्यासाठी पुरेसे होते आणि हे दाखवत होते की ते एक स्वार्थी, स्वत:ला वाचवणारे नैतिक अध:पतनाचे शिकार आणि खोटे साक्षीदार होते.”
न्यायालयाने हेही सांगितलं की मसूद महमूद वारंवार आपल्या अंतर्मनाविषयी बोलले आणि सांगितलं की, “आपल्या अंतर्मनानं मला बरंच दोषी ठरवलं आणि ही हत्या माझ्या अंतर्मनाविरुद्ध होती.”
मात्र तुरुंगात असताना त्यांचं अंतर्मन जागं झालं आणि त्यांच्या जागं झालेल्या अंतर्मनामुळे त्यांनी स्वत:साठी माफी मागितली आणि स्वत:ला या परिस्थितीतून बाहेर काढलं.
इथे सुरक्षेसाठी आणि सुविधेसाठी एकदा पुन्हा अंतर्मन जागं झालं. त्यामुळे प्रश्न असा पडतो की ते खरं बोलत होते की संधीसाधू होते.
न्यायालयाने म्हटलं, मसूद महमूदने यासंबंधात चर्चा पूर्ण करत असताना, त्यांनी आपल्या साक्षीला नाट्यमय ढंगाने प्रस्तुत केलं. मात्र इस्लामच्या पायाभूत तत्त्वांना ते विसरले. एका व्यक्तीची हत्या ही संपूर्ण माणुसकीची हत्या आहे
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार अशा प्रकाराच्या व्यक्तीला केंद्रीय न्यायालयाकडून नैतिकदृष्ट्या गलिच्छ घोषित केलं गेलं आहे, न्यायालयाच्या निर्णयानुसार फिर्यादी पक्षाने आपलं संपूर्ण प्रकरण मसूद महमूद आणि मियां महमूद अब्बास यांच्या साक्षीवर राजी केलं होतं. मात्र मियां मुहम्मद अब्बास यांनी त्यांची साक्ष परत घेतली आणि त्याच्या विपरीत साक्ष दिली. तेव्हापर्यंत हक नवाज टवाना आणि अब्दुल हमीद बाजवा यांचा मृत्यू झाला होता. एमआर वेल्च आणि सईद अहमद खान यांना माफीचा साक्षीदार न करता त्यांना फिर्यादी पक्षाकडून साक्षीदार म्हणून सादर केलं होतं.