चंद्रयान-3 : इस्रोने असं शोधलं चंद्रावरील पाणी

फोटो स्रोत, Getty Images
- Author, श्रीकांत बक्षी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
चांद्रयान प्रकल्प हा इस्रोच्या अवकाश संशोधतील सर्वात गुंतागुंतीचा प्रयोग म्हणता येईलं.
शेकडो कोटी रुपये खर्च करून इतके मोठे प्रकल्प सुरु करून इस्रो ने काय साधलं?
चांद्रयान -1 चांद्रयान -2 सह इस्रोची नेमकी कामगिरी काय?
चंद्रावर नासा
भारतात इस्रोचा उदय होण्यापूर्वीच 1969 मध्ये अमेरिकेतील अंतराळ संस्था नासानं आपले अंतराळवीर चंद्रावर पाठवले होते.
त्यानंतर 1972 पर्यंत 12 अंतराळवीर चंद्रावर पाठवून तिथली खडक आणि माती पृथ्वीवर आणण्यात आली.
पण चंद्राच्या खडकांचं परीक्षण केल्यानंतर नासानं निष्कर्ष काढला की त्यामध्ये पाण्याचे कोणतेही अंश नाहीत.
चंद्राचा पृष्ठभाग पूर्णपणे कोरडा असल्याचा निष्कर्ष नासानं काढला होता. त्यानंतर काही दशकं चंद्रावर पाण्याच्या खुणा शोधण्याचा प्रयत्न केला गेला नव्हता.
1990 च्या दशकात असं सूचित करण्यात आलं की चंद्राच्या विवरांमध्ये बर्फाच्या स्वरूपात पाणी असू शकतं.
यासह नासानं सुरु केलेल्या क्लेमेंटाईन मोहिमेतील लुनार प्रॉस्पेक्टर मिशनने चंद्राच्या पृष्ठभागाचं परीक्षण केलं आणि चंद्राच्या ज्या प्रदेशात सूर्यप्रकाश पोहचत नाही तिथं हायड्रोजनची उपस्थिती आढळली.
त्यातूनच चंद्राच्या ध्रुवांजवळ पाणी असू शकतं ही कल्पना पूढे आली. मात्र चंद्रावर पाण्याचा अंश उपलब्ध आहे,अश्या खुणा नासाला शोधता आल्या नव्हत्या.

फोटो स्रोत, NASA
भारताचा पहिला प्रयत्न
नासा साडेचार दशकांहून अधिक काळ चंद्रावर पाण्याचा अंश शोधण्याचा प्रयत्न करत होतं. पण चंद्रावर पाणी आहे. हे भारताच्या चांद्रयान-1 मोहिमेद्वारेचं शोधलं गेलं. त्यासाठी चांद्रयान-1ऑर्बिटरमध्ये मून मिनरॉलॉजी मॅपर नावाचं उपकरणं लावण्यात आलं होतं.

फोटो स्रोत, ISRO
नासानं केलेल्या डेटाच्या विशलेषणच्या आधारावर चांद्रयान-1 मोहिमेतून पाण्याचे अंश शोधण्यात आले. नासानं केलेल्या प्रयोगामध्ये चंद्रावर पाण्याचे अंश स्पष्टपणे आढळले नाहीत.
24 सप्टेंबर 2009 रोजी नासानं जरनल सायन्समध्ये जाहीर केलं की, चांद्रयान -1 च्या ऑर्बिटरमध्ये आलेल्या मून मिनरॉलॉजी मॅपरला पाण्याचे अंश सापडले आहेत. नासाच्या घोषणेनंतर दुसऱ्याच दिवशी इस्रोनं आणखी एक घोषणा केली.
मून इम्पॅक्ट प्रोबनं दिलेल्या माहितीसह त्यांनी घोषित केलं की त्यांना तीन महिन्यापूर्वी चंद्रावर पाण्याचे अंश सापडले आहेत. पण त्यानंतर नासा किंवा इस्रोनं या मुद्द्यावर स्पष्ट विधान केलं नव्हतं.
मून इम्पॅक्ट प्रोब म्हणजे काय?
चांद्रयान -1 या इस्रोच्या पहिल्या अंतराळ मोहिमेमध्ये चंद्रावर लॅन्ड करण्यासाठी मून इम्पॅक्ट प्रोब नावाच्या दुसऱ्या उपकरणासह ऑर्बिटर पाठवलं.

फोटो स्रोत, NASA
चांद्रयान -1 मधील ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत असताना मून इम्पॅक्ट प्रोब चंद्राच्या पृष्ठभागवर लॅन्ड झाला. मून इम्पॅक्ट प्रोबच्या चारही बाजूंना भारतीय तिरंगा ध्वजाचं चित्र लावण्यात आला होतं.
म्हणजे, 15 वर्षांपूर्वीचं भारतानं चंद्रावर आपला झेंडा रोवला होता. चांद्रयान -1 हे एक वर्षांसाठी नियोजित होतं. मात्र 10 महिने 6 दिवसांतचं चांद्रयान -1 च्या ऑर्बिटरचे सिग्नल देणं बंद केलं.18 नोव्हेंबर 2008ला चांद्रयान -1 नं आपलं मून इम्पॅक्ट प्रोब 100 किमी उंचीवर स्थापित केलं होतं.
चांद्रयान-2 ची कामगिरी काय आहे?
चांद्रयान-1 च्या यशानंतर इस्रोनं GSLV Mk 3 विकसित केलं. जे सुमारे चार टन भार अंतराळात वाहून नेण्यास सक्षम होतं. त्यानंतर 2019 मध्ये त्या रॉकेटच्या मदतीनं चांद्रयान -2 प्रक्षेपित करण्यात आलं.
या प्रयोगात लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान यांनाही पाठवण्यात आलं. सध्या हे ऑर्बिटर चंद्राच्या भोवती भ्रमण करतंय. या ऑर्बिटरनं चंद्राच्या पृष्ठभागाचा बहुतांश भाग स्कॅन केलाय.

फोटो स्रोत, NASA & ISRO
तो 3 वर्षं 10 महिन्यांनहून अधिक काळ चंद्राभोवती फिरत आहे. इतकेच नाही ऑर्बिटर कार्यक्षमतेनं काम करत असल्यानं चांद्रयान -3 मिशनमध्ये ऑर्बिटर पाठवलं गेलं नाहीय. चांद्रयान -2 मध्ये पाठवलेलं ऑर्बिटरचं यासाठी वापरलं जाईल.
त्यामुळं चांद्रयान -3 प्रक्षेपणाचा खर्च कमी झाला आहे. चांद्रयान -2 प्रक्षेपणाची किंमत 978 कोटी रुपये होती. चांद्रयान-3 प्रक्षेपणाची किमंत फक्त 615 कोटी आहे. चांद्रयान -2 नं चंद्राच्या पृष्ठभागापासून 2.1 किमी उंचीपर्यंत लँडरशी संवाद साधला होता. मात्र शेवटच्या क्षणी संपर्क तुटला होता आणि रोव्हरही लँडर मधून बाहेर आला नाही.
चांद्रयान-3 मध्ये काय आहे?
चांद्रयान-3 चे दोन मुख्य उद्देश आहेत. लँडर आणि रोव्हरच्या या एकीकृत मोड्युलला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाणं आणि नंतर चंद्राच्या पृष्ठभागावर लँडर आणि रोव्हरला सुरक्षित उतरवणं. लँडर मोड्यूल त्यापासून वेगळं होईल आणि चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेलं.

फोटो स्रोत, Getty Images
लँडर सुरक्षित चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यावर रोव्हर बाहेर येईलं. लँडर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करेल आणि माहिती पाठवेल. लँडर आणि रोव्हरद्वारे गोळा केलेला डेटा चंद्राच्या पृष्ठभागापासून 100 किमीवर स्थित असलेल्या ऑर्बिटरकडे पाठवली जाईलं.
ऑर्बिटरकडे मार्फत हा डेटा इस्रोच्या बेस स्टेशन पर्यंत पोहचेल. चांद्रयान-2 च्या ऑर्बिटरनं चंद्राच्या पृष्ठभागाजवळून 3,400 हून अधिक वेळा प्रदक्षिणा केली आहे. चंद्राच्या पृष्ठभागाच्या मिळालेल्या या डेटाचा इस्रो अभ्यास करतंय.
चांद्रयान-3 मोहीम काय आहे?
चांद्रयान -3 वरून प्रक्षेपित होणारं लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या पृष्ठभागाचं परीक्षण करून डेटा संकलित करून उद्दिष्ट्य साध्य करावं लागेलं.
चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेणं,चंद्राच्या पृष्ठभागावरील खनिजांचं निरीक्षण, खनिजांचा शोध, चंद्राच्या वातावरणाचं निरीक्षण, पाणी आणि बर्फाच्या स्वरूपातील पाण्याच्या उपलब्धतेचा शोध घेणं, चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्र घेऊन 3D नकाशे तयार करणं, चंद्राच्या पृष्ठभागाचे रासायनिक विश्लेषण आणि त्यातील घटकांच्या आधारे चंद्रच्या जन्माचं रहस्य शोधण्याचा प्रयत्न करणं, हा चांद्रयान-3 मोहिमेचा प्रमुख उद्देश आहे.
चांद्रयान-3 मध्ये चंद्रावर उतरणाऱ्या लँडरमधून बाहेर पडणारा रोव्हर प्रामुख्यानं दोन उपकरणांनी सज्ज आहे. त्या पैकी एक लेझर इंड्यूस्ड ब्रेकडाउन स्प्रॅक्टोमीटर आहे. याला लिब्स म्हणतात.
चंद्राच्या पृष्ठभागवर रोव्हर उतरल्यावर यातील उपकरणं कार्यरत होऊन चंद्राच्या पृष्ठभागाचं निरीक्षण करतील. उच्च तापमानामध्ये माती जळते आणि त्यातून वेगवेगळे गॅस बाहेर पडतात. या प्रक्रियेतून निघणाऱ्या घटकांच्या आधारे चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास केला जाईलं.
इस्रोचे चेअरमन एस. सोमनाथ सांगतात की, "चंद्रावरील परिस्थिती जाणून घेण्यासोबत भविष्यात चंद्रावर मानवी वस्तीसाठी अनुकूल परिस्थिती आहे का, याचा अभ्यास केला जाईलं. आणि त्यातूनच चंद्राच्या जन्माबाबतचा तपशील जाणून घेता येईलं.
चंद्राच्या जन्माबाबत अनेक भिन्न सिद्धांत आहेत,की चंद्र पृथ्वीपासून तयार झाला होता आणि एक मोठा लघुग्रह आदळला तेव्हा एक गोळा तयार झाला होता. चांद्रयान मोहिमेतून हे सर्व जाणून घेणं शक्य होणार आहे."
एकाच वेळी ऑर्बिटर आणि लँडर दोन्ही पाठवणं सोपं काम नाही. इस्रोनं एकाच वेळी एकाच रॉकेटनं दोन्ही प्रक्षेपणं केली आहेत. तसंच ऑर्बिटरसोबत चंद्रावर उतरणारा रोव्हर संपूर्ण भारतीय बनावटीचा आहे. रोव्हरसाठी स्वदेशी तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. चांद्रयान -2 मध्ये उदभवलेल्या दोषांच्या पार्श्वभूमीवर लँडिंग अधिक कार्यक्षम आणि सुरळीत करण्याची खबरदारी इस्रो घेतं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









