मुलाने हत्या केल्याची बातमी सोशल मीडियावर, 'मी जिवंत आहे' असं सांगत अभिनेत्री आली समोर...

अभिनेत्री वीणा कपूर यांची हत्या झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. मात्र आता या घटनेने एक वेगळंच वळण घेतलं आहे.

वीणा कपूर प्रत्यक्षात जिवंत असल्याचं आता समोर आलं आहे. पोलिसांसमोर जाऊन त्यांनी तसं सांगितलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना वीणा कपूर म्हणाल्या, “ज्या वीणा कपूरची हत्या मुलाने केली ती एक वेगळीच वीणा कपूर होती. मी माझ्या मुलाबरोबर राहते म्हणून ही बातमी पसरली.”

“मी तुम्हाला विनंती करते की खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. आता तुम्ही तक्रार केली नाही तर इतर लोकांबरोबरही असं होईल.”

वीणा कपूर त्यांच्या मुलाबरोबरच प्रसारमाध्यमांसमोर आल्या होत्या. त्यांना खूप मानसिक त्रास झाल्याचं त्यांनी सांगितलं.

यावेळी त्यांचा मुलगाही त्यांच्या बरोबर होता. या प्रकरणी आम्ही पोलिसात तक्रार केली असून पोलिसांचं आम्हाला उत्तम सहकार्य लाभल्याचं ते म्हणाले.

वीणा कपूर यांनी अनेक टीव्ही सीरियलमध्ये काम केलं आहे. वीणा कपूर यांच्या मुलानेच त्यांची हत्या केल्याच्या बातम्या सोमवारी (12 डिसेंबर) अनेक प्रसारमाध्यमात आणि वर्तमानपत्रात आल्या होत्या.

'मै जिंदा हूँ.'

या संपूर्ण प्रकाराचा वीणा कपूर यांना सोशल मीडियावरही तितकाच मनस्ताप सहन करावा लागला.

अनेक युझर्सने त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यावर 'मी जिवंत आहे' असं त्यांना सांगावं लागलं.

एखादी व्यक्ती जिवंत असताना त्याला श्रद्धांजली वाहण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत.

काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या मृत्यूची घोषणा झाली नाही तरी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती.

तेव्हाही त्यांच्या कुटुंबीयांना असाच मनस्ताप सहन करावा लागला होता.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)