बीबीसी मराठी : या आठवड्यातील महत्त्वाच्या बातम्या आणि लेख...

उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस

फोटो स्रोत, Getty Images

नमस्कार मंडळी, कसा गेला हा तुमचा आठवडा. या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या.

आम्ही त्या तुमच्यापर्यंत पोहोचवल्या देखील.पण असं होऊ शकतं की तुमच्याकडून काही महत्त्वाचे लेख वाचायचे राहून गेले असतील.

तर मंडळी काळजी नको.आम्ही तुमच्यासाठी या आठवड्यातले 5 खास लेख देत आहोत. ते तुम्ही एकाच ठिकाणी वाचू शकाल.

बीबीसी मराठीने नेहमीच आपले वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या आठवड्यात विविध क्षेत्रातील 5 खास बातम्या आम्ही देत आहोत.

राजकारण, मनोरंजन, प्रेरणादायी, ट्रेंडिंग आणि ज्ञानवर्धक असे 5 लेख जे तुम्ही नक्की वाचले पाहिजेत..

1. महाराष्ट्राच्या राजकारणाला आक्रमक वळण का लागलंय?

महाविकास आघाडीचा महामोर्चा आणि भाजपाचं माफी मांगो आंदोलन मुंबईत झालं खरं पण या दोन्ही आंदोलनांनी लोकोपयोगी असं नक्की काय साध्य केलं हा प्रश्न सर्वांनाच पडू शकतो.

दोन्ही राजकीय बाजू सध्या एकमेकांविरोधात आक्रमक झालेल्या असताना राज्याच्या राजकीय स्थितीत झालेले मोठे बदल विचार करायला लावणारे आहेत.

या दोन्ही आंदोलनांच्या निमित्ताने राज्याच्या बदललेल्या राजकीय संस्कृतीचा येथे विचार करू.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये घडत असलेल्या घडामोडी राजकीय विश्लेषकांनाही आश्चर्याने तोंडात बोटं घालावी लागतील अशा प्रकारची आहेत.

निवडणुकीच्या निकालानंतर सरकार स्थापन करण्यास लागलेला वेळ, त्याच काही तासांसाठी भाजप आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी स्थापन केलेलं सरकार, त्यानंतर महाविकास आघाडी स्थापन होऊन तिचं सरकार स्थापन होणं अशा वेगानं घडामोडी घडून या राजकारणाची सुरुवात झाली.

आताही या राजकीय नाट्याचे एकेक अंक सुरू असल्याचं दिसत आहे. या सर्व घटना पाहाता कोणत्याच घटनेचा एकमेकीशी संबंध आहे, राज्यात सुरू असलेलं राजकारण एका विशिष्ट तर्कावर आधारीत आहे असं दिसत नाही.

कोरोना

फोटो स्रोत, Getty Images

2. कोरोना व्हायरसचा BF.7 व्हेरियंट किती घातक आहे? त्याची लक्षणं काय आहेत?

चीनमध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार पुन्हा सुरू झाला आहे. तिथे BF.7 हे नवं व्हेरियंट आढळून आलं आहे.

कोणताही व्हायरस जेव्हा म्यूटेट करतो, त्यावेळी तो एक नवीन कॅटेगरी सुरू करत असतो. BF.7 हा दुसरं तिसरं काही नाही, तर आधी आलेला BA.5.2.1.7 च आहे.

हा ओमिक्रॉनचे सबव्हेरियंट BA.5 पासूनच म्यूटेट होऊन बनला आहे.

याच महिन्यात सेल होस्ट अँड मायक्रोब या विज्ञान नियतकालिकेत यासंदर्भात एक लेख छापण्यात आला होता. त्यामध्ये हा व्हेरियंट चार पट अधिक क्षमतेचं व्हायरस आहे, असं त्यामध्ये लिहिलं होतं.

याच व्हेरियंटमुळे चीनमध्ये संकट वाढत असल्याचं सांगितलं जातं. या व्हायरसची संसर्ग क्षमता जास्त आहे, तसंच पूर्वीपासून संक्रमित किंवा लसीकरण झालेल्या व्यक्तींनाही पुन्हा याची बाधा होऊ शकते, अशाही बातम्या समोर आल्या आहेत. वाचा, नव्या BF.7 व्हेरियंटची लक्षणे काय आहेत?

ऋषी राजपोपट

फोटो स्रोत, PA Media

फोटो कॅप्शन, ऋषी राजपोपट

3. संस्कृत भाषेतील 2500 वर्षं जुनं कोडं भारतीय तरुणानं असं सोडवलं

इसवीसनपूर्व पाचव्या शतकामध्ये लिहिलेल्या संस्कृत भाषेतील भाषाग्रंथातील व्याकरणाची समस्या केंब्रिज विद्यापीठात पीएचडी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने सोडवलीय.

अमेरिकेमधील केंब्रिज विद्यापीठात पीएचडीचं शिक्षण घेणाऱ्या 27 वर्षांच्या ऋषी राजपोपट यांनी सुमारे 2,500 वर्षांपूर्वी संस्कृत व्याकरणकार पाणिनी यांनी लिहिलेल्या ग्रंथातील व्याकरणासंदर्भातील चूक सुधारली आहे.

सध्या जगात फक्त 25 हजार लोकांना अस्खलित संस्कृत बोलता येतं असं विद्यापीठाने म्हटलंय.

डॉ. राजपोपट सांगतात की, नऊ महिने एकांतवासात घालवल्यानंतर केंब्रिजमध्ये अचानक लागलेला हा शोध होता.

"कामातून महिनाभरासाठी ब्रेक घेत मी पुस्तकांना रामराम केला. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी पोहणे, सायकल चालवणे, स्वयंपाक करणे, ध्यान करणे एवढ्या गोष्टी केल्या."

पुढं मी कामावर परतलो, माझी पुस्तकं उघडली आणि क्षणात मला गोष्टी सुटत असल्याचं जाणवलं."

कफ सिरप

फोटो स्रोत, Getty Images

4. कफ सिरप कोणत्या वयाच्या मुलांना देणं सुरक्षित आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अडीच वर्षांच्या मुलाला कफ सिरप दिल्यानंतर पुढची 20 मिनिटं त्या मुलाची नाडी बंद झाल्याचं धक्कादायक प्रकरण मुंबईत समोर आलं आहे.

मुंबईतल्या केईएम रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. मुकेश अग्रवाल यांनी सांगितलं की, "जे प्रकरण समोर आलं आहे त्यामध्ये लहान मुलाला किती प्रमाणात कफ सिरप देण्यात आले ते स्पष्टपणे समजलेलं नाही. हा चोकिंगचा प्रकार वाटतो आहे. लहान मुलांना झोपताना दूध पाजू नये असं म्हणलं जातं".

मुलाची आजी डॉ. तिलोत्तमा मंगेशीकर यांनी बीबीसीला सांगितलं की, "15 डिसेंबरला मुलाच्या आईने त्याला औषध दिलं. तेव्हा तो आईजवळच होता. तुझ्याकडे येतो असं नातवाने सांगितलं. तेव्हा अचानकच त्याची नाडी कमी होऊ लागली. तेवढ्यात त्याच्या आईने हाक मारली. मी दुसऱ्या खोलीत होते."

डॉ. तिलोत्तमा मंगेशकर भूलतज्ज्ञ आहेत. शस्त्रक्रियेवेळी रुग्णाला भूल दिली जाते. त्यांनी पुढे सांगितलं, "नातू अगदी गोरापान होता, पण त्याची त्वचा पिवळी होत असल्याचं माझ्या लक्षात आलं. नंतर निळा होऊ लागला. आम्ही नातवाला घेऊन तातडीने रुग्णालयात पोहोचलो. मी नातवाला सीपीआर द्यायला सुरुवात केली. सात आठ मिनिटात त्याचा रंग गुलाबी होऊ लागला. 17 मिनिटानंतर त्याला शुद्ध आली. त्याने डोळे उघडले आणि श्वास घेऊ लागला".

आम्ही काय झालं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या, नातवाबरोबर आधी कधी असं घडलं नव्हतं. कफ सिरप नेमकं कुठलं ते पाहिलं. त्यामध्ये क्लोरफेनेरमाइन आणि डेक्सट्रोमेथोर्फेन होतं. अमेरिकेत चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे कफ सिरप देण्यावर प्रतिबंध आहे.

अर्जेंटिना

फोटो स्रोत, Getty Images

5. वर्ल्ड कप करंडक पटकावणाऱ्या अर्जेंटिनाला मिळणार 347 कोटी

लिओनेल मेस्सीने दिमाखदार खेळ करत अर्जेंटिनाला वर्ल्डकप जिंकून दिला. 36 वर्षांचं स्वप्न कतारमध्ये पूर्ण झालं.

जेतेपदाचं स्वप्न प्रत्यक्षात साकारल्यानंतर मेस्सीसह अर्जेंटिनाच्या खेळाडूंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनेक वर्षांची मेहनत फळाला आली. सहाव्या वर्ल्ड कपवारीत मेस्सीचं देशासाठी जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं.

अतीव समाधानाच्या बरोबरीने जेतेपदाने अर्जेंटिनाला प्रचंड अशा बक्षीस रकमेने गौरवण्यातही आलं. विजेत्या अर्जेंटिना संघाला तब्बल 347 कोटी रुपये मिळणार आहेत.

जेतेपदाच्या झळाळत्या करंडकासह अर्जेंटिनाचे खेळाडू आर्थिकदृष्ट्याही बळकट होणार आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)