सुशांत सिंहच्या मृत्यूबद्दल बोलताना राहुल शेवाळे यांनी आदित्य उद्धव ठाकरेंचं नाव घेतलं, कारण...

फोटो स्रोत, Twitter
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी खासदार राहुल शेवाळे यांनी शिवसेनेचे आमदार आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केला आहे. लोकसभेत शेवाळे यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित करताना केंद्रीय गृहमंत्र्यांना विनंती केली.
शेवाळे म्हणाले, "एयू म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे असं बिहार पोलिसांनी सांगितलं. बिहार पोलिसांच्या चौकशीत आदित्य उद्धव ठाकरे असा उल्लेख होता. अशी माहिती मला मिळाली. यासंदर्भात लोकांसमोर माहिती आलेली नाही. खरी माहिती लोकांसमोर यावी यादृष्टीने गृहमंत्र्यांना विनंती केली".
ते पुढे म्हणाले, "देशभरातील सुशांतचे चाहते, सर्वसामान्य नागरिक यांना उत्तरं मिळायला हवीत. म्हणून हा प्रश्न मी लोकसभेत उपस्थित केला. सुशांतच्या केससंदर्भातली खरी माहिती लोकांसमोर यायला हवी. सुशांतच्या मृत्यूपूर्वी रिया चक्रवर्तीला काही कॉल आले होते. एयू कोण आहे हे सीबीआयने स्पष्ट केलं नाही. मुंबई आणि बिहार पोलिसांनी तपास केला आहे. सीबीआयने तपास केला आहे. वेगळी तफावत आढळून येते.
सुशांतच्या केससंदर्भातला सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट आलेला नाही. एयू बाबत मुंबई पोलिसांनी जी माहिती दिली ती वेगळी आहे, बिहार पोलिसांनी वेगळी माहिती दिली आहे. बिहार पोलीस खोटं बोलत असेल तर सीबीआयने खुलासा करायला हवा. एयू कोण आहे- अनन्या उद्धव आहे आदित्य उद्धव आहे कळायला हवं".
"केंद्रीय गृहमंत्री यासंदर्भातला निर्णय घेऊ शकतात. एयू संदर्भात वेगवेगळी माहिती येते आहे. ती केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून यावी एवढाच हेतू. मुंबई पोलिसांनी त्यावेळी माहिती लपवली असं निदर्शनास येत आहे. हार्ड डिस्क स्क्रॅप करण्याची घटना झाली आहे".
लव्ह यू मोर, त्यांच्याकडून चांगलं काही अपेक्षित नाही- आदित्य ठाकरे
"मी त्यांना एवढंच सांगेन- लव्ह यू मोर. त्या घाणीत मला जायचं नाहीये. आम्हाला माहितेय ज्यांची निष्ठा स्वत:च्या घरात नसते, गद्दारी त्यांनी अनेकदा केलेली आहे. त्यांच्याकडून काहीही चांगलं अपेक्षित नाही", असं शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले. सुशांत सिंग राजपूत मृत्यूप्रकरणी तपासात एयू अर्थात आदित्य उद्धव ठाकरे असा उल्लेख आल्याचा संदर्भ खासदार राहुल शेवाळे यांनी लोकसभेत दिला. त्यासंदर्भात ते बोलत होते.
"मी राहुल शेवाळे या व्यक्तीला काडीमात्र किंमत देत नाही. शेवाळे यांचं लग्न ठाकरे घराण्याने वाचवलं. मला यात जायचं नाही असंही आदित्य म्हणाले. काही लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात मला हस्तक्षेप करायचा नाहीये. कारण ते माझे संस्कार नाहीत. त्यामुळे मी त्या घाणीत जाणार नाही", असंही त्यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, "चाळीस गद्दार इकडचे आणि 12 खासदार यांना अडचणीत सगळेच आणत आहेत. मित्रपक्ष देखील अडचणीत आणत आहेत. एनआयटी घोटाळ्याचा मुद्दा आम्ही मांडला. तो मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणारा आहे. मुख्यमंत्र्यांवरचं लक्ष विचलित करायचं असेल, त्यांना वाचवायचं असेल, राज्यपालांना वाचवायचा प्रयत्न असेल कारण राज्यपालांप्रति राग आहे. विधिमंडळात भाषण न करता निघून गेले. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महात्मा ज्योतिबा फुलेंचा अपमान केला. अनेक अपमान सहन करत महाराष्ट्र पुढे आला आहे. राग वाढत चालला आहे. विधानसभेत कर्नाटकच्या मुद्यावर आम्ही बोलायचा प्रयत्न केला. एनआयटीवर बोलण्याचा प्रयत्न केला. आम्हाला बोलू देण्यात आलेलं नाही. आमचे माईक बंद ठेवले. राज्यातले खरे प्रश्न बाजूला ठेऊन अशी घाणेरडी बदनामी करायची हा त्यांचा प्रयत्न असतो. मला यात जायचं नाही. ज्या मुख्यमंत्र्यांनी आज राजीनामा द्यायला हवा, त्यांना वाचवण्यासाठी, राज्यपालांना वाचवण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत".
अमृता फडणवीसांवर मी भाष्य करु इच्छित नाही असं आदित्य यांनी सांगितलं.
"राज्यपाल महापुरुषांचा अपमान करत आहेत पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना तसं वाटत नाही. सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे, त्यांच्या मनात चीड आहे. राज्यपालांना पदमुक्त करायला हवं होतं. खोके सरकार राज्यपालांना वाचवायला निघालं आहे. हे सरकार महाराष्ट्रद्वेषी आहे. अनेक महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमकपणे बोलत आहेत. त्यासंदर्भात काहीच केलं नाही. आमचे मंत्री जाणार होते ते कर्नाटकच्या इशाऱ्यानंतर घाबरुन गेलेच नाहीत. राज्यपालांना माफी का मागायला लावत नाही? महाराष्ट्राबद्दलच्या भावना फक्त आम्हालाच आहेत का"? असा सवाल आदित्य यांनी केला.
'रिया चक्रवर्ती ड्रग्ज घेत होती का?' अंमली पदार्थ नियंत्रण विभागाकडून होणार चौकशी
ईडी आणि सीबीआयनंतर आता रिया चक्रवर्तीविरोधात नारकोटिक्स कंट्रोल डिपार्टमेंट (अंमली पदार्थ नियंत्रण विभाग) कडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
रिया चक्रवर्ती ड्रग्ज घेत होती का तसेच ती सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज देत होती का याची चौकशी करण्यात येणार आहे.
रिया चक्रवर्तीच्या फोनमध्ये काही संदिग्ध चॅट सापडले त्यावरून ती ड्रग्ज घेत असावी असा संशय बळावला आहे. रियाच्या वकिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. रियाने तिच्या आयुष्यात कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही असं त्यांनी सांगितलं आहे.
रिया चक्रवर्तीची मीडियाविरोधात सुप्रिम कोर्टात तक्रार
रिया चक्रवर्तीने सुप्रिम कोर्टात नवी याचिका दाखल केली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसाठी आपण दोषी आहोत अशा पद्धतीने मीडिया आपल्यावर आरोप करत असल्याची तक्रार तिने केली आहे.
माध्यमांमध्ये हे प्रकरण मर्यादेच्या पलिकडे गेले आहे. माध्यमातील वाहिन्यांनी या खटल्यातील साक्षीदारांची तपासणी, उलटतपासणी घ्यायला सुरुवात केली आहे असं तिनं या याचिकेत म्हटलं आहे.
सुशांत सिंह मृत्यूप्रकरणात वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रिया चक्रवर्तीची ईडीकडून चौकशी होत आहे. सुशांत सिंहच्या मृत्यूमागे पैशांच्या गैरव्यवहाराची शक्यता तर नाही ना याची तपासणी करण्याचं काम ईडी करत आहे.
त्यासाठी रियाला ईडीच्या ऑफिसमध्ये आपला जबाब नोंदवण्यासाठी 7 ऑगस्टला बोलवण्यात आलं होतं. आता तिला पुन्हा ईडीच्या कार्यालयात बोलवण्यात आलं आहे.
त्याचबरोबर सुशांत सिंहचे वडील सीबीआयकडे आज (10 ऑगस्ट) जबाब नोंदवणार आहेत.
अभिनेता सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआनं एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सीबीआयनं रिया चक्रवर्ती तिचे वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे.
शिवाय सीबीआयच्या एफआयआरमध्ये संध्या चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, सॅम्युएल मिरांडा, श्रुती मोदी आणि इतर अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या सर्वांवर कलम 420 अंतर्गत फसवणूक, कलम 506 आणि 120 बी अंतर्गत गुन्हेगारी षडयंत्र रचणे आणि इतर आरोप ठेवण्यात आले आहेत.
आतापर्यंत काय घडलंय?
मुंबई आणि बिहार पोलीस याप्रकरणाचा तपास करत होते. बिहार सरकारने सुशांतच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे सोपवावा अशी विनंती केली होती. केंद्र सरकारने ही विनंती मान्य करत तपास सीबीआयकडे सोपवला आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला हे सांगितलं.
सुशांतच्या मृत्यूचा तपास पाटण्याहून मुंबईला हलवण्यात यावा अशी याचिका रिया चक्रवर्तीने केली आहे.
दरम्यान सुशांत सिंह राजपूतच्या मॅनेजर म्हणून काम पाहिलेल्या दिशा सालियन यांनी सुशांत यांच्या काही दिवस आधी आत्महत्या केली होती. या घटनेचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. मात्र, या संदर्भात सोशल मीडिया आणि माध्यमांद्वारे वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. म्हणून याबद्दल कोणाकडे लेखी पुरावा, इतर पुरावे किंवा कोणत्याही स्वरुपाची माहीती उपलब्ध असली तर ती मुंबई पोलिसांकडे येऊन द्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
सुशांत सिंहप्रकरणी आतापर्यंत 56 लोकांचे जवाब नोंदवण्यात आले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार, मानसिक आरोग्य अशा सगळ्या मुद्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
सुशांतचे वडील, बहीण आणि मेव्हण्याचा जवाब नोंदवून घेण्यात आला आहे. रिया चक्रवर्तीचा जवाब दोनदा नोंदवण्यात आला.
बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये काढून घेण्यात आले. त्याच्या खात्यात 18 कोटी रुपये होते. त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची सीबीआयकडून चौकशी व्हावी. अशी मागणी सुशांत सिंहच्या वडिलांनी केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्याशी बोलून त्यांनी आपली इच्छा प्रदर्शित केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
"सुशांतच्या जीवाला धोका आहे, हे मी 25 फेब्रुवारीलाच बांद्रा पोलिसांना सांगितलं होतं. मात्र त्यांनी काहीच केलं नाही," असा आरोप सुशांत सिंह राजपूतचे वडील केके सिंह यांनी केला आहे. सुशांतच्या वडिलांनी यासंबंधी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे.
"सुशांतच्या मृत्यूनंतर 40 दिवस झाले तरी पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. म्हणून मी पटनामध्ये FIR दाखल केला," असं केके सिंह यांनी म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
बांद्रा पोलिसांनी मात्र सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांचा आरोप फेटाळला आहे. अशी कोणतीही तक्रार आपल्याला मिळाली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, BANDRA POLICE
सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाचा तपास योग्य दिशेने चालला असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी सांगितले. सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबीयांचे जबाब घेण्यात आल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले.
सुशांत सिंह यांच्या कुटुंबीयांना ही कल्पना होती की सुशांत मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार घेत होता. जेव्हा मुंबई पोलिसांनी कुटुंबीयांचे जबाब नोंदवले तेव्हा त्यांनी कुणावर संशय घेतला नव्हता.
बिहार पोलिसांबाबत आयुक्त म्हणाले की बिहार पोलिसांनी पाटण्यामध्ये जी FIR दाखल केली त्याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. बिहार पोलीस महाराष्ट्रात आले ते कोणत्या कायद्याच्या कक्षेत आले याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत असं परमबीर सिंह यांनी म्हटलं.
मुंबई पोलीस सर्व बाजूंनी तपास करत असल्याचे परमबीर सिंह यांनी सांगितले. पैशांचा गैरव्यवहार, कुणी सुशांतवर दबाव टाकला का किंवा इतर काही कारण आहे की नाही याची तपासणी केली जात असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.
सोशल मीडियावर सुशांत सिंह आणि दिशा सलियन यांच्याबाबत चर्चा झाल्याने सुशांत डिस्टर्ब होता अशीही माहिती परमबीर यांनी दिली.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान मुंबई पोलिस आणि पटना पोलिसांमध्ये या प्रकरणावरुन संघर्ष सुरू असताना पटना पोलिस या प्रकरणाची चौकशी करू शकतात, का हा प्रश्नही उपस्थित होतोय.
मुळात बिहार पोलिस मुंबईमध्ये घडलेल्या घटनेची चौकशी करू शकतात का, हा प्रश्न आहे.
कायदेतज्ज्ञांच्या मते सीआरपीसीमध्ये यासंदर्भात स्पष्ट तरतुदी आहेत. सीआरपीसीच्या कलम 174 मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की, जेव्हा एखाद्या पोलिस स्टेशनमध्ये तैनात पोलिस अधिकाऱ्याला एखाद्या व्यक्तिच्या मृत्यू किंवा आत्महत्येबद्दल माहिती मिळते, तेव्हा त्यानं तात्काळ जवळच्या एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेटला यासंबंधीची माहिती देणं आवश्यक असतं. जेणेकरून मृत्यूच्या कारणांचा तपास केला जाऊ शकेल.
सध्या मुंबई पोलिस याच कलमान्वये सुशांत सिंहच्या आत्महत्येचा तपास करत आहेत. त्यांना तसा अधिकार आहे.
पुढचा प्रश्न उपस्थित होतो की, बिहार पोलिसांकडे FIR नोंदविण्यात आला आहे, त्याच्या आधारे बिहार पोलिस सुशांतच्या मृत्यूची चौकशी करू शकतात का
कायद्यात यासंबंधीही स्पष्ट तरतूद आहे. हे प्रकरण बांद्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीतलं असलयाने त्याच अधिकार क्षेत्रातील पोलिसांनाच मृत्यूच्या कारणांची चौकशी करता येते.
मग बिहार पोलिस मुंबई पोलिसांच्या अधिकार क्षेत्रात चौकशी करू शकतात का?
कायदेतज्ज्ञांचं काय मत आहे?
कायदेतज्ज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील आलोक कुमार यांच्या मते हे शक्य नाहीये.
ते सांगतात, "कायद्यानं तपास अधिकाऱ्यांना विशेष अधिकार दिले आहेत. जर तपास अधिकाऱ्याला वाटलं, की प्रकरणाचा एखादा धागादोरा कन्याकुमारीमध्ये आहे, तर तो तिथेही जाऊ शकतो. मात्र ज्या गुन्ह्याच्या तपासासाठी तो जात आहे, तो गुन्हा त्याच्या अधिकार क्षेत्रात घडलेला असावा."
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात पटना पोलिसांची कोणतीही भूमिका नसल्याचं मत आलोक कुमार यांनी व्यक्त केलं. त्यांनी म्हटलं, "बिहार पोलिस या प्रकरणाचा तपास करू शकत नाहीत. कारण तक्रारदारानं आपल्या आरोपांमध्ये ज्या घटनांचा उल्लेख केला आहे, त्या पटनामध्ये घडलेल्या नाहीत. समजा सुशांत सिंहचं एखादं बँक अकाउंट पटनामध्ये असतं, त्यातून पैसे काढल्याची किंवा एखादा घोटाळा झाल्याची घटना घडली असती, तर या प्रकरणाचा तपास पटना पोलिस करू शकतात. पण माझ्या माहितीप्रमाणे असं काही घडलं नाहीये आणि ज्या तक्रारी आहेत, त्या सर्व गोष्टी मुंबईमध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे पटना पोलिस मुंबईला जाऊन पुरावे गोळा करून पटना न्यायालयात आरोपपत्र दाखल करू शकत नाहीत. सीआरपीसीतही अशीच तरतूद आहे."
या घटनेचं कारण पटनाशी संबंधित असल्यामुळे FIR पटनामध्ये नोंदविण्यात आल्याचं स्पष्टीकरण सुशांत सिंह राजपूतच्या वडीलांचे वकील विकास सिंह यांनी दिलं आहे.
मात्र आलोक कुमार यांना हा तर्क कायद्याच्या कसोटीवर पुरेसा टिकेल असं वाटत नाही.
सुशांतप्रकरणी अमृता फडणवीसांचं ट्वीट
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लागलेलं असतानाच आत त्यावर अनेक जण सोशल मीडियावर चर्चा करताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याप्रकरणी ट्वीट केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 4
सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचं प्रकरण मानवतेच्या दृष्टीकोनातून अजिबात हातळलं जात नसल्याचं त्यांनी म्हटलंय. मुंबई आता सामान्यांच्या दृष्टीने असुरक्षित झाल्याचंही त्यांनी ठामपणे म्हटलंय.
अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटला शिवसेनेच्या युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी प्रतिकार करत, आपणही याच मुंबई पोलिसांची सुरक्षा घेता आणि त्यांच्यावरच असे आरोप करता? असा सवाल उपस्थित केलाय.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 5
जर, मुंबई पोलिसांवरच विश्वास नसेल तर त्यांनी पुरवलेली सुरक्षा का सोडत नाही? असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणावरून शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
बिहार पोलीस क्वारंटाईन
बॉलीवुड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसोबतच आता बिहार पोलीसही करत आहेत.
याच प्रकरणाच्या चौकशीसाठी विनय तिवारी या आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वाखाली बिहार पोलिसांचं एक पथक पाटण्याहून मुंबईत आले होते. मात्र, मुंबईत येताच मुंबई महापालिकेने त्यांना क्वारंटाईन केलं आहे. विनय तिवारी यांना बळजबरीने क्वारंटाईन करण्यात आल्याचं बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्वीट करत सांगितलं.

- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोनावरची लस बनवण्याचं काम कुठवर आलं? येत्या सप्टेंबरपर्यंत लस येणार?
- वाचा- कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग

24 जून रोजी सुशांत सिंह राजपूतने मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केली होती. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत होती.
मात्र, या तपासावर सुशांतचे नातेवाईक समाधानी नव्हते. काही दिवसांपूर्वी सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी काही दिवसांपूर्वीच पाटण्यातल्या राजीवनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आणखी एक तक्रार नोंदवली. तक्रारीत त्यांनी अभिनेत्री आणि सुशांत सिंहची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती हिच्यावर आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता.
या तक्रारीच्या आधारावर बिहार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यांना रियाच्या बँक खात्याची माहिती मिळाली. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रियाने गेल्या 90 दिवसात सुशांतच्या अकाउंटवरून तब्बल 3 कोटी रुपये काढल्याची माहिती बिहार पोलिसांना मिळाली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 6
याचसंदर्भात अधिक तपास करण्यासाठी आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत आले होते. मात्र, त्यांना बळजबरीने क्वारंटाईन करण्यात आल्याचं बिहार पोलिसांचं म्हणणं आहे.
बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी यांसदर्भात केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "बिहार पोलिसांच्या पथकाचं नेतृत्व करण्यासाठी आयपीएस अधिकारी बिनय तिवारी आज (रविवारी) मुंबईत दाखल झाले. मात्र, रात्री 11 वाजता बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना बळजबरीने क्वारंटाईन केले. विनंती करूनही त्यांना IPS मेसमध्ये रहाण्याची जागा मिळाली नाही आणि ते गोरेगावमधल्या एका गेस्ट हाऊसमध्ये राहत आहेत."
मुंबई महापालिका किंवा पोलीस यांच्याकडून बिनय तिवारी यांच्या सक्तीच्या क्वारंटाईनवर अजून प्रतिक्रिया आलेली नाही.
सुशांतसिंह यांच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात केलेल्या तक्रारीत जवळपास 16 आरोप केले आहेत.
यात सर्वांत पहिला आरोप हा आहे की सुशांत सिंह राजपूतला रिया चक्रवर्तीशी भेटल्यानंतरच त्याला मानसिक त्रास असल्याचं कळलं. त्याआधी तो पूर्णपणे बरा होता. इतकंच नाही तर रियाने सुशांतला मानसिक आजारावरच्या औषधांचे ओव्हरडोस दिल्याचं आणि 2019 मध्ये सुशांतला डेंगू झाल्याची अफवा पसरवल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Twitter
रिया आणि तिच्या कुटुंबियांनी सुशांतला एकप्रकारे बंदी बनवलं होतं आणि ते सगळे मिळून त्याला वेडं ठरवण्याचा प्रयत्न करत होते. इतकंच नाही तर एकदा माझं सुशांतशी बोलणं झालं तेव्हा हे लोक मला मेंटल हॉस्पिटलला पाठवतील, अशी भीती वाटत असल्याचं सुशांत म्हणाला होता, असंही सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधातल्या तक्रारीत म्हटलं आहे.
व्यावसायिक लाभ मिळवण्यासाठी रियाने सुशांत आणि त्याच्या स्टारडमचा वापर केल्याचाही आरोप आहे. सुशांतला कधीही नव्या सिनेमासाठी कॉल आला की त्या सिनेमातली मुख्य स्त्री भूमिका आपल्यालाच मिळावी, यासाठी रिया तगादा लावायची, असंही सुशांतच्या वडिलांनी म्हटलं आहे. रियाने सुशांतचं डेबिट आणि क्रेडिट कार्ड वापरून वारेमाप खर्च केल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
सुशांतचे मेडिकल रिपोर्ट मीडियाला देऊन त्याची प्रतिमा मलिन करेन, असं सांगून रिया सुशांतला ब्लॅकमेल करायची. त्याला केरळमध्ये ऑर्गॅनिक शेती करायची होती. मात्र, रियाने त्याला अडवलं. ती त्याला माझ्यापासून म्हणजे स्वतःच्या वडिलांपासून दूर ठेवायची. कुटुंबीयांचा संपर्क होऊ नये, म्हणून तिने सुशांतचं सिम कार्डही बदललं, असेही आरोप एफआयआरमध्ये करण्यात आले आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








