सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी रिया चक्रवर्तीला व्हिलन का ठरवलं जातंय?

सुशांत आणि रिया

फोटो स्रोत, INSTAGRAM

फोटो कॅप्शन, सुशांत आणि रिया
    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्तीची कहाणी न्यूज चॅनेलवर रोज एखाद्या टीव्ही मालिकेसारखी दाखवली जातेय.

कधी या कहाणीत कपट-कारस्थान आणि काळी जादू करून वश करणारी स्त्री असते. तर कधी एका सामर्थ्यवान, मस्त कलंदर जगणाऱ्या पुरुषाला एका बाईने कसं कह्यात घेऊन कमजोर बनवलं याची कहाणी असते.

या कहाणीत नेहमी नवी वळणं येतात. प्रमुख भूमिका बजावणारी पात्र येतात. आणि त्याहून कहर म्हणजे यावर चर्चा अशी केली जाते की जसं हेच काय ते सत्य आहे.

पण ही कहाणीच मुळात स्त्री-पुरुष नात्याची असते. तिथे पुरुष हिरो असतो आणि स्त्री व्हिलन. तपास पूर्ण झालेला नसताना आतापर्यंत तरी कहाणीचा ढाचा हा असाच आखलेला दिसतो.

सुशांत सिंह राजपूत गेल्या 14 जूनला आपल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळून आल्यानंतर त्याचं कारण बॉलिवूडमधील नेपोटिझम म्हणजेच घराणेशाही असल्याचं बोललं गेलं.

फिल्म इंटस्ट्री आणि टेलिव्हिजनच्या स्टुडिओजमध्ये चर्चेला तोंड फुटलं आणि सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीकडे संशयाने पाहिलं जाऊ लागलं.

रियावर पैशाच्या लालसेचे आरोप करण्यासोबतच तिला बलात्कार आणि हत्येच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या. या गळ्याला वैतागून मग रियाने मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवली.

Instagram पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

Instagram पोस्ट समाप्त

हेकेखोर स्त्रिया

सुशांत सिंह राजपूत याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात आपल्या मुलाला आत्महत्या करायला प्रवृत्त केलं, त्याच्याकडून पैसे उकळले आणि कुटुंबापासून त्याला लांब ठेवलं अशी तक्रार बिहार पोलिंसाकडे दाखल केली. तेव्हा फोफावलेल्या अफवांवर एका अर्थाने शिक्कामोर्तबच झालं.

खरंतर पोलीस चौकशीअंती आणि कोर्टात सुनावणीनंतर आरोप सिद्ध केले जातात. पण त्याआधीच ते आरोप म्हणून मानणं योग्य आहे का? पण प्रत्यक्षात तसं झालं नाही.

बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते महेश्वर हजारी यांनी रिया चक्रवर्तीला विषकन्या म्हटलं. ते म्हणाले- "तिला एका रचलेल्या षडयंत्रासाठी सुशांतकडे पाठवलं गेलं, त्याला तिने स्वतःच्या जाळ्यात ओढलं आणि नंतर त्याचे काय हाल झाले हे आपल्याला माहिती आहे."

अशा वादग्रस्त विधानांनंतर रियाच नाही तर बंगाली महिलांना सोशल मीडियावर लक्ष्य केलं गेलं. इंग्रजी बोलणाऱ्या, विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी तयार असणाऱ्या, आपल्या मनातलं मोकळेपणाने बोलणाऱ्या बंगाली महिला उत्तर भारतातील पुरुषांना बिघडवतात, अशी टिप्पणी सुरू झाली.

ट्वीटरवर असंही लिहिलं गेलं की, "बंगाली मुली वश करतात, मुलांना कसं फसवायचं हे त्यांना नीट ठाऊक असतं." "आधी त्या काळ्या जादूचा वापर करून मोठा मासा गळाला लावतात आणि त्याच्याकडून स्वतःची कामं करून घेतात."

सुशांत- रिया

फोटो स्रोत, RHEA CHAKRABORTY INSTA

सोशल मीडियावर हा प्रचार इतका विकोपाला गेला की कोलकाता पोलिसांकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या. पण बंगाली आणि इतर महिलांनी या प्रचाराचा सोशल मीडियावर चांगलाच समाचार घेतला.

रुचिका शर्मा यांनी ट्वीटरवर लिहिलं, "बाईला चेटकीन म्हणणं हा भारतात वेळ घालवण्याचा लोकप्रिय प्रकार आहे. आणि ही मानसिकता स्त्रीवादी आंदोलनालाही बदलता आलेली नाही. कारण त्या बदलाची सुरुवात खरंतर घरात पुरुषासोबतचं नातं सुरू करण्यासोबतच व्हायला पाहिजे."

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

अभिनेत्री स्वास्तिका मुखर्जी यांनी लिहिलं, "हो, मला रुई आणि भेटकी पसंत आहे. त्यांना मोहरीच्या तेलात फ्राय करून गरम भात आणि लाल किंवा हिरव्या मिर्चीसह खायला मला आवडतं. बंगाली महिलांनो माझ्याबरोबर यायचं आहे का कुणाला? "

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

हतबल पुरुष

जादूटोणा आणि तंत्र-मंत्राचा वापर करून सुशांत सिंह राजपूतला वश करण्याचा दावा केला गेला. एक अतिशय समजूतदार पुरुष हतबल होऊन जाळ्यात अडकला, असं म्हटलं गेलं.

ही सगळी विशेषणं याच सुशांत राजपूतला दिली गेली ज्याने गेल्या वर्षी जलालुद्दीन रुमी यांनी लिहिलेल्या "जैसे एक परछाई, जो मैं हूं भी और नहीं भी" या ओळी ट्वीट केल्या होत्या.

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

पुरुषांच्या हतबलेचा संबंध सुशांत सिंह राजपूतच्या नैराश्यासंबंधी आजाराशीही जोडला गेला. तो डिप्रेशन वा नैराश्याचा बळी ठरला का यावर दुमत आहे. पण त्याचे फोटो पाहून तसा दावा केला गेला.

सिने समीक्षक ऐना वेट्टीकाड, "नैराश्याचा 'लुक' म्हणजे काय," असा सवाल विचारतात.

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात टीव्ही कव्हरेजमधून पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीच्या विरोधात मानसिक आजारांशी संबंधित लोक का बोलत नाहीत?

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

मानसिक आजार म्हणजे अपयश आणि वैयक्तिक हार आहे असं मानलं जातं आणि पुरुषांनी कमजोर वा दुर्बल असणं हे समाजाला पचवणं अवघड असतं.

खासकरून असा पुरुष की जो लहान आणि मोठ्या चंदेरी पडद्यावर हिरोच्या भूमिकेत होता. सुशांत तर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीच्याही बाहेरून आलेला होता आणि त्याने स्वतःचं ओळख निर्माण केली, असा पुरुष दुर्बळ कसा असू शकतो?

लोकांना असंही वाटतं की- डिप्रेशनसारख्या आजाराला आमचा हिरो बळी पडला होता आणि त्याचा गैरफायदा कोणीतरी घेतला. तर ती त्याची चूक नव्हती तर त्याचा विश्वासघात करणाऱ्या व्यक्तिची होती. मग चर्चांमध्ये संशयाची सुई रिया चक्रवर्तीकडे सरकली.

महिलांचे कपडे

रिया चक्रवर्तीने एक व्हीडिओ जारी करत तिच्याविरोधात केला जाणाऱ्या प्रचाराला उत्तर दिलं. त्या व्हीडिओत रिया सफेद सलवार-कमीजमध्ये आहे. पण ती काय म्हणतेय हे ऐकण्याऐवजी तिने घातलेल्या कपड्यांवरच बोललं गेलं.

सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबातील वकिलांनी म्हटलं- "रियाचा व्हीडियो खरंतर कपड्यांविषयीचा आहे. त्यांनी आधी कधी असे कपडे घातले असतील असं मला वाटत नाही. स्वतःची साधी भोळी प्रतिमा लोकांसमोर सादर करणं हा त्यांचा एकच हेतू होता."

यावर ज्येष्ठ वकील करुणा नंदी यांनी 'लीगल मिसॉजनी' म्हणजेच कायद्याच्या चौकटीत स्त्रियांना हीन लेखणं असं म्हटलंय. नंदी यांनी ट्वीटरवर "कमी कपडे म्हणजे अपराध आणि सलवार-कमीज म्हणजे अपराध लपवण्यासाठीचा प्रयत्न," असा मार्मिक टोला लगावला.

X पोस्टवरून पुढे जा, 5
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 5

मानसिक आजाराविषयी मीडियात पसरवल्या जाणाऱ्या चुकीच्या माहितीविरोधात सुशांत सिंह राजपूत यांच्या थेरपिस्टने अखेर आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या की नैराश्याला वैयक्तिक अपयश मानणं हे चूक आहे.

त्यांनी असाही दावा केला की सुशांतला 'बायपोलर डिसऑर्डर' आहे. आणि हा आजार न लपवता त्यासाठी मदत घेण्यासाठी रियानेच सुशांतला मानसिक आधार दिला, असंही त्या म्हणाल्या.

X पोस्टवरून पुढे जा, 6
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 6

अजून ही टिव्ही मालिका संपलेली नाही. माध्यमांच्या न्यायालायात रोज नव्या माहितीची भर पडत असते. सुशांतच्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील आणि ओळखीतील लोकांचं म्हणणं सतत बातमीच्या केंद्रस्थानी असतं.

सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की त्याची हत्या झाली? जर यामागे कोणतं षडयंत्र असेल तर ते कोणी रचलं, त्यांचा उद्देश काय होता? अशा प्रश्नांचा भडिमार सुरू असतो. या प्रश्नांचं उत्तर शोधण्यात राजकारण होतंय, अनेकांचे स्वार्थी हेतूही पार पडतायत आणि या सगळ्यांत सत्य पुढे आणणंही कठीण होत चाललं आहे.

न्यायव्यवस्था आणि तपास यंत्रणांच्या निष्कर्षाची वाट न पाहाता स्टिंग ऑपरेशन सुरू आहेत, तसंच माध्यमांचं स्वतंत्रपणे आपलं तपासतंत्र आणि एखाद्याला गुन्हेगार ठरवणं घातक ठरू शकतं.

व्हिलन शोधायच्या या प्रयत्नात असं वातावरण तयार होणं त्याहूनही घातक असू शकतं.

दिग्दर्शक हंसल मेहतांनी म्हणूनच एक ट्वीट करून सवाल केला की- जर मीडियाच्या सुनावणीमुळे असं होतंय तर त्याला जबाबदार कोण आहे?

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)