ओपेनहायमरमधील भगवद्गीतेचं 'ते' दृश्य ठरतंय वादग्रस्त, हिंदू धर्मावर हल्ला असल्याचा आरोप

ओपेनहायमर चित्रपटात किलियन मर्फी

फोटो स्रोत, UNIVERSAL

फोटो कॅप्शन, ओपेनहायमर चित्रपटात किलियन मर्फी

ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित चित्रपट ओपेनहायमर 22 जुलै रोजी भारतात सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. देशभरातील चित्रपटप्रेमी या चित्रपटाचं कौतुक करत आहेत. पण त्याचवेळी चित्रपटातील एका दृश्यावरून वाददेखील निर्माण झाला आहे.

चित्रपटातील एका दृश्यात मुख्य कलाकार हे सेक्स सीनदरम्यान संस्कृतमध्ये लिहिलेलं वाक्य वाचत असतात. याच दृश्याने भारतीय सोशल मीडियातील वादविवादामध्ये स्थान मिळवलं आहे.

PTI वृत्तसंस्थेने चित्रपट पाहणाऱ्यांच्या हवाल्याने हा दावा केला की, हे वाक्य हिंदूंचा पवित्र धर्मग्रंथ मानल्या जाणाऱ्या भगवद्गीतेतील आहे. हे दृश्य चित्रपटातून हटवण्यात यावं, अशी मागणी आता पुढे येत आहे.

180 मिनिटांच्या या चित्रपटात जगातील पहिला अणुबॉम्ब बनवणारे शास्त्रज्ञ डॉ. जे. रॉबर्ट ओपेनहायमर यांची कहाणी दर्शवण्यात आली आहे.

इन्सेप्शन, इंटरस्टेलार आणि द डार्क नाईट यांच्यासारखे चित्रपट दिग्दर्शित करणारे जगप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांचा हा चित्रपट असल्यामुळे त्याची वेगळी क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाला लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दोन दिवसांमध्ये या चित्रपटाने 30 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

वादग्रस्त दृश्य आणि विरोध

चित्रपटातील एका दृश्यात ओपेनहायमर यांची भूमिका करणारे किलियन मर्फी हे मानसिक आजारांची तज्ज्ञ जिन टॅटलर (फ्लोरेन्स पुग) यांच्यासोबत दिसतात.

या दरम्यान, जिन ही एक पुस्तक हातात घेते आणि विचारते की, हे कोणत्या भाषेत लिहिलेलं आहे.

त्यावेळी ती ओपेनहायमर यांना ते पुस्तक वाचण्यास सांगते. जिनच्या सांगण्यावरून ओपेनहायमर त्यावर लिहिलेला मजकूर वाचून दाखवतात – “मी आता काळ बनलो आहे, जो जगाचा विनाशकर्ता आहे.”

ओपेनहायमर

फोटो स्रोत, Getty Images

पण जिनच्या हातातील पुस्तकाचं नाव स्पष्टपणे वाचता येत नाही. त्यावर लिहिलेला मजकूर संस्कृतसारखाच वाटत असला तरी ते पुस्तक नेमकं कोणतं आहे, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही.

मात्र, सोशल मीडियावर काही लोकांच्या मते हे वाक्य भगवदगीता ग्रंथातील आहे.

भारत सरकारचे माहिती आयुक्त उदय माहुरकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शक ख्रिस्तोफर नोलन यांच्या नावे एक खुलं पत्र लिहून या दृश्याला आपला विरोध दर्शवला आहे.

माहुरकर हे ‘सेव्ह कल्चर, सेव्ह इंडिया फाऊंडेशन’ नामक संस्थेचे संस्थापकही आहेत.

त्यांनी या चित्रपटातील वादग्रस्त दृश्य म्हणजे हिंदुत्वावर हल्ला असल्याचं संबोधलं. नोलन यांनी तत्काळ दे दृश्य चित्रपटातून हटवावं, अशी मागणीही त्यांनी केली.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 1

ते म्हणाले, “लाखो हिंदूं आणि पवित्र भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात बदल आणलेल्या लोकांच्या वतीने मी विनंती करत आहे. या पवित्र पुस्तकाचा योग्य तो मान राखावा.

जगभरात हे दृश्य हटवण्यात यावं. ही विनंती दुर्लक्षित केल्यास हा भारतीय संस्कृतीचा अपमान मानला जाईल. तुम्ही यावर लवकरात लवकर कारवाई कराल, अशी अपेक्षा आहे.”

अणुबॉम्बचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओपेनहायमर यांच्याबाबत सांगितलं जातं की, त्यांनी संस्कृत भाषा अवगत केली होती. भगवद्गीतेचा त्यांच्यावर प्रभावही होता.

16 जुलै 1945 रोजी पहिल्यांदा अणुविस्फोट चाचणी केल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत ओपेनहायमर यांनी म्हटलं होतं की, या प्रसंगी आपल्याला हिंदू पौराणिक ग्रंथ भगवद्गीतेतील काही वाक्यं लक्षात आली.

किलियन मर्फी

फोटो स्रोत, ANDY RAIN/EPA-EFE/REX/SHUTTERSTOCK

ते म्हणाले, “भगवान कृष्ण अर्जुनाला समजावत असतात की त्याने आपलं कर्तव्य पूर्ण केलं पाहिजे. आपल्या विराट स्वरुपाचं दर्शन अर्जुनाला घडवून ते म्हणतात, मी आता काळ आहे, जो लोकांचा (जगाचा) विनाश करतो.”

भगवद्गीता ग्रंथात 11 व्या अध्यायातील हे 32वं श्लोक आहे. यामध्ये भगवान कृष्ण म्हणतात, “काल: अस्मि लोकक्षयकृत्प्रविद्धो लोकान्समाहर्तुमिह प्रवृत्त:।।"

चित्रपटावर बंदीची मागणी

PTI च्या माहितीनुसार, चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (CBFC) ने U/A रेटिंग दिली आहे. चित्रपटाचा कालावधी कमी करण्यासाठी यातील काही दृश्ये हटवण्यात आली. त्यानंतर हा चित्रपट आता 13 वर्षांवरील व्यक्ती पाहू शकतात, असं प्रमाणपत्र त्याला मिळालेलं आहे.

अमेरिकेत या चित्रपटाला R-रिस्ट्रिक्टेड (निर्बंध) असा दर्जा देण्यात आला. याचा अर्थ तिथे हा चित्रपट 17 वर्षांच्या खालील व्यक्तींना पाहायचा असल्यास त्यांच्यासोबत पालक उपस्थित असावेत.

ओपेनहायमर

विशेष म्हणजे, ख्रिस्तोफर नोलन यांचा हा पहिलाच 'आर' रेटेड चित्रपट आहे.

माहुरकर यांनी या चित्रपटाच्या प्रमाणपत्रावरून प्रश्न उपस्थित केले. ते म्हणतात, “मला हे कळत नाही की CBFC ने या चित्रपटाच्या प्रदर्शनाला परवानगी कशी दिली.”

CBFC चे प्रमुख प्रसून जोशी आणि सेन्सॉर बोर्डातील इतर सदस्यांनी यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

दरम्यान, सोशल मीडियावरही या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

एका युजरने सोशल मीडियावर लिहिलं, “ओपेनहायमर चित्रपटात एक वादग्रस्त दृश्य आहे, त्यामध्ये भगवद्गीतेचं चित्रण करण्यात आहे, असं मला समजलं. हे एक आक्षेपार्ह दृश्य आहे, पण ते नेमकं काय आहे, मी बोलणार नाही. हिंदुत्वाचं चित्रण सकारात्मक आणि योग्य पद्धतीने व्हावं, अशी अपेक्षा तुम्ही हॉलिवूड किंवा पाश्चिमात्यांकडून करूच शकत नाही.”

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त, 2

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

दुसऱ्या एका युजरने म्हटलं, “ओपेनहायमरमध्ये भगवद्गीतेचा उल्लेख करण्यात आला, यावरून हिंदूधर्मीय खुश आहेत. पण हॉलिवूडने स्पष्टपणे गीतेचा अपमान केला आहे, यावरून ते नाराजही आहेत. सेक्सदरम्यान गीतेतील पवित्र वाक्य बोलणं अपमानजनक आहे तसंच हे एक वांशिक भेदभावाचंही प्रतिक आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी.”

तर, काही लोकांच्या मते, ख्रिस्तोफर नोलन हे कोणत्याही ठिकाणी भगवदगीतेचं दृश्य घालू शकले असते. पण त्यांनी गीतेसाठी हेच दृश्य का निवडलं, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

ओपेनहायमर यांच्यावर गीतेचा प्रभाव होता, पण ते अशा प्रकारे या दृश्यात दाखवणं अनावश्यक होतं, असं लोक म्हणत आहेत.

युनिव्हर्सल पिक्चर्सच्या या चित्रपटात मुख्य भूमिकेत सिलियन मर्फी आहेत. तर फ्लोरेन्स पुग, रॉबर्ट डाऊनी ज्युनियर, मॅट डॅमन, एमिली ब्लंट, जोश हार्टनेस, केसी एफ्लेक, रॅमी मलिक आणि कॅनेथ ब्राना यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

या चित्रपटातील किलियन मर्फी यांच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक करण्यात येत आहे. तसंच चित्रपट एक मास्टरपीस असल्याचंही बोललं जात आहे.

चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सिलियन मर्फी यांनी भगवद्गीतेचा उल्लेख केला होता. ते म्हणाले की चित्रपटासाठी तयारी करत असताना त्यांनी भगवद्गीता हा ग्रंथ वाचला होता. हा ग्रंथ अत्यंत सुंदरपणे लिहिला गेलेला आहे. तसंच तो अतिशय प्रेरणादायी आहे, असंही मर्फी यांनी म्हटलं होतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)