दुनिथ वेल्लालागे : वीस वर्षांचा स्टार ज्याच्यासमोर टीम इंडिया झालेली हतबल

दुनिथ वेल्लालागे

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मिर्झा एबी बेग
    • Role, बीबीसी उर्दू प्रतिनिधी

सोमवारी (11 सप्टेंबर) भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट संघ आणि क्रिकेट चाहत्यांच्या नजरा मंगळवारी (12 सप्टेंबर) होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यावर खिळल्या होत्या.

भारतानं श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकून पाकिस्तानविरुद्ध तशीच सुरुवात केली.

एके काळी भारताची धावसंख्या 11 ओव्हरमध्ये नॉट आऊट 80 धावा होती. जो पर्यंत चेंडू श्रीलंकेच्या युवा क्रिकेटपटूकडे सोपवण्यात आला नव्हता.

यापूर्वी तुमच्यापैकी अनेकांनी दुनिथ वेल्लालागे हे नाव ऐकले नसेल, परंतु आता हे नाव सर्वत्र गाजत आहे, कारण मंगळवारी (12 सप्टेंबर) रात्री भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषकातील महत्त्वाचा सामना भारत आणि वेल्लालागे यांच्यात झाला म्हटंल तर चुकीचं ठरणार नाही.

20 वर्षीय दुनिथ वेल्लालागेनं पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज जे करू शकले नाहीत ते करून दाखवलं. पाकिस्तानविरुद्ध अर्धशतक झळकावणाऱ्या शुभमन गिलला त्यानं अशाप्रकारे बोल्ड केलं की दुसऱ्या टोकाला उभा असलेला कर्णधार रोहित शर्माही चकित झाला.

तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल

पाकिस्तान विरुद्ध शतक झळकावणाऱ्या विराट कोहलीनं या ओव्हरमध्ये उरलेले चेंडू कसे तरी खेळले पण दुनिथ वेल्लालागेनं विराटला त्याच्या दुसऱ्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर चुकीचा शॉट खेळण्यास भाग पाडले आणि मिडऑनला कोहलीनं सोपा झेल दिला आणि कुणालाही कोहलीकडून अशा शॉटची अपेक्षा नव्हती.

दरम्यान, रोहित शर्मानं आपलं अर्धशतक पूर्ण केल्यानं भारताची धावसंख्या दोन विकेट्सच्या बदल्यात 90 धावा होती.

आशिया कप

फोटो स्रोत, Getty Images

पण दुनिथ वेल्लालागेच्या जादून तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर त्यानं रोहितलाही बोल्ड केलं.

त्याची विकेट कशी गेली, हे रोहित शर्माच्या समजण्याच्या पलीकडे होतं. भारतीय संघ अचानक दडपणाखाली आला.

त्यानंतर पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणाऱ्या के.एल राहुलनं कसं तरी संघाला सावरलं, पण तोही 39 धावा करून त्याच्या चेंडूवर झेलबाद झाला. म्हणजेच पहिल्या चार पैकी चार फलंदाज दुनिथ वेल्लालागेचे बळी ठरले.

भारताचे पाच प्रमुख फलंदाज बाद झाले

यानंतर असलंकानं इशान किशनला 33 धावांवर बाद केलं , पण दुनिथ वेल्लालागेनं त्याला झेलबाद केलं.

यानंतर दुनिथ वेल्लालागे यानं हार्दिक पांड्याला विकेटकीपर मेंडिसकडून पाच धावांवर झेलबाद करून पाचवी विकेट काढली.

त्यावेळी भारताची धावसंख्या 172 धावा असताना सहावी विकेट पडली होती.

दुनिथ वेलालगेच्या दहा ओव्हर पूर्ण झाल्यावर टीम इंडियानं सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानं एका सामन्यात भारताच्या पाच आघाडीच्या फलंदाजांना बाद केलं आणि 40 रन दिले, यासह तो वनडेमध्ये पाच बळी घेणारा श्रीलंकेचा सर्वात तरुण खेळाडू ठरला.

माजी पाकिस्तानी क्रिकेटर शोएब अख्तरच्या म्हणण्यानुसार, संपूर्ण भारतीय संघ 213 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर पाकिस्तानी चाहते म्हणू लागले की पाकिस्तान संघ अंतिम फेरीत पोहचू नये, यासाठी भारत मुद्दाम हा सामना गमावत आहे.

दुनिथ वेल्लालागे

फोटो स्रोत, Getty Images

कथा इथेच संपत नाही...

भारतानं आपली कमी धावसंख्या लक्षात घेऊन खेळायला सुरुवात केली आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर जसप्रीत बुमराहने पाथोन निसंकाला सहा धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

त्यानंतर त्याने विकेटकीपर-फलंदाज कुसल मेंडिसची विकेट घेत श्रीलंकेला बॅकफूटवर आणलं.

पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजनं दिमुख करुणारत्नेला दोन धावांवर बाद करत तीन गडी गमावून धावसंख्या 25 धावांवर आणली.

श्रीलंकेनं 99 धावांवर सहा विकेट गमावल्या होत्या आणि पराभवाची चिन्ह स्पष्टपणे दिसत असताना, युवा दुनिथ वेल्लालागे फलंदाजीला आला आणि त्यानं हळूहळू भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली.

दुनिथ वेल्लालागे

फोटो स्रोत, Getty Images

त्यानं धनंजय डी सिल्वासोबत 63 धावांची भागीदारी केली.

डी सिल्वा आक्रमक होण्याचा प्रयत्न करत असताना अचानक खराब शॉट खेळला आणि त्यानंतर श्रीलंकेचा संघ सावरू शकला नाही.

दुसऱ्या टोकाला श्रीलंकेसाठी दुनिथ वेल्लालागेनं सर्वाधिक 42 धावा केल्या आणि विकेट पडताना पाहत राहिल्यानं त्यांचा संघ 41 धावांनी पराभूत झाला.

पण जेव्हा तो आणि डी सिल्वा फलंदाजी करत होते, तेव्हा विजय श्रीलंकेच्या झोळीत पडतोय, असं वाटत होतं आणि सामन्याचा समालोचक म्हणत होता की 'हा सामना भारत विरुद्ध श्रीलंका नसून भारत विरुद्ध वेल्लालागे आहे.'

आणि कदाचित त्यामुळेच पराभूत संघात असूनही त्याची 'मॅन ऑफ द मॅच' म्हणून निवड झाली

दुनिथ वेल्लालागे कोण आहे?

दुनिथ निथमिका वेल्लालागेचा जन्म 9 जानेवारी 2003 रोजी कोलंबो, श्रीलंकेत झाला.

तो डावखुरा फिरकी गोलंदाज आणि फलंदाज आहे.

तो सेंट जोसेफ कॉलेज कोलंबो येथे शिकला आणि त्यानं पाकिस्तानविरुद्ध पहिला आणि एकमेव कसोटी सामना खेळला ज्यामध्ये त्याला एकही विकेट मिळाली नाही. पण त्यानं 11 आणि 18 धावा केल्या.

गेल्या वर्षी त्यानं आपला पहिला एकदिवसीय सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाल्लीकेले मध्ये खेळला होता ज्यात त्यानं दोन विकेट घेतल्या होत्या आणि आत्तापर्यंत त्यानं 13 एकदिवसीय सामन्यांमध्ये 18 विकेट घेतल्या आहेत, त्यापैकी त्यानं या आशिया कपमध्ये नऊ विकेट घेतल्या आहेत.

सोशल मीडियावर या तरुण क्रिकेटरची चर्चा

दुनिथ वेल्लालागे हा भारत आणि श्रीलंका तसंच पाकिस्तानमधील सोशल मीडियावरील टॉप ट्रेंडपैकी एक आहे. एकीकडे श्रीलंकेत या नव्या खेळाडूची चर्चा सुरू असताना दुसरीकडे भारतातही दुनिथ वेल्लालागेची चर्चा आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू वसीम जाफर यांनी लिहिलं, "काय खेळ होता. खूप चढ-उतार. शेवटच्या विकेटसाठी अक्षर पटेलची 26 आणि 27 धावांची भागीदारी किती महत्त्वाची होती. कुलदीपच्या चार विकेट आणि जड्डूच्या (जडेजा) महत्त्वाच्या विकेट्स. दुनिथ वेल्लालागेसाठी पंजा आणि 42 धावा. दुर्दैवानं तो पराभूत संघात होता पण तो भविष्यातील खेळाडूंपैकी एक आहे."

अशा स्थितीत भारताच्या अव्वल फलंदाजांना नाचवणाऱ्या या जादूगारासमोर पाकिस्तानी फलंदाज कसं काय खेळणार, अशी भीती पाकिस्तानी चाहत्यांना लागली आहे. ज्यांनी भारतीय फिरकी गोलंदाज कुलदीप यादव समोर गुडघे टेकले .

वेल्लालागे

फोटो स्रोत, Getty Images

पाकिस्तानी ट्विटर युजर अख्तर जमालनं लिहिलं की, "भारत कसा खेळला याचा विचार करणं थांबवा. 14 सप्टेंबरला पाकिस्तान या श्रीलंकेचा फिरकीपटू वेल्लालागे समोर कसा खेळवणार याची चिंता आहे. पाकिस्ताननं उस्मान मीर आणि नवाज किंवा इमाद वसीमला संघात आणलं पाहिजे. आणि शादाबला विश्रांती दिली पाहिजे."

शाहिद हाश्मी नावाच्या युजरनं लिहिलं, "वेल्लालागेनं पाकिस्तानी फलंदाजांना कुलदीप यादवसोबत कसं खेळायचं ते दाखवलं. किती टॅलेंट आहे."

लक्षात ठेवा कुलदीप यादवनं पाकिस्तानविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या आणि त्याची खेळी कुणी समजू शकलं नाही, पण वेल्लालागेनं मंगळवारी रात्री कुलदीपला ज्या पद्धतीनं खेळवलं, त्यानंतर रोहित शर्मानं त्याला गोलंदाजीतून दूर केलं.

भारतीय युजर सुदीपने लिहिलं की, "पाकिस्तानला या मुलापासून सावध राहावं लागेल. आम्ही त्याची विनाशकारी कामगिरी पाहिली आणि कसं तरी वाचलो. आता पाकिस्तानची वेळ आहे."

विश्लेषक काय म्हणतात?

भारत आधीच आशिया कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे, त्यानंतर आता श्रीलंकेविरुद्धचा सामना पाकिस्तानसाठी सेमीफायनल ठरला आहे.

माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू सलीम मलिक यांच्यावर पुस्तक लिहिणारे लेखक मोईनुद्दीन हमीद यांनी कॅनडाच्या टोरंटोला लागून असलेल्या स्कारबोरो या शहरातून फोनवर बोलताना श्रीलंकेविरुद्ध पाकिस्तान संघ यशस्वी होईल, अशी आशा व्यक्त केली.

ते म्हणाले की शाहीनपेक्षा नसीम शाहकडून त्याच्या अपेक्षा जास्त आहेत पण तो खेळतो की नाही हे पाहणे बाकी आहे. ते पुढे सांगतात, बाबर आझम अनेकदा फिरकीपटूंविरुद्ध विकेट गमावतो.

मोईनुद्दीन हमीद म्हणाले की, " फखर झमान फॉर्ममध्ये नाही, त्यामुळं त्याच्या जागी हारिसला घ्यावं , जो अधिक आक्रमक आहे. जिंकण्यासाठी तुम्हाला जोखीम पत्करावी लागेल."

ते पुढे सांगतात, श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात चुरशीची स्पर्धा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कारण दोघांकडे चांगले गोलंदाज आणि फलंदाज आहेत आणि रविवारी (17 सप्टेंबर ) होणारा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होईल.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify,आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)