कोल्हापूर उत्तरमधून मधुरिमाराजेंची 'नाईलाजा'ने माघार, शाहू छत्रपती म्हणाले, 'माघार म्हणजे पुढच्या लढाईची तयारी'

फोटो स्रोत, Facebook
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी माघार घेतली आहे.
कोल्हापूरचे काँग्रेसचे खासदार शाहूमहाराज छत्रपती यांनी माध्यमांना याबाबत सांगितलं की, नाईलाजाने मधुरिमाराजेंना माघार घ्यावी लागतेय.
ते पुढे म्हणाले की, "राजेश लाटकर काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी माघार घेतली नाही, म्हणून मधुरिमाराजेंनी माघार घेतली. कारण अशा परिस्थितीत निवडणूक लढवायची नाही, असं आम्ही ठरवलं."
माघार घेतली तरी पुढच्या लढाईची तयारी करतोच आपण, असंही शाहूमहाराज छत्रपती म्हणाले.
काँग्रेसनं इथून आधी राजेश लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, नंतरच्या यादीत लाटकरांची उमेदवारी रद्द करून, खासदार शाहूमहाराज छत्रपती यांच्या सून मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. मात्र, लाटकरांनी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपला अर्ज मागे घेतला नाही.
आता राजेश लाटकरांना काँग्रेस पाठिंबा देतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
काँग्रेसचे विधानसभेसाठीचे उमेदवार
- अमळनेर - डॉ. अनिल नाथू शिंदे
- उमरेड (एससी) - संजय नारायणराव मेश्राम
- आरमोरी (एसटी) - रामदास मसराम
- चंद्रपूर (एससी) - प्रवीण नानाजी पाडवेकर
- बल्लारपूर - संतोषसिंह चंदनसिंह रावत
- वरोरा - प्रवीण सुरेश काकडे
- नांदेड उत्तर - अब्दुल सत्तार अब्दुल गफूर
- औरंगाबाद पूर्व - लहू शेवाळे (मधुकर कृष्णराव देशमुख यांच्या जागेवर)
- नालासोपारा - संदीप पांडे
- अंधेरी पश्चिम - अशोक जाधव (सचिन सावंत यांच्या जागेवर)
- शिवाजीनगर - दत्तात्रय बहिरट
- पुणे छावणी (एससी) - रमेश आनंदराव भागवे
- सोलापूर दक्षिण - दिलीप ब्रह्मदेव माने
- पंढरपूर - भागीरथ भालके
- अकोला पश्चिम - साजिद खान मन्नन खान
- कुलाबा - हीरा देवासी
- सोलापूर शहर - चेतन नरोटे
- कोल्हापूर उत्तर - मधुरिमाराजे मालोजीराजे छत्रपती यांनी माघार घेतली
- खामगाव - दलिपकुमार राणा
- मेळघाट - डॉ.हेमंत चिमोटे
- गडचिरोली - मनोहर पोरेती
- दिग्रस - माणिकराव ठाकरे
- नांदेड दक्षिण - मोहनराव अंबाडे
- देगलूर - निवृत्तीराव कांबळे
- मुखेड - हेमंतराव पाटील भेटमोगरेकर
- मालेगाव मध्य - एजाज बेग अजिज बेग
- चांदवड - शिरिषकुमार कोतवाल
- इगतपुरी - लकिभाऊ जाधव
- भिवंडी पश्चिम - दयानंद चोरघे
- अंधेरी पश्चिम - सचिन सावंत
- वांद्रे पश्चिम - असिफ झकारिया
- तुळजापूर - कुलदीप कदम पाटील
- कोल्हापूर उत्तर - राजेश लाटकर
- सांगली - पृथ्वीराज पाटील
- भुसावळ - डॉ. राजेश तुकाराम मानवतकर
- जळगाव (जामोद) - श्रीमती स्वाती संदिप वाकेकर
- अकोट - महेश गांगणे
- वर्धा - शेखर प्रमोदबाबू शेंडे
- सावनेर - अनुजा सुनील केदार
- नागपूर दक्षिण - गिरीष कृष्णराव पांडव
- कामठी - सुरेश यादवराव भोयार
- भंडारा - पूजा गणेश तावकर
- अर्जुनी मोरगाव - दिलीप वामन बनसोड
- आमगाव - राजकुमार लोटूजी पुरम
- राळेगाव - वसंत पुरके
- यवतमाळ - अनिल मंगुळकर
- अर्णी - जितेंद्र मोघे
- उमेरखेड - साहेबराव कांबळे
- जालना - कैलास गोरंट्याल
- औरंगाबाद पूर्व - मधुकर देशमुख
- वसई - विजय पाटील
- कांदिवली पूर्व - काळू बधेलिया
- चारकोप - यशवंत सिंह
- सायन कोळीवाडा - गणेश यादव
- श्रीरामपूर - हेमंग उगले
- निलंगा - अभयकुमार साळुंखे
- शिरोळ - गणपतराव पाटील
- अक्कलकुवा (एसटी) - अॅड. के. सी. पाडवी
- शहादा (एसटी) - राजेंद्रकुमार कृष्णराव गावित
- नंदूरबार (एसटी) - किरण दामोदर तडवी
- नवापूर (एसटी) - श्रीकृष्णकुमार सुरुपसिंह नाईक
- साकरी (एसटी) - प्रवीण बापू चौरे
- धुळे ग्रामीण - कुणाल रोहिदास पाटील
- रावेर - अॅड. धनंजय शिरिष चौधरी
- मलकापूर - राजेश पंडितराव एकडे
- चिखली - राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
- रिसोड - अमित सुभाषराव झनक
- धामणगाव रेल्वे - प्रो. विरेंद्र वाल्मिकराव जगताप
- अमरावती - डॉ. सुनिल देशमुख
- तिवसा - अॅड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
- अचलपूर - अनिरुद्ध उर्फ बबलूभाऊ सुभानराव देशमुख
- देवळी - रणजीत प्रताप कांबळे
- नागपूर दक्षिण पश्चिम - प्रफुल विनोदराव गुडधे
- नागपूर मध्य - बंटी बाबा शेळके
- नागपूर पश्चिम - विकास पी. ठाकरे
- नागपूर उत्तर (एससी) - डॉ. नितीन काशिनाथ राऊत
- साकोली - नानाभाऊ फाल्गुनराव पटोले
- गोंदिया - गोपालदास शंकरलाल अग्रवाल
- राजुरा - सुभाष रामचंद्रराव धोटे
- ब्रह्मपुरी - विजय नामदेवराव वडेट्टीवार
- चिमुर - सतीश मनोहरराव वारजूकर
- हदगाव - माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
- भोकर - तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर
- नायगाव - मिनल निरंजन पाटील (खतगावकर)
- पाथरी - सुरेश अंबादास वरपुडकर
- फुलंब्री - विलास केशवराव औताडे
- मीरा भायंदर - सय्यद मुझफ्फर हुसैन
- मालाड पश्चिम - अस्लम आर. शेख
- चांदीवली - मोहम्मद आरिफ नसीम खान
- धारावी (एससी) - डॉ. ज्योती एकनाथ गायकवाड
- मुंबादेवी - अमिन अमिराली पटेल
- पुरंदर - संजय चंद्रकांत जगताप
- भोर - संग्राम अनंतराव थोपटे
- कसबा पेठ - रविंद्र हेमराज धंगेकर
- संगमनेर - विजय उर्फ बाळासाहेब भाऊसाहेब थोरात
- शिर्डी - श्रीमती. प्रभावती जे. घोगरे
- लातूर ग्रामीण - धिरज विलासराव देशमुख
- लातूर शहर - अमित विलासराव देशमुख
- अक्कलकोट - सिद्धराम सतलिंगप्पा म्हेत्रे
- कराड दक्षिण - पृथ्वीराज चव्हाण
- कोल्हापूर दक्षिण - ऋतुराज संजय पाटील
- करवीर - राहुल पांडुरंग पाटील
- हातकणंगले (एससी) - राजू जयंतराव आवळे
- पलूस काडेगाव - डॉ. विश्वजीत पतंगराव कदम
- जत - विक्रमसिंह बाळासाहेब सावंत


सचिन सावंतांचा लढण्यास नकार
काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत काँग्रेसचे मुंबईतील नेते सचिन सावंत यांचं नाव होतं.
सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण अंधेरी पश्चिममधून उमेदवारी दिल्याबद्दल सचिन सावंतांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सचिन सावंत यांना वांद्रे पूर्व मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. पण तो मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सुटली. तिथून शिवसेनेनं वरूण सरदेसाई यांना उतरवलं आहे. त्यामुळे सचिन सावंत यांना अंधेरी पश्चिममधून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती.
पण सचिन सावंत यांनी एक्स (पूर्वीचं ट्विटर) वर पोस्ट करत उमेदवारी नाकारली होती.
पहिल्या यादीत होती दिग्गजांची नावं
या यादीत काँग्रेस विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्याही नावाचा समावेश आहे. याशिवाय लातूरमधून विलासराव देशमुख यांचे दोन्ही मुलं धिरज विलासराव देशमुख आणि अमित विलासराव देशमुख यांनाही तिकीट देण्यात आलं आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दक्षिण कराडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पलूस-काडेगावमधून डॉ. विश्वजीत पतंगराव कदम काँग्रेसचे उमेदवार असतील.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना ब्रम्हपुरीतून उमेदवारी दिली आहे. तर CWC सदस्य व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना चांदिवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
कसबा पेठेतून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. भोर मतदारसंघातून संग्राम थोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











