या देशात एक रुपयाही टॅक्स भरावा लागत नाही; शिक्षण-वैद्यकीय सेवाही मोफत

मशीद
    • Author, क्रिस्टिना ऑर्गाज
    • Role, बीबीसी मुंडो सेवा

कोरोना महामारी असो की युक्रेनमध्ये युद्ध असो या देशाच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही फरक पडलेला नाही.

जगभरात अनेक देशांवर अतिशय जास्त कर्ज आहे. मात्र ब्रुनेई या देशात सगळं नियंत्रणात आहे.

कोरोनाच्या साथीशी निपटण्यासाठी अनेक देशांना त्यांच्या खर्चात वाढ करावी लागली होती. अडचणीच्या काळात त्यांच्याकडे पैसा नव्हता. कोव्हिड 19 चा जगाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला.

जगभरात महागाईत वाढ झाल्याचं हेही एक कारण होतं.

मात्र ब्रुनेईमध्ये असं कोणतंच आव्हान नाही. या देशात जीडीपीच्या 1.9 टक्के कर्ज आहे. जगभरात या देशाकडे सगळ्यात कमी कर्ज आहे.

याचा अर्थ ब्रुनेईची अर्थव्यवस्थेत सगळं आलबेल आहे असंही नाही

काही विकसनशील देशांच्या तुलनेत या देशावर कर्ज कमी आहे कारण या देशात एकूणच संपत्ती आणि कर्ज दोन्ही कमी आहेत. मात्र, ब्रुनेईमध्ये असं नाही

इथल्या लोकांचा जगण्याचा स्तर श्रीमंत देशांसारखाच आहे. त्याचं कारण आहे इथे असलेलं तेलाचे आणि वायूचे साठे.

अमाप पैसा

ब्रुनेई

फोटो स्रोत, Getty Images

London School of Oriental and African Studies चे प्रोफेसर उलरिख वॉल्ज म्हणतात, “ब्रुनेई एक पेट्रो स्टेट आहे. तिथे कच्च्या तेलाच्या आणि गॅसच्या उत्पादनाचा वाटाच 90 टक्के आहे.”

एका अंदाजानुसार 2017 च्या शेवटापर्यंत ब्रुनेईमध्ये एक अब्ज बॅरल तेलाचे साठे होते. तसंच 2.6 खरब क्युबिक मीटर गॅस होता.

दक्षिणपूर्व आशियातील ब्रुनेई बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर वसलेल्या या देशाची सीमा मलेशिया आणि इंडोनेशियाला लागून आहेत.

सुल्तान हसनअल वोल्किया आणि त्यांच्या शाही परिवाराकडे अमाप संपत्ती आहे.

या देशात इन्कम टॅक्स नाही

राजा

फोटो स्रोत, Getty Images

या देशातले नागरिक आयकर भरत नाहीत. सरकार नागरिकांना मोफत शिक्षण देतं. वैद्यकीय सेवा सुद्धा निशुल्क आहे.

देशाची राजधानी बंदर सेरी बगावन ला जाऊन आले आहेत ते सांगतात की ही अतिशय स्वच्छ आणि सुरक्षित जागा आहे.

याशिवाय इथला राजा त्यांच्या प्रजेत अतिशय लोकप्रिय आहे. तो वेळोवेळी गरजूंना प्लॉट आणि काही वेळा तयार घरं सुद्धा उपलब्ध करून देतो.

लोकसंख्येच्या दृष्टीने पाहिलं तर हा अतिशय छोटा देश आहे. इथली लोकसंख्या पाच लाख आहे. देशाच्या छोट्या भूभागावर ही लोकसंख्या वसलेली आहे.

पेट्रोलियम उत्पादन विकून इथे जो पैसा मिळतो त्यामुळे या देशावर कर्जही अतिशय कमी आहे.

ब्रुनई

फोटो स्रोत, Getty Images

तेल आणि वायू या दोन उत्पादनांमुळे होणाऱ्या कमाईमुळे या देशात धनसंचय प्रचंड प्रमाणात आहे. या पैशाचा वापर करून या देशाचे शासक छोटा मोठा तोटा सहन करतात किंवा तूट भरून काढतात. त्यांना कर्ज घेण्याची गरज पडत नाही.

खरं पहायला गेलं तर देशाची अर्थव्यवस्था अतिशय छोटी आहे आणि त्यांचा फारसा प्रभाव नाही. तेल आणि वायू साठ्यांमुळे या देशाचं महत्त्व जास्त आहे.

वॉल्झ सांगतात, “तेल आणि गॅसच्या निर्यातीमुळे देशाच्या चालू खात्यात जास्त पैसा आहे. याचाच अर्थ असा की देश स्वत: कर्ज न घेता इतरांना कर्ज देऊ शकतो.”

ब्रुनेई एकमेव असा देश आहे की ज्याकडे अगदी नगण्य प्रमाणात कर्ज आहे. पेट्रोलियम आणि गॅस उत्पादनामुळे इथल्या बँकांकडे पैसाच पैसा आहे.

यामुळेच सगळ्या जगात मंदी असताना इथे मात्र परिस्थिती शांत आहे.

इतर देशांना रोजचं कामकाज चालवण्यासाठी कर्ज घ्यावं लागत आहे. हे कर्ज सरकार आणि खासगी ऋणदात्यांकडूनही घ्यावं लागत आहे. कारण कोव्हिडमुळे बऱ्याच देशांचं उत्पन्न कमी झालं आहे आणि खर्चात वाढ झाली आहे.

अर्थव्यवस्थेचं वैशिष्ट्य काय आहे?

ब्रुनेई

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1984 पर्यंत ब्रुनेई ब्रिटिश वसाहत होता
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ब्रुनेईच्या अर्थव्यस्थेची एक बाजू अशीही आहे की जे थोडंफार कर्ज आहे तेही विदेशी चलनात करावी लागत नाही.

तसंच सगळा नफा ते त्यांच्याच देशात ठेवतात.

मूडीज या संस्थेचे अर्थतज्ज्ञ म्हणतात, “योग्य आर्थिक व्यवस्थापन या सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे नागरिकांवर आणि देशावर आर्थिक बोजा अतिशय कमी असतो. त्यांच्या चालू खात्यात बराच पैसा असतो. त्यामुळे परदेशी कर्ज द्यायला सोपं पडतं. देशात व्याजदरही कमी आहेत. त्यामुळेच या देशात कोणत्याही कल्याणकारी योजना राबवायच्या असतील तर त्यांना खर्च कमी करावे लागत नाही.”

मात्र तिथेही सगळं आलबेलच आहे असं नाही.

या देशाला पेट्रोलियम उत्पादनावरचं त्यांचं अवलंबित्व कमी करावं लागेल. कारण संपूर्ण जगात कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनांची किंमतही कमी होईल.

संपूर्ण अर्थव्यवस्था एका उत्पादनावर अवलंबून राहणंही धोक्याचं असतं.

परदेशी व्यापार तज्ज्ञ सांगतात, “वायू आणि तेलावर अवलंबित्व असल्याने पुढच्या काळात अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण संपूर्ण उर्जेच्या धोरणात मोठा बदल होत आहेत.”

कडक इस्लामिक कायदे

तेल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, या देशात तेलाचे अमाप साठे आहेत

ब्रुनेईची निर्मिती 1888 मध्ये ब्रिटिश प्रोटेक्टरेट म्हणून करण्यात आली होती. 1929 मध्ये तिथे तेलाच्या विहिरी सापडल्या आणि ड्रिलिंगचं काम सुरू झालं.

1962 मध्ये देशात उठाव झाला आणि राजेशाहीचा विरोध करणाऱ्या लोकांनी हातात हत्यारं घेतली. हे आंदोलन चिरडल्यानंतर देशाच्या राजाने मलेशियाबरोबर विलीन होण्यास नकार दिला.

त्याच वर्षी ब्रुनेईने स्वत:ला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली. 1984 मध्ये ब्रिटिश गेले आणि हा एक स्वतंत्र देश झाला.

ब्रुनेईचे राजा हसनअल बोल्किया आहेत. त्यांचा राज्याभिषेक 1968 ला झाला. त्यांचे वडील हाजी उमर अली सैफुद्दीन यांनी सिंहासन सोडून त्यांना गादी सोपवली होती.

1984 मध्ये स्वातंत्र्यानंतर सुल्तान हसनअल यांनी स्वत:ला देशाचा पंतप्रधान म्हणून घोषित केलं आणि मलय मुस्लीम राजशाही विचारधारा अंगिकारली. या नव्या व्यवस्थेत त्यांनी सुल्तानला इस्लाम चा रक्षक म्हणून समोर आणलं.

2014 मध्ये शरिया कायदा आणणारा ब्रुनेई हा पहिला देश होता.

2019 मध्ये त्यांनी समलैंगिकांना दगडं मारून मृत्यूदंडाची शिक्षा करणारा पहिलाच देश होता. मग जॉर्ज क्लुनी सारख्या अभिनेत्यांनी दबाव आणला आणि ही प्रथा रद्द झाली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)